लेक खान्देसनी बहिणाबाई
क खान्देसनी, देखा अजरामर झाई.
सच्चाई जींदगीनी, तिन्ही गानास्मान गाई.
निसर्गानी शाळा, नही पाटी नही पुस्तक.
तुन्हा ज्ञाननापुढे, झुके ज्ञानीस्नं मस्तक.
संसारनं गणित, तूच सोपंकरी बाई.
तुन्ही मायबोलीनी, झायी जगमां नवाई.
माय बहिणाबाई, तुन्ही भाषा बहू गोड.
खान्देशी आंबानी, जशी मधूर ती फोड.
सासर माहेर, लेकी सूनास्ले अप्रुप.
नातास्ना बंधले, दिन्हं नवं तुन्ही रुप.
तुन्हा संगे बोले बाई, निर्जीव दगडना घट्या.
सांगे वढाय मनन्या, बाता बहूशेत खोट्या.
कर्मानी भोरी रेखा, तुन्ही खोटी करी दायी.
कष्ट करीसनं तुन्ही, उभी करी मोठी पुण्याई.
उभी हयाती गासूत, तुन्हा कर्तृत्वानी कथा.
तूच माय सरसोती, झुकी खान्देसना माथा.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३ )