लगीनमा सुक्या कोण ऱ्हास?
खान्देशमा लगीनना गाना, काही प्रथा, रीती, रिवाज सेत. त्या बठ्या प्रथा अर्थपूर्ण सेत. गानास्मा इत्यास से. पनं त्यांना नीट आर्थ लावता येवाले जोयजे.
सेवन्ति म्हणजे मारोतीना पारवर नवरदेव उतरेल ऱ्हास. त्याले लेवाले नवरीनी जान परवान गावनी मंडई जास. ती सेवन्ति. या परवानमा एक घोडा बी ऱ्हास. या घोडावर नवरीना धाकला भाऊ बठेल ऱ्हास. त्यांना कडे नवरदेवना फुल पोशाख ऱ्हास. हाऊज पोशाख घाली नवरदेव मांडोमा यस नी नवरी संगे लगीन लावस.
आते घोडावर जो नवरीना भाऊ ऱ्हास त्याले सुक्या म्हणतंस. नवरदेव पोशाख घाली जवय या सुक्याफान घोडा मांगस तंवय सुक्या बी नवरदेवकडे पोशाख मांगस. नवरदेव सुक्याले एक डरेस देस नी त्या सुक्याले खाले उतारी सोता घोडावर बठस. मंग घोडावर बठी नवरदेव नवरीले परनाले जास.
तों जो नवरीना भाऊ सुक्या ऱ्हास, त्याले आपुन बठा झन सुक्या म्हणतंस. त्या सुक्याना आर्थ कांय?
सुक्या म्हणजे शुक्र. त्याले आपुन अहिराणीमां सुक म्हणतस. हाऊ सुक म्हणजे सुऱ्या भवते ज्या गिऱ्हा फिरतस त्यापैकी एक गिरा म्हणजे सुक. हाऊ सुऱ्या फाईन खूप जोडे से. त्यामा त्यांनी धम्मक खूप ऱ्हास. चांदना खालोंखाल सुकन उजाय पडस.
सुक न्हीगना का बैलक्या बैले चाराले जातस. तवे बठ गाव जपेल ऱ्हास. पन हाऊ सुक एक निरोप आपलें देश. रात सरी गई. आते हाई झापड बी सरी. उषा ई नी मंग सुऱ्या उगी. जथ तथ उजायज उजाय व्हई. म्हणजे हाऊ निरोप लयस सुक.
हाऊ सुक म्हणजे आपला सुक्या. नवरीना भाऊ. तों नवरदेवले लेवाले जास नी त्याले सांगस पावना या. बठा या घोडावर. तुम्ही आवलोंग एखला पनानी रातना अंधाराम व्हतात. आज मी शुक उगनू. थोडा टाईममा उषा म्हणजे मनी बहीन उगी नी तुमना हायातीन याय उगी. सकाय व्हई तुमना सवसार सुरु व्हई. चला बठा घोडावर नी या मांडोमा तठे मनी बहीन वाट दखी ऱ्हायनी चला. तों सुक्या!
बापू हटकर……
खान्देशमा लगीनना गाना
खान्देशमा लगीनना प्रथा रीती,रिवाज
2 thoughts on “लगीनमा सुक्या कोण ऱ्हास?”
Comments are closed.