राई रुख्माई पोयत करे
राई रुख्माई पोयत करे!
पोयत म्हणजे यद्नो पवित! जानवं! हायदमां रंगाडीसनी नवरदेव नवरीनां लगीनमा गयामां घालतस ते कच्चा सुतन पोयत! या पोयतन गान म्हाईत से तुमले कामपुरतं सांगस.
तठे कांय सीताबाई काते.
तठे काय प्रभू उकले ताना.
इसनू किसनू कांड्या भरे.
राई रुक्मिनी पोयत करे.
या गानामा दखा पोयत महत्वान से. ते बनावाले बराज हात लागेल सेत. सीतानी सूत कात. रामनी धागा उकला. कांड्या इष्णू परमात्मानां अवतार कींष्णू यांनी भऱ्यात. नी मूळ मुद्दानं काम पोयत करान ते राई रुख्माईनी कर. त्यामा बी राई हाई पहिलं नंबर वर से.
राई म्हणजे वनराई, रानबाई. कानबाईनी सयत से ती रानबाई. रानबाई म्हणजे जंगल संपत्ती. वावरनं पीक धनं, आबादानी. नी कानबाई म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे घरम्हानं धनं. सोनं चांदी रोकडा नोटा. रानबाई उनी ते लक्ष्मी यी, रानबाई पिकनीज नही ते लक्ष्मी कताईनं ई. बठी बोंबल बाराखडी से मंग. रानबाई पाठ फिराई जास तवेज शेतकरी आत्महत्या करतस. ती रानबाई. जंगल वावरनं धनं पिकाडनं व्हई ते पानी लागस. पानी पडा सवाई खेती पिकत नही. नी झाड जंगल सवाई पानी पडत नही.
यावर आते आतेज इकास पाटील सर नी मस्त लेख लिखा. झाडे लावा. पहाडमांते झाडे लावाज पन वावरेसमा बी झाडे लावा. मी मांगे दोन लेख लिखा व्हतात, गाव तठे आमराई नी बांध तठे झाड.
आपलं धर्म शास्तर नी सनेस्मा बी झाडेसन महत्व सांगेल से. वडसायतराले वडनी पूजा सांगेल से. म्हणजे वडना झाडे लावा जगाडा हाऊ संदेश से त्यामा. पनं सहिरी करन व्हवा मुये वड सायतरा सनले वड जगाडनं सोडी बाया वड तोडाले लागण्यात. वडनी फान्टी तोडी बाया घर लै जातीस. म्हणजे वडनं आयुष्य कमी करान काम से हाई.
वड हाई झाड दीर्घायुषी से. त्यांना इतली हायाती कोणताज झाडनी नई. म्हणीसन सवासनी या दीर्घायुष्यी झाड सारखी नवराले सावटी हायाती मांगतीस. तुटेल फांटीनी हायाती कितली ऱ्हासं बरं. त्याथुन पूर झाडनी पूजा करा. ते नही व्हई ते, वडनं रोप ल्या. त्यांनी पूजा करा. नी पूजा करावर ते जंगल नदी नालामांनां काठ वर लाई या. त्याज टाईमले पावसाया ऱ्हास. झाड जगी जास.
आपला कडे शेतकरी बी खूप उदास नी आयदी सेत. आपला वावरेस्मा सावलीले झाड नही राव. आखाजीन एक गान से,
काया वावरमां झोपाया आंबा तठे उतरनी गौरांई रंभाl
वावरमां आंबाज नही ते गवराई उतरी कोठे. मोठी कानबाईना मांडोले 108 जातना वनस्पती लागतीस. झाडेज नही ते इतल्या वनस्पती झामलो कोठे? बठा डोंगर दरा बोडखा सेत. गावनी एकजुगमां श्रमदान करी पावासायाना तोंडवर जंगलमां झाडे लावा.
वावरे पेराई ग्यात का मंग आखाडमां सऊड भेटस. त्या टाइमले पानी बी पडत ऱ्हासं. त्या वखत पहाडमा, नदी नालानां काठवर झाडे लावा. पहाडमां, गुरचरराईन वर झाडे लावा.
वावरनां बांधवर बी झाडे लावा. प्रत्येक शेतकरीनी आपला वावरनां उत्तर पूर्व बांदवर झाडे लावा. दक्षिण पश्चिम बांध शेजारीले सोडा. म्हणजे प्रत्येक शेतकरीले दोन बांध भेटतस. महसूल खातानी हाऊ कायदाज कराले जोयले.
झाड लाव म्हणजे फळ, फुल, पान, सावली, लाकूड फुकट भेटस. एक सावा आंबान झाड लाव ते पिढ्यानं पिढ्या आंबा, रायत, फुकट भेटस. पण आपलाकडे कल्पकता नही. कामे करानी दानत नही.
माणूस जातं जित्ती ठेवनी व्हई ते, जल, जिमीन, जंगल नी जनावर जित्ता ठेवाले पाहिजेत. ज्यांरोज या चारी घटक मरी जाथीन त्यारोज मानूस जातं शिल्लक ऱ्हावाव नही. शिल्लक ऱ्हायनात बी ते खातीन कांय? दगड, रेतू, मुरूम?
म्हनीसन एक रावनाई से गाव तठे वनराई योजना राबाडा नी पार पाडी दावा.
ज्ञानेश्वर माऊली कांय म्हणस?
भुता परस्परे जडो मैत्र जीवाचे.
जगतगुरु तुकाराम महाराज कांय म्हणतंस,
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी
पक्षीही सुस्वरे आळविती
झाड, जंगल, जिमीन, जनावरे जगाडा, सिरिमंत व्हा आयुखवंत व्हा!
छान लेख लिहिला आहे मला खुपच आवडला. पोयत ह्या बद्दल माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद दादा.रखुमाई, रानबाई, कानबाई, वनराई, विष्णू एव्हढे सगळ्या देवांना आव्हान देऊन ते पोयत बनवलं जातं हे माहीत नव्हतं.आजवर लग्नात म्हटले जाणारे एक गाणं एव्हढंच माहीत होते तुम्ही त्याची उकल करुन दिली . त्याबद्दल धन्यवाद .पण ते पोयत हे गाणं तुम्ही पूर्ण लिहून पाठवले तर फार बरे होईल.जूनी जाणती म्हातारी लग्नात शोधावी लागणार नाही . सर्व लग्नात बोलली जाणारी गाणी लिहून pdf बनवा दादा.आमचया सारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना फायदेशीर होईल .परत एकदा धन्यवाद दाद.