अहिरानी गझल मन्ही मैना
🌺गझल मन्ही बोलस..🌺
🪴गझलवृत्त-भुजंगप्रयात🪴
🌹मन्ही मैना..🌹
मयानी तिजोरी..मन्ही गोड मैना
खुशीनी शिदोरी..मन्ही गोड मैना
तिन्हा चंद्र शे मी..मन्ही चांदनी ती
उलीशी चकोरी..मन्ही गोड मैना
अशी अप्सरा ती..जशी थेट रंभा
दिसाले भु गोरी..मन्ही गोड मैना
कधी गाल व्हढस..कधी छेड काढस
जरा शे टपोरी..मन्ही गोड मैना
अगाऊपनामा..पुढे शे तरीबी
निरागस किशोरी..मन्ही गोड मैना
गऊ दूर जर मी..करी याद माले
रडस पाठमोरी..मन्ही गोड मैना
सम्हाया जरी मी..कयस उंच घरना
जपस पायथोरी..मन्ही गोड मैना
✍️सुगंधानुज✍️
कवी देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.