अहिराणी कथा भादानं उन लेखक ज्ञानेश्वर भामरे

अहिराणी कथा भादानं उन लेखक ज्ञानेश्वर भामरे

भादानं उन……

बापूजी मुंगनी काडनं गाडं भरी लयना. नी वाडगामा सोडी दिधं.
दुपारना देड वाजेल व्हतात. भादाना उनम्हा बापूजी आज भलताज शेकाई ग्या.
बयलेसले पानी दायी दिधं नी घाबरघाईमा वाडगानं शिवाडं लायीसन घरना कडे निंघना.

रूखमानी आज घरमातला डबडा धवाना उद्योग काढेल व्हता.
आंगनम्हा बठ्ठा कुल्लाया पापडेसना पसारा टाकेल व्हता सुकाडाले.
नी पत्तरना डबडाले नारयन्या चुट्ट्यासघाई घसडी रायन्ती.

तितलामा बापूजीले येता दखीसन हात धुईसन वट्टावर उभी रायनी.

बापूजी वटटा चढना तितलाम्हा रूखमानी तोंडनं भरगडं चालू करी दिधं.
काय मानोस से….?
देड दोन वाजामा उनात बिगर न्यारी पारीना गयात.
नित्याना करता डबा करा, तवयज बोलनू एक पोयी बांधी लयी जावा मन्त.
वावरमा गयं का टाईम व्हयीज जास.
पन कोनं सांगेल आयको नही नी भुक्यं तिशं जीवन्या आयकोया करो मंग.
बापूजी खाटवर बठना नी रूखमानी वटरवटर करतज पानीना गल्लास हातमा दिधा.
बापूजी घटंघटं तांब्याभर पानी पी गया.
रूखमानी मंग बागेजकरी बापूजीले इचारं….!!
आंग धोतस ,का जेवाले वाढू…?
बापूजी बोलना ,बय आवन काय भादा कडक से …!
कडक रावाव नही का भादा?
इतला पानी पढडेल से त्याना आते वाफा व्हतीस नी गरमाई वाढी जास.
ईतला वरीस झायेना भादानं उनमा कामे करेल सेतस मी.
पन आवनना भादा भलताज कडक से.
बापूजी बोलना…..
चला मी तुमले जेवन वाढस.आते हातपायज धुई ल्या.
मुंगनी काड रचायनी का मंग आखो आंग धोनंज पडी.

रुखमानी बापूजीले जेवाले वाढी दिधं नी एक चक्कर आंगनमा मारी उनी.
बठ्ठा सामान पसारेल व्हता ना आंगनमा.
डुकरे गलीसमा फिरतस नी गंधापटक तोंडे घाली जातस.
म्हनीसनी रूखमानं आर्ध चित बाहीर नि आर्ध बापूजीले जेवन वाढामा व्हतं.
बापूजीनी खुडमिरचीसनी उडीदनी दायना दोन वाढा खाई लिधात ,नी वट्टावर टाकेल खटे खाटवर जपी लिधं.

रूखमानी घरमातला दोन च्यार पत्तरना डबडा घसडी लिधात नी उन दायी लिधं.
बापूजीले मस्त जप लागी गयथी.
च्यार वाजाले बापुजी उठना.च्या पी लिधी नी वाडगाना गम निंघना.
वाडगाम्हा मुंगनी काडनं गाडं खाली करनं व्हतं .
म्हनीसन वाडगामा उना.
बापूजीले दखताज म्हैस खडकन उठीसन उभी रायनी.जसा पोलीस आधिकारीले दखीसन पोलीस हावलदार उभा राहतस तशी.
खुटाले एक चक्कर गोल फिरी लिधं नी बापूजीना कडे आशान मारे दखत उभी रायनी.
चारा टाकीन यान करता.

बापूजीनी मुंगनी काडना गाडाना बांधेल दोर सोडा.
आनी मवरेनी एक डिबी काड म्हैसले टाकी दिधी.
ते भाऊबनकीना रागना मायेक म्हैसनागम दखत दोन्ही बयले उभा रायनात.

बापूजीनी आंगेना खयामातला जागल्याना पोरगा कालू ले आवाज दिना.
काल्या ऽऽऽ वो काल्या…….
आथा ये हाई गाडं उपसू लाग माले.
दहा रुप्या दिसू गाडं खाली व्हयनं का.
१४/१५ वरीसना काल्या भी पयत उना.

बापूजीनी गाडं उचकायी दिन्हं, ते बठ्ठी काड भरकन बयलेसना मवरे चालनी गयी.
त्यासनी तवयज भराभर डाचा भरी लिन्हात.

बापूजीनी काल्या ले पत्तरना शेडम्हा काड रचाना करता कुटारना वर चढाई दिधं.
बापूजी डिब्या करी करी काल्या फान वरते दी रायन्ता नी काल्या रची रायन्ता.
पाच साडेपाच वाजासे गाडं खाली करायी गयं.
काल्याले बापूजीनी सांग ,घर जाय नी तुन काकू फाईन दहा रूप्या मांगी लय.

वाडगामा सायतरा न्हानमाय तगारी लयीसन उनी.
बापूजी बोलना…….न्हानमाय ,मी ते शेन उखल्लावर टाकी दिधं.
बापूजी…..म्हाले शेन नही लागाव से.
मुंगना काडनी हाई कायी माटी पडेल से ना ती लेवाले येल से मी.
काबर…तुयसीले लागाव से का?
नही रे बाॅ….ह्या दिनम्हा काय तुयशा लावतस का.

मना पायसले लेप लावस मी वल्ली करीसनी .डाकटरनी सांगेल से उसनता कमी करस हाई कायी माटी ,तयपायले लायी लेवो रोज रातले जपान टाईमले.
तुनाज हातेघाई लावस का तू?
नही रे बा…मनी धाकली वहू सुवर्ना लायी देस रोज.
मंन्त मुंगनी काडले लटकेल ढेकाया सापडथीन .म्हनीसन मी आठे उनू बापू तुना वाडगामा.

लयी जाय ना काकू दोन तीन तगा-या भरतीन.
माले भी काय काम पडाव से.
बापूजीनी सायतरा काकूफाईन तगारी लिसन भरी दिन्ही.
काल्या घरथाई दहा रूप्या रूखमाफाईन मांगी लयना.
बापूजीनी काल्याले माटीनी तगारी सायतरा काकुना घरलोंग पवसाडाले सांग.

नित्या वाडगामा उना.
काय बापू गाडं खाली भी करायी गयं.
मी येतू तवय करतात ना खाले.
बिनकाम ना दहा रूप्या गयात ना काल्याले?

आरे नित्या तू भी ते दिनभरना उन तानम्हा कामले जायेल व्हता ना.
मंन्त दमी यिसी .
म्हनीसन काल्याले लायीसन खाली करी लिधं गाडं.

जगन कारभारी फटफटीवर वाडगामा ई लागना.

रामराम हो बापूजी ऽऽऽ
रामराम ,रामराम कारभारी.
बोला काय येनं कर दिमयले वाडगामा.

काय येनं करं म्हंजे….?
बठ्ठा ईषय तुमले माहीत से.
कालदी धुयं जायेल व्हतूत ते भी तुमले माहीत से बापूजी.
तरीबी इचारतस कसं काय येनं कर?
हा…..! तो म्हयसीसना परकरन ना ईषय.
तो ते माहीत से म्हाले.

तू आनी दिलीप आन्ना धुयं जायेल व्हतात कालदी.

परकरन पास व्हयीज जायीन मावालं.साहेबले कालदी दिमयले पार्टी दि उनू.
नी वरताया दोन हाजार खिसामा टाकी उनू बयजबरी.
साहेब ते एकज खंबाम्हा रेडिओना गत बोलाले लागना हो.
म्हने जगनराव ,तुमचं प्रकरण उद्याच फायनल करतो.
तुमचा स्वभाव आपल्याला भारी आवडला आहे.
तुमच्या सारखी माणसं असली म्हणजे कामं कशी फटाफट मार्गी लागतात.

साहेब कालदी सोडता सोडे नही हो.
रातना आकरा वाजी गयथात धुयामाज.धुयानी चवफूलीना जोडनी सपना हाटेलम्हा पार्टीले लयेल व्हतू साहेबले.

आज दुपारले साहेबले फोन लावा नी ईचारं .
साहेब म्हने परकरन पास झालं तुमचं.
कामाला लागा तुम्ही.
म्हनीसन हाई गोड बातमी तुमले सांगाले उनू बापूजी.

कारे नितीन…….काय करी रायना तू सध्या.
काय नही कारभारी कालेज करी रायनू .

सोड ती कालेज नी फालेज…..
कोटे नवक-या सेतीस ईतलं शिकीसन.
त्यानापेकशा वावरमा म्हैसीसना गोठा टाकी दे.
मी परकरन पास करी लयस तुनाकरता.
वावर बॅकानकडे तारन ठीसन परकरन पास करी लेवो.

कारभारी तुमनं गन खरं से.
बापूजी हाई खाली म्हैस ईकीसन दुधनी लयस नही. ते आखो वावर काय तारन ठी भो.
इचारा बापुले…….तोंडेतोंड सांगी रायनू.

बापूजी बोलना…….
कारभारी ? तू म्हालेज साले लायी ले तुना मयाम्हा.
म्हैसी धवाले नी तिसना चारा पानीना करता.
आते मना वावरना कामे आवरायी गयात.
निस्ती दादर पयरनी से.ती पयरायनी का मंग मी रिकामाज से.
३०० रूप्या रोज लिसू भो पन.
दोन्ही सान म्हैसी धवान काम काय साधं रास का?
नानी सपनम्हा येस भो.

जगन कारभारी बोलना बापुजी….कालदी बठीसन ठयरावूत आपीन.

तो फटफटी चालू करीसनी दारूना आड्डाना कडे निंघी गया.

लेखन…..
——ज्ञानेश्वर भामरे
वाघाडी ता.शिरपूर जि.धुळे