बैल पोया!
बहे!
n
मी मांघना आठोडाफाईन इच्यारम्हा पडी जायेल व्हतू! माले म्हाईत शे तुमीन याव्हर माले काय ईच्यारशात ते! म्हनीसन पह्यलेन पह्यले मीच तुम्हले सांगी देस! ते भावड्यासहोन मन्हा मनम्हा आसा ईच्यार टपल्या मारी र्हायन्था का धुये, कापडनं, सोनगीर, पातोंडं, शिरुर, आम्मयनेर, पिंगयवाडं, तांदई, गिरड, आनोर्द, बुधगाव, पाचोरा, शिरपूर, आरथं, नांद्डं, बोराडी, वाडी-वघाडी, बायदं-जातोडं, वरुय-भटानं, बाम्हनं धमानं, ईख्रन, ईखूर्लं, आन तथा पार शाहादा-नंदुरबारना आंगेपांगेना गाये करत करत पार मालेगाव, लासलगाव आन बागलान लगून भिडी गवू, काही च्याईस्गावना वर्ला हेटला मेहुनबारं, धामनगाव, तिर्फयं, धाक्लं वर्खडं मोठं वर्खडं, मधम्हानं ते पयासरं, खडकी, चिंचगव्हान, टाकळी, भडगाव, नगरदेवळं, आसा आंगेपांगेना पाचपन्नास गायेसले फेरफटका मारीसन ईवूत म्हन्तं.
n
हात तिन्ही बैझू तुमीन दिन्हना माले आखो बिचकाडी! म्हने हाई फेरफटका मारानं भूत शे का चुर्हेड शे का हाडळ शे का ती हाबाडाखीन शे या नेमका आप्ला शिवाजीआप्पाना खुयचट डोकाम्हानंच कसकाय उठबश्या मारी र्हायनात व्हतीन?
n
आते जराखं डोकं थंडं ठीसनी आयकशात का नई तुमीन! आयका आते नेम्मन! आरे यार! जरा गप बठाना! आसा मव्हरे मव्हरेच म्हझार्म्हा काय पाटा पाडंत बठतंस तुमीन?
n
हां ते मी काय म्हनी र्हायन्थू तुम्हले? बरबर शे, का त्या आंगेपांगेना पाचपन्नास गायेस्ले फेरफट्का मारी ईवूत म्हन्तं यान्हं कारन दोन दिनना बादम्हा हाऊ बैलपोया येवाव व्हताना म्हनीसन आप्ला कित्ला दोस्तारेस्ना गायगोठाम्हा शेतीकामले लागन्हारा शेतकरी भावड्यास्ना सच्च्या पाठीराखा बळीराजाना सर्जाराजासले दखी ईवूत म्हनीसनी गनज पायपीट कई पन भावड्यासहोन मायनी आन ल्हीसन सांगंस का माले बोटवर मोजायथीन इतलाबी सर्जाराज्यास्नं दर्सन काई व्हयनं नई! तधय मन्हं मुसडं दखालायक व्हई जायेल व्हतं!
n
आसाच ईच्यार करत करत चाला म्हन्तं आते जराखं जपी तरी ल्हीवूत आसं म्हनीसन खाटलावर आडा व्हयनू ते तवशीन एकदम वचकाई उठनू. बाजूलेच मन्हं खटलं दुसरा खाटलावर ढाराढूर घोरत पडेल व्हतं!
n
हाई तुम्हनी बहीननं घोरनं ते तुम्हले म्हाईतच शे! खूप हुशार शेतंस रे भावड्यासहोन! तुम्हले मीच बरा सापडी गवू हाई वाघिनना गत घोरनारी बाई मन्हा गये भांदी दिन्ही तुमीन!
n
शाब्बास शे रे बाप तुम्हनी! तसा घोराले मी बी काई कमी नई शे म्हना! मन्ही झोपनी तयारी झाई आसं आंगेपांगेना शेजारी पाजारीस्ले समजनं का त्या पह्यलेन पह्यलेच कानेस्म्हा बोया टाकी ल्हेतंस!
n
तुम्हनी बहीनना घोराना आवाजम्हा निचितवार जप मातंर लागनीच नै. शेजारना शिवराम ताथ्यानी माले शिवाजीआप्पा! शिवाजीआप्पा! म्हनीसन आरोई मारी तधय मी झोपनं सोंग करी तशाच पडी र्हायनू पन शिवराम ताथ्या सोय खानारा मानूस थोडाक शे! तेसनी पुनाईन जोरम्हा आरोई मारी, शिवाजीआप्पाsss ओ शिवाजीआप्पा ssss मंगन उठनंच पड्नना झकना मारे!
n
शिवराम ताथ्यानतेस्ना सासूल लागताच तुम्हनी बहीन उठनी आन डोकावर पदर ल्हिसनी तथी माथनी कडे जाईसन पानिना गल्लास भरी लैनी आन तो गल्लास मन्हा हातम्हा देता देता आर्धा गल्लास मन्हाज आंगवर हुब्री दिन्हा! हाई तुम्हनी बैन एक काम नेम्मन चवचतरायवार करत व्हई ते सप्पेत शे कधी!
n
शिवराम ताथ्या तिन्हा सासराना नाताना लागतंस म्हनीसनी ती तसाच तोंडवर पदर ल्हीसनी फिदीफिदी दातडा काढत मोरीम्हा पयनी!
n
आथा शिवराम ताथ्यानी, आथा तथान्या गप्पा मारता मारता माले हाजार रुपया मांघात तसा मी लगेज कोप्रीना खिसाम्हाईन कालदिन पत्तासम्हा जिकेल साडेचार हाजार रुपयास्म्हातला पाच पाचशेन्या दोन नोटा काढीसन त्यासना हातम्हा टेकाडाना पह्यलेच ताथ्या बोलनात, आहो आप्पा आज पोया शे ना! छुट्टा पैसा द्याना तुमीन माले! मी त्या नोटा परत ल्हीसन तेसले पाचशेना छुट्टा दिन्हात, आन एक नोट पाचशेनी दिन्ही. पैसा ल्हेताच शिवराम ताथ्या आपला घर कडे जाता जाता माले जताडी जताडी सांगाले लागनात का आज सम्द्याकायले पोया फुटल्यावर आपली घर जेवाले ईज्यात बरका हौ आप्पा! संगे व्हवू आन मन्ही ती नात रेनुकालेबी ल्ही इज्यात माले कालदिनच मालूम पडनं का ती माहेरले येयेल शे आसं! चला येस आते मी! आसं म्हनीसनी ताथ्या डोयाआड व्हताच मी रातना सपनम्हा दखेल आंगे पांगेना गायेसना ईच्यार करता करता मोबाईलना डबडाम्हातलं व्हाट्सअप हुघाडताच बकरी कशी बदंबदं लेंड्या टाकंस तसा आजना बैलपोया सनवर्रन्या ना-या ना-या रंगारंगन्या स्माईली काय! शुभेच्छा काय! ह्यां एकथीन एक कईता काय, चुटकुला काय, रिल्स काय! जसा काय पाऊसच पडी र्हायना का काय आसं माले वाटाले लाग्नं. सलं मन्हं ते डोकं मॕट व्हवानी पाई ई गई! मायन्यान भो! त्या कईतासम्हातली पिंगयवाडाना परकास दादा पाटील यासनी कईता मातर माले भू आवडनी बरका! मी तिले दोन तीन सवा वाची काढी आन तिले एकनंबर दी बी टाका फटकाम्हा, पन बाकीनाबी भराभर शेराले लागनात तव्हय मी ईच्यारम्हा पडनू का सला बैल पोयाना ह्या ईतला बैले कथाईन पैदा झायात रातोरात? खरंच ह्या सम्दासना घर सोताना बैले शेतंस का? आन खरंज ह्या बैलेस्नी पूंजा कर्तस का? आरे बैले ते सोडा यास्नाकडे एखांदी गावडी नै ते एखांदी बकरी तरी शे का रे ऐ भावड्यासहोन? आसं मी मनमन्हा मनले ईच्यारंत बठनू! पन माले खरं उत्तर आवधूर काई सापडनंच नै!
n
ते भावड्यसहोन आशी गम्मत झाई आज!
n
मन्हा कवी दोस्तार भावड्यसहोन आरे जराखा धीर धरत जावाना रे तुमीन! का बस उठनात का सुटनात कईता लिखाले! हात तिनी बैझू भायेर पानीना शितडा पडाले लागनात! आगष्ट महिनाम्हा आख्खा महिना कथा दडी बठेल व्हता कायजान? आन आते सप्टेंबरम्हा ते झडीच लाई दिन्ही यान्ही! बैझू याले आते कोन समजाडी तुमीच सांगा?
n
तुम्हनी बैन च्याय लयनी. कपबशी मन्हा हातम्हा देवाना पह्यलेन पह्यलेच मी तिले जताडं तथा त्या टूलवर ठेव नेम्मन! तशी ती मन्हाकडे डोया फाडीसन दखाना पह्यलेच मी मोरीम्हा तोंड धवानं निमितखाल उठनू आन पयनू मोरीकडे!
nn
बरं! भावड्यासहोन हाई मन्ही ‘बैलपोया’ नावनी लघू कथा कसकाय वाटनी ते सांगज्यात हौ!
nn
तुम्हनाच!
nn
शिवाजीआप्पा साळुंके,
nn
हाल्ली मुक्काम- औरंगाबाद.
nn
जय जय अहिरानी! जयजय खान्देश!!
1 thought on “बैल पोया अहिराणी कथा”
Comments are closed.