बाप हायी रसायन ना गुणधर्म बी कयना नही नी गुणसत्र बी वयन नही

बाप हायी रसायन ना गुणधर्म बी कयना नही नी गुणसत्र बी वयन नही

Ahirani Katha Khandeshi Ahirani Katha

बाप हायी रसायन ना गुणधर्म बी कयना नही, नी गुणसत्र बी वयन नही
एक वरीस्ना बाप कोर्टानी पायरी चढस… तेल्हे एकुलाएक आंडोर ह्रास, तेन्हा इरोध मा तो कोर्टाकडे न्याव मांगस. तेन्ही मांगनी ह्रास धडपणे मन्हा आंडोरनी माल्हे खर्च पाणी देव्हो.
आते अपील नी कार्यवायी चालु व्हस, न्यायाधीश ना समोर तो बाप उभा ह्रास… न्यायाधीश इचार, “बोला तुम्हणी गह्रान काय शे?”. बाप बोलस, “साहेब मन्हा आंडोरनी माल्हे दरमहिनाले खर्च पाणी देव्हो, तसा मी गयरा पयसावाला शे, पण आंडोरन कर्तव्य ह्रास मायबापस्न ध्यान ठेवानी”.
न्यायाधीश बोलस, “बरोबर शे तुम्हण, आंडोरनी जिम्मेदारी झटकीसन चालाव नही, बोला तुम्हणी मांगनी कितली शे? “. बाप बोलणा, “माल्हे हर महिना १०० रुप्या जोयजेत, पण त्या पयसा मन्हा आंडोरनी सोता यीसन मन्हा हातमा देवो, हर महिनाले”. न्यायाधीशले आचंबा वाटणा, फक्त १०० रुप्या करता हाऊ धल्ला कचेरीनी पायरी चढना, पण काही हरकत नही, तेन्ही लगेच हुकुम काढा, नी धल्ला ना आंडोरले १०० रुप्या सोता जायीसन हात मा देवाना.
न्यायाधीश नी त्या बापले आप्ला चेंबर मजार बलाव्ह. नी इचार,” बाबा फक्त १०० रुप्या करता तुम्ही कचेरी नी पायरी चढणात, नी आंडोरले बी चढाव्ह,” तव्हय मातर बापना डोया वल्ला व्हयनात, नी तो न्यायाधीश ले बोलणा, “साहेब गोट शंभर रुप्या नी नही, मन्हा आंडोर कामधंदा मजार इतला गुतेल शे, की तेल्हे मन्हा कडे दखाले, माल्हे भेटाले येय मियत नही, म्हनीसन आते तरी तो शंभर रुप्या ना बहाणा मा कमीत कमी हर महिना माल्हे भेटीन, मी तेल्हे डोया भरीसन दखत ह्रासु, मन्हा जीव निवायी जाईन” . आस आयकतास न्यायाधीश ना डोया वल्ला झायात, तेन्ही बाप माणुस्ले सलाम करा, इकडे आंडोर आयकी ह्रायंन्ता, तेन्ह्या बी डोयाले धारी लागण्यात, बाप ले घट्ट मिठी मारी, आणि वापस हायी चूक व्हवाव नही आशी बापले गव्हायी दिन्ही….मित्रस्वन धरपडे मायबापस्ले पयसा आडका काहीच लागत नही, तेस्ले फक्त पीरीम ना दोन सबद लागतस, आधार लागस… मायबाप हायी घरन घरपण ह्रास….. पण माय गयरी लिखायणी, गयरी वाचायणी, इतिहास मजार माय अमर झायी, पण बाप अजून बी पाहिजे तसा लिखावणा नही, वाचावणा नही, इतिहास ना पांनंटासवर उमटना नही….. बाप हायी रसायन कोणलेज कयन नही….
त्रिवेणीकुमार……