फेना Khandeshi Ahirani Diwali Kavita

फेना Khandeshi Ahirani Diwali Kavita


घर घर नी मोरीम्हा
र्हास दगडना फेना
आरे फेना आरे फेना
माले कसा सापडेना॥धृ॥
तुन्हा बिगर आडनं
सांग कोठे दपायना
नही बादलीना आडे
नही मांगे घंगायना॥१॥
आठे दारनना आडे
आत्ये कोठे देखायना
काय सांगू देखिसनी
माले आनंद व्हयना॥२॥
आरे फेना सांग माले
कोन जातना पातना
कोन गांवना नांवना
सांग माय बाप तुन्हा॥३॥
सदा झिंजसं झिंजसं
मयं काढस आम्हना
सासर्वाशी आंडेरना
इतलीशी च नात ना॥४॥
तुन्हा पुढे फिका पडी
साबू लक्सं नि रेक्सोना
जागा इतलीशी तुन्ही
एक मोरीम्हाना कोना॥५॥
मय काढस आंगना
कोन काढी मनम्हाना
मयं बठ्ठास्ना मनम्हा
काय सांगू रे मातना॥६॥
–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड,एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.
दि.४ नोहेंबर२०२०रोजी प्रकशित व्हयेल मन्हा ई कविता संग्रह *मन्ही खान्देशी बोलनी म्हा हायी बी कविता से.

शब्दार्थ :- फेना=अंगाचा मळ काढण्याचा दगड(अंग घासण्याचा), मोरीम्हा =मोरीत(स्नानगृहात), र्हास=राहतो-असतो, दगडना =दगडाचा, तुन्हा =तुझ्या, बिगर=शिवाय, आडनं=अडलं, कोठे=कुठे, दपायना=लपला, बादलीना =बादलीच्या, आडे=बाजूला, मांगे=मागे, घंगायं=घंगाळ(आंघोळीचं भांडं), आठे =इथे, दारनना=दरवाजाच्या, आत्ये =आता, देखायना=दिसला, देखिसनी=पाहून, माले=मला, व्हयना=झाला, कोन=कोणत्या, जातना पातना=जातीचा पातीचा, गावना=गावाचे, नावना=नावाचे, झिंजस=झिजतो, मय=मळ, काढस=काढतो, आम्हना=आमचा, आंडेरना=मुलीचा, इतलीशीच=एवढीशीच, नात ना=नाती चा, पडी=पडेल, साबू=साबण, तुन्ही=तुझी, कोना=कोपरा, काढी=काढेल, मनम्हाना=मनातला, बठ्ठास्ना=सर्वांच्या, मनम्हा=मनात, मातना=मातला.


चला दिवाळी ना फटाका लेवाले