पोया सन करी गोया लेखक विश्राम बिरारी धुळे #पोळा

पोया ‘ सन करी गोया “

#पोळा

” आयाय माय ‘ काय वं ss ! कावं उठा नां ‘ दखा याय कव्हढा वर ई ग्या .. आंगवर ऊन पडनं आनी खुशाल गोधडीमा पडनात ? ” … सरुनी नवराना तोंडवरनी गोधडी सरकन् व्हडी लिनी .. तवसामा चिंधा खवयनाच ना तिनावर हो . ” ऐ ‘ येडी बिडी झायी का वं तु ? का डोकं बिकं फिरी गयं तुनं ? ” तवसामा सरू बोलीच पडनी ” वं ऊठा वं ‘ तुमले काई कायजी बियजी शे का नई ? वं पोया ना सन तोंडवर ऊना ‘ तुमले दखात नई का ? ” तवसामाते तो चिंधा लगेच बोली पडना ” तोंडवर ‘ दखाड ‘ कथं शे ? दखात ते नई माले तुना तोंडवर ? ” चला ss ‘ उठा माय तुमले ते थट्टाच सूचस . उठा गोधडीमाईन निंघा भाहिर या . ” चिंधा मस्त सवरी सावरी बसना बोल काय म्हननं शे तुनं ? ” अजुनबी तो आयोखा पियोखा दी राह्यंता . ” बोल ना वं काय परेड शे तुनी आखो ? ” . ” ल्या मनी हाई परेड ऊनी का ‘ ? वं माय वं ‘ काय म्हनु मी तुमले . ” ” वं सांग जल्दी काय ते ? ” ” वं मी म्हंत तीन दिन वर पोया ऊना . सहेरमा जा बैलेसना आंगवरनी झुल ‘ बैलेसना गोंडा ‘ घुंगर घाट्या गयामा . पुलेसन्या माया ‘ शिंगडासले लाल रंग नी हिंगोईनी डबी . कदी लईश्यात वं तुमीन . लोकेसना सनबजार कराई ग्या . आना तुमीनना तुमीन अजुन गोधडीमाच शेत ” . सरुना तोंडना पट्टा ऐकीसन चिंधा बोलनाच ” बापरे .. बापरे ..! काय तुना तोंडना पट्टा चालस वं ? ” तर मंडई सरू नं बोलनं नेंबन व्हतं . पोया हाऊ शेतकरी राजा ना मुद्दाना त्यासना बैलेसना सन . सरावन महिनानी आमावस्या म्हंजी बैलेसना पोया … साल भर म्हातला बैलेसना महत्वाना सन . पन मंडई ‘ बैलेसले तरी कोठे माहित शे हाऊ त्यासना सन शे म्हनीसन . बिचारा त्या मुक्का जनावरे . हाई आपनच बठ्ठ लाई ठेल शे . त्यासले कसाना सन आनी कसाना काय ? बैलच ‘ त्या आपुन नई ते म्हंतसच ना ” पक्का बैलना जात ना शे . . ” तर मंडई या एक दिन त्यासले त्यासना कामेसले इसावा देवाना दिवस . साल भर बिचारा राब राबतस तो शे म्हनीसनच शेतकरीसनी मजा शे बरं ! नई ते बठ्ठा खकाना ..! वावरे कितला बल्ला खल्लासना आंगे राहतस . बैले जुपेनका चालनात वावरमा . कोना जीववर ? बैलेसना जीववर . वावरमा झाडना सावलीमा त्यासले बांधी दिनं का चारा ‘ कडबा टाकी देवाना ‘ पानी बिनी दखाडी देवानं ‘ नी परत थोडासा ईसावा देवावर त्यासले वखराले ‘ पेराना कामले जुपी देवानं . वरतीन पुरानाना रपाटा देवाना ‘ आर ना गोधा टोचाना ‘ गावठी गाया बी टिकाडाना ” बैना पायाना मारू ईसनी पाया नी .. ” तर बिचारा ढोर ना मायेक काम बी करतस. त्यासले कयतं ते कोल्हाई नई देतात का त्या ? ” पन मंडई शेवटी त्या मुक्काच जनावरे शेत . त्यासले कदी ये वर चारा नई भेटना ते त्या बी अडाई बठतस बरं ! मनमा न म्हंतस व्हतीन ” अरे ‘ व्हय तथ्था ‘ पाठ वर पुराना टाकी टाकी मनी पाठ शेकाई टाकी . पक्का मानुसना जातना शे ” वरथीन कामले जूपस ‘ पुरानं टाकस आंगवर ‘ आर टोचस . ” दखस का आर टोची टोची कितली पाठ मनी रंगतनी करी टाकी ‘ ? ” त्याले जर कयतं तर बोला बिगर राहताच नई . पन काय करी . मुक्क जनावर . तर मंडई हाई सर्व ईसवीसन शेतकरी सरावन महिनानी आमावसना पोया नी वाट दखस . त्यासले त्या दिन मस्त नदीवरथीन ‘ हाय वरथीन ‘ धुई ‘ चोयी आंतस . त्यासले चारा पानी दखाडाई गये का त्यासना शिंगेसले हिंगोई ना लाल रंग लावतस. पाठवर डबीना झाकनवर गोल गोल नक्षी निया ‘ पीवया रंगनी काढतस . त्याना गयामा घुंगर घाट्या बांधतस . शिंगेसले फुग्गा नईते बाशिंगे पन बांधतस . पाठवर रंगीबेरंगी झूल टाकतस . पायसमा घुंगरू ‘ फुलेसन्या माया ‘ असं मस्त सजाडतस . त्या दिन त्यासले पुरा दिन आराम म्हंजी आराम . पोया हाऊ खास त्यासना पूंजाना सन . संध्याकायले मालक नवा कपडा घालस . डोकावर टोपी . हातमा त्या दिन पुरानं नई लेत तो . मंग बैलेसले गावना दरजा जोड़े लई जातस . आख्खा गावना एक से एक बढिया ढेलारी शिंगडा वाला बैले सजाडी सुजाडी येल राहतस . वाजा डफडा पिंगान्या सना ताल चालु राहस . मानसे फेटा टोप्या नवा कपडा मा रुबाब मा सोयताले बैल ना बरोबर मिरावत राहतस . त्या दिन बैलेसना मान रास . त्यासले वाजत गाजत मिरवणुक आख्खा गावम्हाईन काढतस . घर आनतस . घरनी सवासिन नी आंगनमा खाट टाकेल ऱ्हास . खाटवर झोऱ्या ‘ झोर्‍या वर गहु ना दाना ‘ जुवारी ‘ बाजरी जे पन काय व्हई ते . पुरननी पोयी ना नैवेद्य . बैले घरना मालक वाजत गाजत घर आंतस . सुविसिनी त्यासना वरथीन पानी ववाडस . पुंजा करस . आनी बैले मंग पुरननी पोयीना नैवेद्य खातस . सुवासिनी बैलेसनी पुंजा तर करसच पन त्यासले वंदन करस . अशीच कायम तुमनी साथ राहू द्या . बैलेस ले काय समजस ? पन मान हलाईसन गयान्या घाट्या घुंगरुना आवाजथीन साथ घालतस . बैलेसले जर समजतं तर त्या मनमा न मनमा एक मेकशी बोलतात ” कायरे बये काय शे रे ? आज आपले आराम भेटना . पुरन पोयी खावाले भेटनी . आनी विशेष म्हंजे आंगवर एक बी टकोरा नई भेटना . आखो म्हंतात बये आज आपले धोये ‘ चोये ‘ कारे या मानसे येडा तं नई व्हई ग्यात रे ! ” म्हंजे बैलेसले समजतं तर मनमा न मनमा असा ईचार करा बिगर राहतात नई . पन आखरी बैलनीच जात पडनी ना ती . ? बैलच विचारा !

nn

#पोळा

nn

पन काई बी हो सालभर राबतस त्या . सालना कष्टा मुयेच आपले वावरेसमा सोनं पिकायेल दखास . आपले जग दुनियाले खावाले भेटस. या मांगे या बैल राजानं कष्ट शे . हाई इसरता येवाव नई . म्हनीसन पोया या सनले त्यासनी उतराई व्हवानी हाई संधी आपुन लेतस अस्सच समजा . त्या विचारा मुक्का जनावरेसले काय माहित ? पन बेलेसनी पुंजा कराना हाऊ दिवस पवित्र सरावन महिनामा आमावस ना दिन येस हाई भाग्या नी गोट शे गड्यासहोन .

nn

बैले आते तसा कमी व्हई ग्यात . शेती कमी व्हई गई . सिमेंटना जंगले उभा राही राहयनात . आते वाईट वाटस . शहरी करन मुये पारंपारिक सन ‘ उत्सवनं महत्व दिनपर दिन कमी व्हत चालनं . प्रगती विकास ‘ होत राहो . मानुसनी आपला परांपरागत सन उत्सो इसराले नई जोयजे . त्याना मांगे आपला पूर्वजनेसना निश्चितच चांगला हेतू व्हतात . . पन काई बी म्हना याच पोयाना सन पासीन मव्हरे गनपती उत्सो ‘ दसरा ‘ दिवाई ‘ सकरात ‘ असा गंजच सन गोया व्हत जातस . म्हनीसन म्हंतस ….

n

” पोया ‘ सन करी गोया . ”

n

विश्राम बिरारी ‘ धुळे ‘ .

n

9552074343 …….

n

#Indian_ox_festival

n

#ox

n

#indian_festivals

n

#khadeshi

n

#Ahiraniblog

n

#पोळा

n