पडना माले असा गुंता जगत वागस मी असा कोना गुंता
ज्योशिबा संस्कार
पडना माले असा गुंता,
जगत वागस मी असा कोना गुंता..
असा प्रश्न माले पडस,
काबर असं यी घडस..
जरी म्हनस मी नही माले खेत- ना खंत,
पन झायात कसा लोके परका नी शांत..
सोडनं पडी तुम्हले आम्हले हाई कोडं,
इच्यार करना पडी काबर जीवले जोडं..
येरायेर संगे हासीखुशीथून जगा वागा,
बांधूत आदर आपुलकीना कटबन पक्का धागा..
अशी कायजी आस्थाथून सरी चालनं वरीस,
देवबा, बनाव हरेकले आनंदी उत्साही परिस…
सुटू-तुटू दे मीपनानी सोतापूरती कुरघोडी,
उभारी उम्मेदना परिसथून वाढो येता सालम्हा गोडी…
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले