दिन दिन दिवाई khandeshi Ahirani Diwali
मंडई ‘ दिवाई उनी हो ss ‘ दिवाई ऊनी .. तुमीन म्हंशात बये कथी शे ? अहो ‘ हाई कोन हो ‘ दिवाई दारशे उभी शे ‘ असं काय करतस ? वसु बारस पासुन सुरू व्हई गयी दिवाई . आते भाऊ बिज लोंग पाच दिवस हाऊ दिवाईना भारत म्हातला मोठ्ठा हाऊ आपला सन सुरु झाया .
आनन लई येनारा नी आनन देनारा हाऊ दिवाईना सन शे मंडई . हाई प्रकाश पर्व शे . अंधाराना जीवन म्हाईन प्रकाश कडे लई जानारा हाऊ दिवाईना सन शे मंडई . आननमा ऱ्हा ‘ भेदभाव इसरा ‘ वाईट पर्वना अंधार व्हयेल शे आते चांगला सद ईचार ‘ स्वच्छ निर्मय इचार लिसन दिवाई साजरी करानी शे मंडई ‘ बरं का ..!
वसु बारस ले हाई दिवाई सुरु व्हस . वसुबारस ले गाय गोऱ्हानी पुंजा करानी . आपला शेती प्रधान देश से . गाय गोऱ्हा यासना मुयेच शेतीना कामे व्हतस . गायले हिंदु संस्कृतीमा पूज्य मानतस . म्हनीसन दिवाईना सन वसुबारस पासुन सुरु व्हस . बसु बारस झायीका धनत्रयोदशी येस . या दिन ध्वनंतरी देवीनी पुंजा मांडनी पडस . ती कशी मांडतस ते आपुन दखुत . पहिले पाट मांडाना . पाटवर लाल मद्राना कापड टाकाना . पाच ईडासना पाने एक कयस लेवाना त्यामा अध्धर रचाना .
ईडासना पाने म्हंजी चैतन्याना रुप शेत . दोन आखो येगया ईडासना पाने लेवाना . त्या पाटवर मांडाना . एक पानवर लाल कुकु टाकाना दुसरा पानवर हयद टाकानी . आनी काडी वर लाल कुकु ना पानवर शुभ या अक्षरे कोरानात नी पिव्या पानवर लाभ या अक्षरे कोरानात . आखो आपले धना लागतीन .
आख्खाला धनासना दाना लेवानात . त्या पुंजा साठी आख्खा धना म्हंजी धन्वंतरी देवना प्रतिक शेत . विष्णु हरीना १२ वा अवतार म्हनीसन या धनासकडे देखतस . मंग लाह्या ‘ बत्तासा ‘ कुबेर देवताले ‘ धन्वंतरी श्री हरी यासले पांढऱ्या वस्तु भलत्या आवडतीस . म्हनीसन लाह्या ‘ बत्तासा ना प्रसाद ठेवना पडस . मंग माटीना धाकला धाकला कुंभारना घरतीन माटीना बोयका आनाना . त्या बोयकासमा धनाना दाना भराना . नी बत्तासाभराना .
धन्वंतरी देवीले चांदी पित्तयना भांडा नई आवडतस . माटीना बोयका ‘ माटीना दिवा ‘ पनत्या ‘ याच जास्ती प्रिय शेतीस . धनतेरसना आनी दिवाईना पर्वमा मीठ आनानं . मीठ हाई सुख समृद्धी आनस म्हने बरकत ऱ्हास असं जुना लोके सांगेत . आनी आपला घरले ऐश्वर्य लई येवाले मदत करस . म्हनीसन धनत्रयोदशी ना दिन मीठ विकत आनाले जोयेजे . आखो त्या दिन केरसुनी ‘ झाडनीले पन भलतं महत्व शे मंडई . झाडनी घरना केर कचरा काढस . घर स्वच्छ ठेवस .
आपलं आरोग्य चांगल राव्हाले मदत व्हस . घर आवती भोवतीना परिसर स्वच्छ ते आपलं आरोग्य चांगल ऱ्हास म्हनीसन झाडणी ‘ केरसुनी हाई देवी ले बहु प्रिय शे . मंग हयद कुंड ‘ बारीक सोपाऱ्या ‘ तांदुय ‘ हयद ‘ कुकु ‘ बठ्ठ्या पुजान्या वस्तुका मांडान्यात . भगवान विष्णुले ‘ पिव्या रंग भलता आवडस . म्हनीसन भगवान विष्णुनी पुजा धन त्रयोदशीले भलतं महत्व शे . गणपतीनी मुर्ती आनी कुबेर दिवा मांडीसन परिसर प्रकाशमान कराना . जेने करीसन घरम्हातला अंधार ‘ नष्ट व्हस . प्रकाशमान झगमगाट घरमा दखास .
आते लक्ष्मीपूजन बद्दल दखुत आपुन . अश्विन महिनामा कृष्ण पक्षामा देवीले नैवेद्य ‘ देवानी प्रथा शे . लक्ष्मी देवीले अंधःकार अप्रिय शे . देवीले लख्ख प्रकाश भलता आवडस . या दिन झापाटामा पाहटे उठीसन अभ्यंग स्नान कराले भारी महत्व शे . आंग सुगंधी उटणे लाईसन चोयी चायी धुईसन तयार राहो . त्या दिन पाट मांडाना ‘ त्यानावर लाल मद्रा टाकाना . तांब्या ‘ कळस मांडाना त्यानामा पाच नागिनना पाने रचाना . शेंडी वालं नारय कयसवर ठेवानं .
देव्हारा म्हातला गनपती बाप्पा मांडाना ‘ गनपती नी पानीवरी आंग धोवानं . हयद ‘ कुकु ‘ तांदुय ‘ चंदन लाईसन पूंजा करानी देवी लक्ष्मी नी स्थापना करानी . पारंपारिक पद्धत खाले देवीनी पूंजा करानी . आरती करानी आरती म्हनानी . मातर या पुंजाले बठ्ठासले बलावनं . बत्तासेसन प्रसाद लक्ष्मी पूजनना दिन वाटाना . प्रसादले या दिन भारी महत्व शे . गोड मीठाई वाटानी . हाऊ दिवाईना मुहूर्त म्हंजी साडे तीन मुहूर्तना सन शे . म्हनीसन या दिन नवीन वस्तु ‘ गाडी ‘ बंगला ‘ घर ‘ सोना चांदीना दागिना खरेदी कराले भारी महत्व शे . पन लक्ष्मी काई म्हनत नई तुमीन खरेदी करा म्हनुन हाई लाई ठेल शे . साडेतीन मुहूर्त शे या सनले. ज्यानी त्यानी आपला ऐपत परमाने खरेदी कराले जोयजे . पन लक्ष्मी देवीनी पूजा मन पासून अगदी हृदय पासून साधा पद्धत खाल करा याले भारी महत्व शे .
आखरी मा भाऊ बीज ना दिवस येस . भाऊ आनी बहिन ना प्रेम मा वृद्धी कराना हाऊ दिवस शे . आपला भाऊ आपले माहेर लई जावाले कदय येवाव शे याना कडे बहिनना डोया लागेल राहतस .. ” माहेर जावानी माले घाई आज .. दिवाईले मूय उनं मना बंधुराज ” असं लिला ताई मराठे यासनं हाई गानं भलतच मस्त शे . ते गानं ऋचा बिरारी नी मस्त म्हनेल शे . हाऊ भावनीक प्रसंग शे . ती सासरले आपला भाऊ . कदय लेवाले ई यानी वाट दखत ऱ्हास . तिना डोया भाऊना वाट कडेच ऱ्हातस . भाऊबीजना दिन भाऊले आपली बहीन ववायस . भलता भारी प्रसंग शे हाऊ . . .
दिवाईनं पर्व आपला भारत वर्ष मा फार महत्व सांगनारा शे . आनन देनारा नी आनन लेनारा . आनननी उधळन करनारा हाऊ सन . गोडधोड ‘ एकमेकले ‘ गळाभेट लेवाना हाऊ सन शे . दीप दीपावली ‘ प्रकाश ‘ स्वच्छता ‘ प्रकाश देनारा ‘ प्रेम देनारा ‘ गोडधोड ‘ खावाना ‘ नवीन वस्तु खरेदीना ‘ मीठाई वाटाना प्रेम आनन ना हाऊ मोठा मोठ्ठा सन शे .
पन मंडई ‘ ध्वान प्रदुषण का म्हंतस ना त्यानी कायजी लेवाले जोयजे . कानठया बसनारा फटाका सुतया बॉम्ब फोडीसन कोनले तरास व्हनार नई यानी कायजी लेवाले जोयजे . जेष्ठ म्हातारा लोके ‘ बाय बायंतीन बाई ‘ धाकलसं नुकतच जल्मेल लेकरू ले तरास व्हनार नई यानी कायजी लेनी जरूरी शे .
आखो मुद्दानी दुसरी गोट ते राहीच चालनी व्हती . ज्या झोपडामा गरीबना पोरे उघडा नागडा फिरतस व्हतीन त्यासले आपला म्हातला कपडा लेनं जरूरी शे . त्यासले आपला दिवाईना फराय लाडु ‘ शेव पापडा ‘ करंजा ‘ चकल्या हाई घरोघर जाईसन देवाले जोयजे . त्यासले गोड पक्वानांनी मिठाई देवाले जोयजे त्या बी गरीबना पोरे आपला पोट मा बयाले जायतेत . असं मनं म्हननं व्हतं . आपुन पुढे व्हईसन त्यासना आंसू पुसाले जोयजेत . तर खरा अर्थाखाल आपन दिवाई साजरी करी असं व्हई .
बरं तर मंडई ..!
राम राम … तुमले बठ्ठासले दिवाईन्या शुभेच्छा आनी चुल्हाले पन आमंत्रन ..!
या मंग ..!
विश्राम बिरारी ‘ धुळे 9552074343