दसरा करा हासरा नी मांगल बठ्ठ इसरा
दसरा सण मोठा, नही आनंद ना तोटा… काय दिन होतात भो त्या… पोया नी सण कये गोया.. पोया पासुन, गणपती बाप्पा, मंग नवरात्र,मंग दसरा… फाटेल तुटेल ठीगय लायेल कपडा ह्रायेत, पण माय त्या मस्त धुयी टाके, नीळ मा बनडायीसन सुकाडाले टाकी दे… नी सुकायनात का मंग आम्हनी सर्कस चालु व्हये, कपडास्ले इस्तरी कशी मारो? आम्हना वाडा मजार नवल दादा कडे कोयसानी इस्तरी व्हती, बिचारी दमोता माय मांगीन तेल्हे दी टाके. नही ते मंग पित्तयना तांब्या मजार इस्तो भरा की इस्तरी मारुत. तस आम्ले कयन तदलगुन सयीन कुडची ह्राहे, नी चड्डी बी सयीन नी ह्राये… नदारी नी होतुत म्हणीसन सायम्हायिन एक धव्वी हारकनी कुडची, नी जाडीजट खाकी नी चड्डी भेटे… तरी बी काय सुख व्हत भो ते…
आबुट ना पाला न्या डक्सा न डक्सा तोडी लवुत, बठ्ठा गावमा सोन वाटन पडे. दिनमाव्हतले गावमा दसरा ना दिन जत्रा सारख माहुल ह्राहे. धल्ल्या आज्या वट्टावर, कोणी जोत्रावर बशेल ह्राहेत, वाटीम्हा निमलेट न्या गोया, नही ते मंग साखर फुटाना भरेल ह्रायेत… बठ्ठा गावमा पाया पडाले जाऊत, पार कुयीवाडा, बौद्ध वाडा, प्लाट… धल्ल्या आजीन्या पाया पडनुत का मक्कु लेत… सकायले पयले महादेव ना मंदीर मजार जीवारीना तोटा, सोन चढावुत मंग गावमा फिरूत. भलती मज्या ये आनंद व्हये… आम्हना घर दिनमाव्हतले दसरान जेवण बने… माय दसराना दिन बी मजुरी कराले जाये, आम्ही चुल्ला भाणसीन पोतारी काढुत, शेण वरी घर सारी काढुत… माय दिनमाव्हतले उनी का मंग मस्त खिचडी आणि शिरा, नही ते मंग खिचडी आणि कणीक नी बर्फी ह्राये… आते ते ती बर्फी दिसत बी नही… आते न्या बाईस्ले येव्हाव बी नही…. टी व्ही नही, मोबाइल नही, म्हनीसन गावले गावपण होत, गल्ली मजार एक रेडु ह्राहे… तेन्हावर गर्दी पडे…
आते गावमा गावपण ह्राहेल नही, सयर नी बठ्ठा सण भस्मासुर सारखा गी टाकता, आते खिचडी रोज ह्रास, गहू नी रोटी रोज ह्रास, तव्हय सणेदिने भात, खिचडी, गहु नी रोटी खाव्हाले भेटे. म्हणीसन तेन्ही बी किंमत व्हती…. माणस गुयीचट व्हतात, आते बठ्ठा माणस पुयीचट हुयी ग्यात, तव्हय खटकू खटकू नी मव्हतात व्हती, आते पयसाले किंमत ह्राहेल नही, नी माणुस्नी किंमत ह्राहेल नही… सणवार गावखेडास्मा आते गुचक्या खायी ह्रायन्हात, सयरमा फॅसन व्हयी गयी… काय ते येन्हामुये गावन गावपण, माणुसन माणूसपण रांडायी चालन… सग्गा रंगतमास ना माणस दुर चालनात, बहिण भासा आंतर पडत चालन, सग्गासनी किंमत नही ते, आप्ला सारखास्न काय? तरी बी जुना खोडस्नी हायी टिकाडी ठेल शे, म्हनीसन टिकेल शे.
आते हायी बठ्ठ आसज उसन टिकेल ह्राहीन. पण कस का व्हये ना टिकाडन पडीन, हेलाले दसरान मरण चुकाव नही…. मस्त जगा, मानुस्न कव्हय काय हुयीन भरोसा नही मन निथ्थय नी निर्मय ठेवुत, जीवन परतेक दिन हासरा कसा हुयीन, मन मजारल जयमट कस काढीसन इसरता यीन येन्ही हाऊ दसराले सपथ लीवुत, जेस्ना संगे अबोला व्हयीन, तेस्ले अचानक घर जायीसन सरप्राइज दिवुत…. आणि हाऊ दसरा, नी जीव मा जीव शे तदलगुन येणारा परतेक दसरा हासरा करुत…. पण मन मोठ आणि मोके करीसन आज बठ्ठ मांगल इसरुत…… आप्ले आप्ला परिवारले दसरान्या ह्रिदयमाइन आभायभर हार्दीक शुभेच्छा!
त्रिवेणीकुमार….
❤️❤️