तू अहिरानी मी अहिरानी
” तू अहिरानी… मी अहिरानी ! बोलुत गोड गोड अहिरानी
लिखुत वाचूत अहिरानी! जसी अमरीतनी फोड अहिरानी”
राम राम मंडयी… मंडयी मायन्यान भो कालदिन मन्ही शेंडी भलती गरम व्हयी गयथी.मातर येय वखत दखी माले तव्हय तो राग आवरी ल्हेना पडा. त्यान्ह आसं झायं मन्हा जोडीदार सदु बाप्पूकडे वाढदिनना कार्यक्रम व्हता. माले बलायेल व्हतं म्हनिसन तठे गऊ. तठे बरीज मंडयी जमेल व्हती.समधा खान्देशी मातर तरी काही जुना पंडीत कविस्ना मायक आवघड आवघड सब्दे वापरी मराठी बोली -हायंतात. २/३जण तठे येयेल यु.पी. वाला ठेकेदारेस संगे धेडगुजरी हिंदीम्हा बोली -हायंतात. यक कोपराम्हा बसेल म्हतारा तवढा अहिरानी बोली -हायंतात. जसी माय अहिरानी कोपराम्हा दडी बसेल व्हती.
बाप्पूनी माले जोगे बलाये. तठे जमेल मंडयीले मन्ही वयख करी दिधी. त्यान्ही सांग हाऊ मन्हा लंगोटी यार रमा तो भी मन्हामायकज खेडाम्हा मास्तर व्हता.आते रिटायर व्हयेल से. मातर तो रिकामा काही बसस नही भो. अहिरानी कथा, कविता लिखस. पुण्यनगरीम्हा ” मायन्यान भो ” हायी अहिरानी सदर चालाडस. म्हंजे अहिरानी स्तंभलेखक से. त्यान्ह आप्पान्या गप्पा हायी पुस्तक बी छापायेल से. ते आयकीसन मंडयी मन्हाकडे मिटी मिटी दखाले लागनी. काही तं फिदी फिदी हासाले लागी गयात. यक शहाना हाड्यानी इचार, ” काहो तुमच अहिरानी सदर कुणी वाचत का ? तुमची १०/१२ तरी पुस्तके विकली गेली का? जग चंद्रावर चालले. लोक मराठी सोडून इंग्रजीकडे धाव घेत आहेत. तुम्ही माञ उलट्या दिशेने धाव घेत आहात. ”
बाकीनी मंडयी खो खो करी दाथडा काढाले लागनात. मंग मातर त्यास्नाकडे डोया वटारी दख नी वरडनू गुच्चूप बसा. दाथडा काढू नका. आरे तुमी मन्ही नै तं तुमनी मन्ही मायनी थट्टा करी -हायनात.आरे तुमी मराठी हिंदी इंग्रजी कधीपासीन शिकनात भो. तुमना जनम अहिरानी घरम्हा व्हयना. तुमनी पाची बारस अहिरानीम्हा झाय. माडी माडी करी बोलाले शिकनात.तुमनी माय तुमले झोपाडा गुनता अहिरानी गाना गाये. तुमना लगीनम्हा अहिरानीम्हाज दायंडा पाडा व्हयी. ” इसनु किसनू कांड्या भरे, रायरुख्मीनी पोयत करे ” ते समध तुमी इसरी गयात. देढ पयसान्या नवका-या करतस, बेपार करतस म्हनिसन सायबी रुबाब दखाडी -हायनात का भो. आरे तुमी धा इस डोक्सा इनामले इसरनात म्हनिसन समधा खान्देशी थोडाज अहिरानी मायले इसरी गयात ! आरे कोन म्हनस अहिरानी बोलीनीले वाचक नहीत ? कोन म्हनस अहिरानी वाचता येत नही. आरे मन्ह “मायन्यान भो” सदर वाचीसन दर ऐतवारे शेपन्नास फोन येतस.शहादा,तयोदा,नवापुर, साक्री, शिरपुर, नंदुरबार, अमयनेर,धुये आसा समधा तालुकाज म्हाईन फोनवर फोन यी -हायनात. तुमी जपम्हा सेत का? काही गावेस्ले तं सार्वजनिक वाचनालयना शो केजम्हा मन्हा अहिरानी लेख लायेल सेत म्हने.
मंडयी माय भाषाम्हा सुखदुखनी गोट नेंबन सांगता येस. कुनबीस्ना दुखना, शेतीनी अवकया, गरीह हारीबेस्न्या आडचनी नेवनेटक्या मांडता येतीस.सरकार दरबारे ग-हाना मांडता येतस. खेडाम्हाना भाऊ बहिनीस्ले आपली भाषाम्हा आपल दुखड कोन्ही तरी मांडी -हायना हायी दखी आनन व्हयी -हायना. मन्ह अवसान दखी दात काढनार मंडयीनी दातखीयी बसी गयी. त्यास्नी सदू बाप्पूना नातुन कोड कवतुक करी घरनी वाट धरी ल्हीधी.
तुमले मन्ही इनंती से, तुमी मराठी इंग्रजी बी शिका मातर मायबोली अहिरानीनासंगे इमान राखा. बोली भाषाना इकास व्हयना तरज खान्देशना इकास व्हयी. हायी गोट ध्यानम्हा ठेवा.
…. अमरीतनी फोड अहिरानी !
रमेश बोरसे ( अहिरानी स्तंभलेखक )