तुले ना माले अहिराणी कथा
” तुले ना माले – – – – – ? ”
दखा मंडई ‘ गरीबी भलती वाईट राहास ‘ नईका … पन तुमीन म्हंशात ” हाई का तु नवाईन चाव्वी राहयना का तु ? ” खरं शे तुमनं म्हननं . पन काय शे घर मा अठरा इशवे दारिद्रि का काय म्हंतस ना ती गरीबी कायमनी गरीबी जशी पिढी जात शिरीमंती ऱ्हास तशीच त्यासना आजोबा ‘ पंजोबा ‘ या गरीबीमा वाढेल ऱ्हातस . दुसरासना घर सालदाऱ्या ‘ करान्यात ‘ कोनी हमाली करानी ‘ कोना वावरमा जागल्यानं काम करानं ‘ आनी झोपडामा ‘ वावरमा ‘ नईते ‘ पतरा टाकेल घरमा वरतीन बदबद पानकायामा गयस ‘ नई ते थंडी ना दिनमा कुडकुडीसन पडतस . तसा घरेसमान आपला उघडा पागडा पोरेसना संसार पीढी जात चालु शे जशी पिढी जात शिरीमंती तशी हाई पिढी जात गरीबी . काय करतीन त्यासना नाशिबमा तेच वाटाले येल ऱ्हास ‘ त्या बी काय करथीन हो ? शिकसन नई ‘ शायमा जावानं माहित नई ‘ दुसराना ढोरे – ढाकरे . नदीमा नई ते हायवर लई जावानं धोई आनाना ‘ त्यासले चारा ‘ पानी दाखाडाना ‘ निदान त्या कामे करीसन तरी पोट भरतीन . पन काई काई धाकल्ला पोरे ‘ मायन्यान कदी भो थंडी मा उघडा ना पागडा फिरतस ‘ हो . त्यासले थंडी कशी कुमचाडत नई हो ? हाई बी इचार करा सारखी . बात शे ना हो . ईश्वरनीच लिला शे हाई बठ्ठी ‘ नई ते काय ?
आते हाईच दखा ‘ दोन पोरे बये कद्दयसना भितवर तनगी राह्यंतात . त्यासना आंगवर धड कपडा बी नई व्हतात हो . त्यासना मायबाप ना पत्ता काय व्हई कोन जान ? पन त्या कव्वयसना भितवर तनगी राहयंतात . त्यासना कवयस ना तरफडा चालु व्हता भितवरथीन चढीसन मझार काय चालु व्हतं हाई दखा करता . भलतच कवयसनी कायपात करी राह्यंतात . पन एकना डोकामा उनं ” दख गड्या ‘ तु असा हेगंडा व्हई जाय ‘ मी तुना आंगवर ‘ उभा राहीसन दखस तवसामा तो आल्लायनाच ” अरे व्हय रे तथ्था बाजीराव ना पोटना ‘ मी हेंगडा व्हवू आनी तु मना पाठवर उभा राहीसन भीतवर तनगीसन मझारनी गम्मत दखशी ‘ वो भो असं नई चालाव बरं ‘ सांगी देस तुले ” . त्यासनं असं कवदूर सुरु व्हतं . पन त्यासमा काई एक ईचार व्हत नई व्हता . त्या उखल्लावर बशेल व्हतात . दोनीसना हातमा जरमेलन्या बोगोन्या व्हत्यात . त्यासना बाजुले त्या वखल्लावर मज घान पडेल व्हती . तठे उखल्लावर डुकरे ‘ कुतल्ला ‘ गधडा फुर s फुर करी राहयंतात . मी . मनमान मनमा म्हनु बये ‘ या पोरेसले माय बाप कोनी व्हई का नई ? नाता गोताना ‘ माम्या ‘ मावश्या ‘ काका चुलता ‘ कोनी व्हतात की नई का बेवारस व्हतीन ते देवबाच जाने . पन मातर त्या भितवर टनगाना कव्वयसना एकमेकवर कुरघोडी करी राहयंतात . हाई मातर गोट खरी व्हती . त्यासना पोटे चांगला खपाटे लागी गयथात . त्यासना बये गालफटा बी बशेल व्हतात . त्यासना आंगेसले कदीसनं पानी लागेल व्हई ते देव जाने . आंगवर बुरशी चढेल व्हती . मन मन चर बशेल व्हता . काय करथीन माय मावशी ऱ्हाती ते आंगे चोयी चायी धोयी धोयी ” अरे मना दादा तु ” असं म्हनीसन फेनावरी रगडी रुगडी आंगो चोयी चायी धुई देती . पन त्या मन ध्यान बेवारस दखाई राह्यंतात . गरीबना पोरे दखाई राह्यंतात . हाई गोट मातर तव्हढीच खरी बरं !
पन माले बी समजी नई राह्यंत यासनं काय चालु शे बये ‘ तवसामा ते वाजा ‘ ढोल ‘ ताशाना . डी जे ना आवाज कानवर पडना . तवय मना ध्यानमा उनं ” अरे ‘ म्हंत ‘ बरोब्बर ‘ आज लगीननी तीथ शे . टायी लागनी का पंगती उठथीन ‘ त्या आशा खाल त्यासना हाऊ तरफडा चालु व्हता . पन मंडई बये ‘ या पोरेसकडे दखाये नई हो . दोन उष्टा पत्तर वाईना घास भेटा करता कव्हढा हाऊ तरफडा त्यासना . व्वारे मना स्वतंत्र भारतना या भविष्यना रत्ने . ? हाऊ च आपला खरा भारत शे का ? मी मनमान मनमा ईचार कराले लागनु ? उच्च्या उच्च्या माड्या ‘ मार विकासन्या गप्पा ‘ आनी हाई चित्तर दखीसन खरा भारत हाऊ शे आपला यानी खातरी पटनी .
तवसामा एक त्याम्हातला कसा म्हनस सुक्याव बये अजुनबी वाजा वाजी राह्यनारे . टायी कवय लागी कोन जाने . आनी कवय पंगती बसतीन कोन जान ? ” दुसरा तवसामा बोलनाच ” अरे कुव्वारी पंगत ऱ्हास रे पंगती बशी ग्यात त्या नाची राहयनात . तु हेंगडा व्हई जाता ते माले दखाले भेटी जातं नई का ? बये मायन्यान कदी भो भलता सुक्काईना शे तु ” . तवसामा सुक्या बोलनाच त्याले ” दखास का ‘ मनं पोट कितलं खपाटे लागी गये ते . बये घल्ला म्हातला एकच गल्लास पानी पीसन मी येल शे . ” असं त्यासनं बोलनं चालु व्हतं त्यासले आशा व्हती . पंगती उठन्यात का याच उखल्लावर उष्ट्या ‘ खरकट्या पत्तरवाया टाकाले ‘ निदान फेकाले तरी इथीन म्हंजी इथीनच . कव्हढी आशा हाई कालदिन न्या आपला स्वतंत्र भारतना उगवता तारासनी ? मंडई हाई खरं चित्तर शे आपला भारतनं . उखल्ला वर डुकरे कुत्रा भू भू करीसन डवखी राहयंतात . असा पूरा भारतमा राज्या राज्यामा असं चित्तर दखातच व्हई मन ध्यान . असा बीन माय बापना बेवारसी पोरे कसा हालातमा फिरतस ‘ त्यासनावर प्रेममा मायाना हात फिरावनारा कोनी नई . दखीसन वाईट वाटस . खरं तर असा बेवारस पोरेसना शोध लिसन यासले प्रवाहमा आनानी खरी गरज शे .
तवसामा ते दोन जन पत्तरवायीसना ढिग उखल्लावर ठेवाले म्हना फेकाले म्हना उनात या दोन्ही पोरे त्या पत्तर वायासवर तुटी पडनात . तथा डुकरे ‘ पन डुरुक डुरुक करी राह्यतात . कुतल्ला भू भू करी राहयंतात . जनु त्यासले हाईच सांगान व्हई ” अरे यामा आम्हना बी हिस्सा शे रे पोरेसव्हन ” काय चित्तर व्हतं ते मायन्यान भो .. त्या पोरे तुटी पडनात . तो म्हने मना शे ‘ दुसरा म्हने व्हय तथा मना शे . एक मेकना आंगवर त्या तुटी पडनात . हिसकाव हिसकाव कराले लागनात . एकमेकले बिलगीसन धरा धरी कराले लागनात . तो खाले ते दुसरा वर गडबड गडबड त्या उखल्लामाच लटका लटकी कराले लागनात . तवसामा तठे एक जब्बर कुत्रा व्हता त्यानी त्या डुकरेसवर भुकीसन हाकली दिन . आनी त्या पत्तरवायी वर तुटी पडना . बये वस् वस् तव्वयच पुशी ग्या . हुस हुस करत पुशी पाशी मोक्या व्हईसन जीभ चाटी चूटी मोक्य व्हई ग्या . आनी भिन्नाट कथा नबेदा व्हई ग्या पत्ताच लागना नई . यासनी बिलगा बिलगी थांबनी दखतस ते काय पत्तर वाया सवरना उष्ट खरकट उरेल भात न्या कन्या आथ्या तथ्या पडेल व्हत्यात . पुडीना तुकडा बी तो कुत्रा उष्ट पाष्ट बठ्ठ पुशी लई गयथा . त्या कुत्रा नी त्या दोन्हीसनी झगडामा बठ्ठ्या पत्तराया पुशी गयथा . दोन्हीजन तोंड उतराईसन तठेच बसनात . त्यासना डोया ना दखत त्यासना तोंडना उष्ट्या पाष्ट्या पत्तरवाया का व्हयेतना त्या झगडी राह्यंतात तवय तो कुत्रा साफ करी ग्या हाई त्यासना तवय ध्यानमा उनं . पन आते काय उपयोग व्हता . म्हंतस ना ते काई खोट नई …
” तुले ना माले ‘ घाल कुत्राले ” …!
विश्राम बिरारी ‘ धुळे .
9552074343 …..