तुम्हनां राजा चगी गयतां
नानाभाऊ माळी
तिन्ही इय्याघायी निय्ये गवत कापी-कुपी गाठमारी वझ बांधं!त्यान्ही भी तेचं करं!त्यांन्ही वझं उखली तिन्हा डोकावर ठेव!सोतानं वझ उखली डोकावर ठेवं!बांधे-बांध,संगे-मांगे,येरा येरन्हा मांगे दोन्ही भी नींघनातं!वरलांगें यांय बुडी ऱ्हायंता!पडता पानीमुये यांयंन्ही तोंड दपाडी ठेयेलं व्हतं!'तीं' आनी 'तो' वावरना धुराधरी,बांधवरतुन चिखूल-गवत
चेंदी-खुंदी चाली ऱ्हायंतात!ल्हायें ल्हायें पाय उखली पयी ऱ्हायंतात!घरगंम पयी ऱ्हायंतात!रात अंधारालें झाकी ऱ्हायंती!कायी घोंगडी पंघरी ऱ्हायंतीं!अंधारं मव्हरे मव्हरे सरकी ऱ्हायंत!वरतून पानींनां थंडागांर शीतडा यी ऱ्हायंतात!शेरा वर शेरा यी ऱ्हायंतातं!बांध उच्चावर व्हता!वावर खाले व्हतं!दोन्ही बांध वरतून चाली ऱ्हायंतात!दोन्ही पुरा वल्लाचिम व्हयी जायेल व्हतात!पडता पानीम्हा थंडी वार्गी सुटेल व्हतीं!पडता पानींम्हा थर्क भरायेल व्हतं!पा
नी व्हझावरतीन डोकावर, डोकावरतींन आंगवर नितरी ऱ्हायंत! नितरी नितरी डोयास्ना पापनीवर पडी ऱ्हायंत!डोया वल्लाचिंम करी अंगावरतीन खाले नितरी ऱ्हायंत!बांधन्हा जेवना-डावा आंगे, वावरेस्मझार जुवारी-बाजरी कंबर छाती वाढेलं हुभी व्हती जुवारी-बाजरीनं हुभ पिक दिखी ऱ्हायंतं! बाजरीनां पोघा देवनां पानी पी ऱ्हायंतात!वार्गीसंगे खोडाय व्हयी उचडेलपना करी ऱ्हायंतात!येरा येरल्हे ठोकायी नाची ऱ्हायंतात!या दोन्हीस्ना डोकावर वझा व्हतात!चालता चालता!पडता पानीम्हा एकदम 'तीं' बांधन्हा चिखूलम्हा पाय घसरी पडनी!'तीं' व्हझांसंगे त्यानंआंगवर जायी पडी!तो भी मव्हरे जायी पडनां!दोन्ही बांधनां उतार वरतीन रोलरन्हा चाकन्हा मायेक गोलगोल फिरी-घसरी वावराम्हा जायी पडनांत!येरायेरना आंगवर जायी पडात!गवतना दोन्ही वझा येरायेरले ठोकायी वावरमा यी पडात!कंबर छाती हुभी बाजरीम्हा, पडता पानींना चिखूलम्हा या दोन्ही पडेल व्हतात!थंडागार पानींना शीतडा आंगवर पडी ऱ्हायंतातं!बठ्ठ सामसूम व्हयी जायेल व्हतं!अंधारं पडेल व्हतं!'तीं' उठानां आवकाया करी ऱ्हायंती!उपेग व्हयना नयी! व्हता!थकेल जिवडानीं आंग सोडी दिन्ह व्हतं!बाजरी हुभी व्हतीं!कंबर छाती उभी व्हती!पडता पानीम्हा अंधारे अंधारे हुना पानींलें उक्कय फुटेल व्हता!हुभा बाजरीनां पोघा वरवर नाची ऱ्हायंतातं! दोन्ही थकेल जिवडा उठना व्हतात!कायी माटीनां चिखोलसंगे उठनात!तिन्हा डोकावर गवतनं वझ ठीस्नी त्यान्ही सोताना डोकावर वझं ठेवं व्हतं!तिन्ही नजर झूकेल व्हती!मुकी व्हती!दोन्ही चिखोल खुंदी रातांधांरें पयेत ऱ्हायनात!झुंगी धरी पयेतं ऱ्हायनातं!पयता पयता वावरना धुरा,बांध गाडवाट धरी घर भिडनात!गावमां घुसालोंग त्यास्लें कयनं नयी!अंधारांन्हा झाकनीं पुरा गावलें झाकेलं व्हतं!पानीनां शेरा वर शेरा यी ऱ्हायंतातं! घरना मव्हरे सपऱ्याम्हायीन सेपटल्यां 'ब्यां!ब्यांआं' आवाज करी कोकायी ऱ्हायंत्यात!सपरे आथतथ टिपटीप गयी ऱ्हायंत!सेपटलीस्ना आंगे शिंगडा हालावतं गावडी उभी व्हती!गवत दखी व्हडा करी ऱ्हायंती! 'तींन्ही' सपऱ्यांखाले वझ फेकी दिन्ह व्हतं आनी घरमा जायी घुस्नी व्हती!मोरीम्हा थंडगार पानीघायी आंग धोयीस्नी सयपाककले लाग्नी व्हती!ढोरेस्न नीटनेंटकं,आवर-सावर करी, चारापानी करीस्नी 'तो' भी कावड हुगाडी घरमा घूस्ना व्हता!मोरीम्हा थंडगार पानी डोकावर वतीस्नी बाहेर उंथां!'तीं' भाकरी थापी ऱ्हायंती! 'तो' चुल्हानां उब्याम्हा हात-पाय शेकी तींनंगंम दखी ऱ्हायंता!तिन्ही नजर चुल्हागंम झूकेल व्हती!'तीं' उब्यांगम दखी ऱ्हायंती!तीं एकदम बोली पडनी,"झापट पडावर रस्ताधरी तुम्हना राजा चगी गायता!"...'तो' तींगंम दखत ऱ्हायना!चुल्हानां उब्याम्हा हात शेकतं ऱ्हायंना!बाहेर पंढायनां पानीनां आवाज यी ऱ्हायंता!व्हातं पानी शेरी धरी वाट काढी पयी ऱ्हायंतं!रातनां अंधाराम्हा दोन्ही जिवडा,सवसारन्हा उगता यांयंनं सप्पन देखतं झावर गुंढयी जपेल व्हतात!
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१६ जुलै २०२४
nanabhaumali.blogspot.com