n
पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
n
!! जय बळीराजा !!
nn
चित्र माझे…..शब्द माझे….
(शेतकऱ्याच्या बैलांविषयी भावना )
n
n
सोबती
n
मित्रांनो…माझ्या पाखरांनो…
n
तुमची सोबत आहे म्हणून लढतो
n
परिस्थितीशी,,निसर्गाशी,,
n
अन आलेल्या प्रत्येक संकटांशी…
n
जगण्याचं बळ माझं तुम्हीच झालात
n
माझ्या कष्टाचे, सुख दुःखाचे तुम्हीच साक्षीदार खरे,,
n
जगणं लढणं तुम्ही मला शिकवलं
n
मी उपाशी असताना,,
n
तुम्ही देखील घास गिळला नाही
n
उपाशीपोटीच शेतात सोबतीला कष्ट झेललेत..
n
पण या गरीब शेतकऱ्याला तुम्ही उघडं पडू दिलं नाही…
n
कधी कधी कष्टाला न्याय मिळत नसतांना मी संपवायला निघालो
n
पण,, रात्र रात्र जागून तुम्ही प्रत्येकवेळी माझ्यावर पाळत ठेवून
n
मोठ्याने हंबरत मला वाचवत गेलात..
n
माझ्या डोळ्यातील आसवे हे फक्त तुम्हालाच जाणवत होती
n
माझ्या परिवाराला तुमचा आधार
n
तुमच्या साथीला कष्टाला सलाम माझ्या मित्रांनो, संख्यानो,,
n
…….दिनेश चव्हाण (DK)
n
n
९४२१५१६३८९
nn
पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
nn
!! जय बळीराजा !!
nnn
तुझ्या शेतात राबुनी माझी सरली हयात
n
नको करू हेटाळणी
n
आता उतार वयात ॥ १ ॥
nn
नाही राजा ओढवत
n
चार पाउले नांगर
n
नको बोलूस वंगाळ
n
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥
nn
माझ्या ऐन उमेदीत
n
माझी गाईलीस ओवी
n
नको चाबकासारखी
n
आता फटकारु शिवी॥३॥
nn
माझा घालावाया शीण
n
तेव्हा चारलास गूळ
n
कधी घातलीस झूल
n
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥
nn
अशा गोड आठवणी
n
त्यांचे करीत रवंथ !
n
मला मरण येऊ दे तूझ्याच गोठ्यात
n
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥
nn
मेल्यावर तुझे ठायी
n
पुन्हा एकदा रुजू दे !
n
माझ्या कातड्याचे जोडे
n
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥
nn
नको मला पुरणपोळी ।
n
मी कधी रुसणार नाही ।
n
मालक ,
n
मला फक्त एक वचन द्या ।
n
तुम्ही आत्महत्या करणार नाही !
n
आणि
n
मी कत्तलखाण्यात मरणार नाही ॥
n
n
पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
n
!! जय बळीराजा !!
n
nn
पोळा
n
n
पिठोरी अवसेला
n
पोळा सण आला
n
श्रावणाचा शेवटचा दिन
n
आनंद घेऊन आला
nn
बैल पोळा सण
n
साजरा करू चला
n
चला सजवू बैल जोडीला
n
आंघोळ घालू वृषभ राजाला
nn
रंग रंगोटी करूनी
n
शामी मुकूट शोभे शिंगाला
n
घंटा घुंगरू पट्टा गळ्यात
n
गोंडे बांधू फुलांच्या माळी घालू
n
खूरं सजवू चाळ बांधू पायात
nn
शाही झुली अंगावर चढवू
n
कासरा नवा कोरा हाती घेऊ
n
पुजा करू पुरणपोळी नैवेद्य देऊ
n
वाजंत्री वाजवून नाचत डौलाने
n
घरोघरी गावभर मिरवून येऊ
nn
बैल नाही नुसता
n
नंदी महादेवाचे वाहन
n
शाप कुणाचा साहतो
n
सजा कुठली भोगतो
n
वर्षभर राबतो
n
गपगुमान
n
धन्यासाठी कष्टतो
n
पोळा सणाला
n
सर्जा राजा म्हणून मिरवतो
nn
कवी :-
n
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
n
*चांदवडकर, धुळे.*
n
7588318543.