तुकोबा अहिराणी अभंग

तुकोबा अहिराणी अभंग

तुकोबा, ग्यानबानी पालखी

पालखी निंघनी । देहू आयंदीनी।
भेटज व्हयनी । रस्ताम्हान॥१॥

चालत चालनी । पंढरीनी वाटे।
आनन बू दाटे । भरीसन॥२॥

चंद्रभागा काठे । सरा भक्त गोया।
भक्ती भरे भोया । पालखीम्हा॥३॥

तुयसन रोप । घिद माथावर।
मोल भारंभार । वारकरी॥४॥

भजन कीर्तन । पाऊल पडेत।
देव त्या धुंडेत । विठ्ठलले॥५॥

निंघे वारकरी । सोडी दिधा मया।
त्यास्ना कयावया । करे इठू॥६॥

युगे युगे घडे । पंढरीनी वारी।
त्यान्हा हाते दोरी । समदास्नी॥७॥

उन,वारा,पानी । कसा नी फिकीर।
हात डोकावर । इठोबाना॥८॥

नाम जप चाले । राम किस्न हारी।
चुकू दे रे फेरी । मरननी॥९॥

उठा इटवर । मन्हा इठूराया।
टेकू माथा पाया । पडीसन॥१०॥

इठू तुन्हा पाये । सांगी मन्ही व्यथा।
वनू तार गाथा । जीवननी॥॥११॥

काशीकन्या लिव्हस

तुकोबा अहिराणी अभंग
तुकोबा अहिराणी अभंग