ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल

ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल

ज्यांना माल त्यांना हाल
कोल्हा कुत्रा लालेलाल!


न्यूज महाराष्ट्र गोवा नावने एक मराठी बातन्यासन चॅनेल से. त्यावर भुजबळ साहेबानी मुलाखत मी दखी. भुजबळ साहेब म्हणे,
मराठवाडामा पानीना कायम दुष्काय ऱ्हास. तठे सरकारनी अशी एक योजना सांगतस, मुंबईनं वापरेल पानी नितय पाक करिसनी मराठवाडामा वापरांले लई जावो. पण मन म्हणणं आस से नारपारना केम डोंगरवर खूप पानी पडस. तें गुजरातमा व्हाई जास. तठेंग आरबी समुदरमा व्हाई जास. हाई पानी ल्याना तुम्ही. मुंबईन वापरेल पानी लेवानी जरुडात नही पडावं. मी सूद मना येवलामा तठेंगज पानी लयनू. मांजरपाडामा मांजरपाडा एक धरणं बांध. 10 किलोमीटर नां गेडा (बोगदा) तयार करा नी येवलामा पानी लयनू. तुमना मराठवाडा तें येवला ना जोडे से लै जावा बठ पानी. जठे पानी पडस त्या राज्यांना हक्क पहिला ऱ्हास. पानी मराठवाडामा लै जावाले यी तितलं खर्च करुत. 50 हजार कोटी खर्च उना तरी करुत पन नारपारनं पानी मराठवाडामा लै जाऊत. आंखो एक गोट सांगस तापी नदीनं 100 tmc पानी आपलं से. तें आपुन उचलतत नही तें गुजरात वापरी ऱ्हायनं. तें तापी म्हानं 100 tmc पानी उचला नी मराठवाडामा लै जावा.
शाब्बास रे वस्ताद! मांगे अजितदादा पवार पठ्ठ्या बी असाज बोली ग्या,
नारपारना डोंगरवर खूप पानी पडस तें बीडमा लै जावा. लाख कोटी खर्च उना तरी तों आम्ही सरकार तर्फे करसूत.
लै जावा बठ पानी व्हडी. पन मंग आमना खान्देशनं कांय? तापी नदीना पुरा दक्षिण काठ फाईन तें थेट चांदवडना घाट लोंग हाई बठी उजाडी से. आठे पानी कोठेंग लौत.
कांय पुढारी सेत भो. आम्ही नारपारनं पानी येवलामा लै जावाले विरोध करा तवय हाईज जोडी व्हती भुजबळ साहेब नी अजितदादा. त्या म्हणेत ठीक से आमले मांजरपाडा एक नी खान्देशले मांजर पाडा दोन असा दोन धरणे बांधूत. दोन्ही धरणे संगेज बांधूत. संगेज पानी लेवूत. आते तुम्ही गुपचूप बठा. आमना लोकेसनी आंदोलन मांगे लिद. पण या दोन्हीसनी ती निस्ती चाट मारेल व्हती. मांजरपाडा एक पूर कर. पानी बी लै ग्यात तरी मांजरपाडा दोन वर एक मूठभर सिरमिट बी नही. वा रे पुढारी! मांजरपाडा एक मंजूर कर तंवय भुजबळ साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री व्हतात. नी अजितदादा जलसंसाधन मंत्री व्हतात. एवढा मोठा मंत्रिसनी खोटं बोलो काबरं?
खान्देश कसमादेन मांजर पाडा दोन इसरी ग्यात तें ग्यात आते दोन्ही बी मंत्री जोर जोर मां आराया ठोकी ऱ्हायनात, नारपार तापीनं पानी मराठवाडाले लै जावा रे भोसव्हनं. आस? नी मंग आम्ही कांय करो. आमन तापीन पानी तुम्ही आडवतस नही. आमना पुढारी कोन काई बोलत नही. हातनूर धरणं गयमा भरी गे. पाडयसरा धरणं आपूर पडेल से. गिराणा कोल्ली पडेल से. गिरणा नार नदी जोड प्रकल्प नी नार पार केम डोंगरनं पानी खान्देशनं से. खान्देशी लोक जपेल सेत आस दखीसनी भुजबळ साहेब तापी गिरणानं खोरान पानी गोदारी खोरामा लै ग्यात. बरं लै ग्यात तें लै ग्यात. त्यास्न पोट भरी गे त्या आते मराठवाडा ले सांगी ऱ्हायनात. या रे मराठवाडा वाला यां. मी खान्देशनं पानी लुटी लैनू तुम्ही बी लुटा.
महाराष्ट्रना पुढारी खान्देश आपला से आस मनातसंज नही. खान्देशना ईकास व्हवो आस कोन बोलतज नही. आपला पुढारी थंडा. आपली जनता जपेल तें मंग हाई उलगवाडी व्हवावज से.
आपला गावकडे वावरे ऱ्हातस. तठे पेरेल वावरमां काही पीक उभ से. पनं मालक ध्यान देत नही. वावरामा रोखया नही. तें मंग बकरक्या उना का घाल बकऱ्या, ढोरक्या उना का घाल गावड्या. कोणी फुटेल पय येची लै जास, कोन भुईमूग उपाडी लै जास. आसा प्रकारे तें वावर बठ उलगाई टाकतस. का कीं, मालकनाज ठिकाणा नही से.
ती गत्या खान्देशनां पानीनी से. जो उठस तों म्हणस खान्देश म्हाइन पानी उचला लै जावा मराठवाडा. मांगे जयंत पाटील बी तेज बोलें. आमन बठ पानी मराठवाडाले दी द्या मंग आम्ही कांय करुत. आंगले भबूत लाई फिरूत का रे गावे गाव?
मराठवाडामा मानसे ऱ्हातस नी खान्देशमा काय ढोरे ऱ्हातस का? बरं भो आम्ही ढोरे तें ढोरे! मंग ढोरेसले पेवाले पानी लागतं नही का? ढोरेसले चारा नी चारा पिकाडाले पानी लागतं नही का? बय साल आमनी कोनले खत्याज नही. यालेज म्हणतंस,
ज्यांना माल त्यांना हाल नी कोल्हा कुत्रा लालेलाल!
मराठीमा म्हणतस,
धन्यला धातूरा नी मालकाला मलिदा!
मुकी धरी हाक नां बोंब!
गरीबकीं बीबी सबकी भाबी.

कोनी मालकज नही आमले! एक शाहीरनी उर्दूमा लिखेल से.
खान्देश कीं सोच पगले मुशीबत आने वाली है.
तेरी बरबादी के मशावरे है जहाँ मे.
नां समजोगो तों मीट जाओगे खान्देशीयो.
तुम्हारी दास्ता तक नही होगी दास्तानो मे.
💦🌊🙏🏻🌊💦 बापू हटकर
💦🌊💦🌊💦🌊💦🌊