जोतीबानी समाजगुनता काय काय कय ? कशा कशा खस्ता खाद्यात
ते मी आते सावित्री बाईना सब्दम्हा सांगस.
सावित्री मन्ह नांव
जोतीबा मन्हा राव
नायगावन माहेर मन्ह
पुनं हायी कर्मभूमीन गाव.
माले लिखता वाचता येये नही अक्षर
मातर जोतीबानी दखाडा ग्यानसागर
समाजसेवा कराले लायीसन त्यासनी कये माले अमर.
अडाणीस्ले शाणं करा गुनता कयी आमी धावाधाव.
आमीज बुधवार पेठम्हा पेटाडी पणती
तठे खडू पेन्सील धरीसन अडाणी शाणे व्हती.
माया बहिनीस्ना शिक्षणले दिन्ही गती.
पुराणवादी समाजसंगे लढीसन रुढीचालीसवर घालात घाव
अनाथ अबलास्ले आश्रय देवासाठे बालहत्याले इरोध कया
अनाथाश्रम चालाया.
केशवपन नी वाईट चालले मुठमाती देवासाठे
न्हायीस्ना संप घडाया.
जातीपातीसन्या भिती पाडासाठे
घरना हौद महारमांगेस्ले खुला कया.
आमनं हायी मानुसकीन
वागनं दखीसन
सनातनी बोंबलेत,धर्म बुडाया धर्म बुडाया
असा ग्यानयोगी कृतिइर मन्हा
जोतीबाले
स्री शूद्रेस्नी महात्मा बनाय
त्यासना मांगे मी बी कायम
सत्यशोधक समाजन काम चालाय.
पुतया आमना उभारु नका
जयंत्या भी साज-या करु नका
पण . . स्री शूद्रस्ना कल्याणना
देयेल वसा सोडू नका !
देयेल वसा सोडू नका !
( आप्पान्या गप्पा भाग पह्यला )
सावित्रीबाईस्ले कोटी कोटी दंडवत
रमेश बोरसे
धुळें