जुना नवानां गोंधयं

जुना नवानां गोंधयं



नानाभाऊ माळी

म्हनता म्हनता नवा सलना दिन उगनाचं हो!बठ्ठासलें गुदमरेलंना मायेक व्हयी जायेल व्हतं!वरीसन्हा ३६४ दिन एक एक करी मांगे पयी-निंघी ग्यात!पन कोनजानें शेवटला दिन काबरं मिंट-तास धरी पयी ऱ्हायंता?जश्या काय तो एखादा थकेल ढोरनां मायेक चाली ऱ्हायंता!बट्ठी दुन्यानें तरसाई ऱ्हायंता!बठ्ठा त्या ‘एक’ दिनलें मांगे ढकला गुंता पानीम्हा पडेल व्हतात!एखादा मानोस मराले टेकेल ऱ्हास!शिप टाका गुंता वाट दखानं अशी व्हयी जायेल व्हतं!किद्रेलंन्हा मायेक आसं लायी बठेल व्हतात!जशी काय त्यान्ही बट्ठी दुन्यालें अंधारी खोलीम्हा कोंडेल व्हतं!कइन भाहेर इसूतं आसी व्हयी जायेल व्हतं!

दिनभर काकूंयीदी चाली ऱ्हायंती!हावू दिन कव्हयं मावंयी बवा?एखादी घूस नई ते मंग सुंसुंद्री कसी नयाम्हा घुसी मांगे-मव्हरे डोकं काढी पयेत ऱ्हास!कव्हयं वर येस!कव्हयं नयाम्हा घुससं!सासुले-सासुले मांगे-मव्हरे पयेत ऱ्हास!सिदी आसी बठत नई!तशीचं दुन्यानी गंम्मत व्हयी जायेल व्हती! ‘कव्हयं बुडी हाऊ नाक्खयं यांय?’ ‘रातना १२ कव्हयं वाजतीन?’ जशी काय नवा सालम्हा जित्ता ऱ्हायी का नई,हायी पर्जानी लेवानी जिद चालू व्हती!शेवटला दिनन्ह इतलं काबरं जबून लागस दुन्यालें?यांय किद्रेलं!दुन्या किद्रेलं!या किद्रेलस्ना मेंयनी यांयलें मोटन्हा नाडा बांधी वारलांगे व्हडी लिधा!

शेवटला दिन भी किद्रेल व्हता!धीरे धीरे वरलांगे बल्लानं तथादंडें चालना ग्या!दिनभर उजाये व्हत!बल्लानां सावलीनी अंधार व्हडी लिध!झापटं झापटं व्हयी अंधारानं राज सुरु व्हयी गे!तरी भी लोके तास नं तास मोजी ऱ्हायंतातं,’कव्हयं हया तास सरतीन कायजून?’ मांगलं मांगे टाकी मव्हरे जावानी जल्दी व्हती!

सुवास कोंडाई-कांडांई एकदावंन्हा रातनां १२ वजनात!अंधारी खोलीम्हा कोंडी ठेयेलं भूतडा नाचालें लागत ना!नेम्मन ताल धरी नाची कुदी ऱ्हायंतात!२०२३लें मांगे ठी २०२४ नां तालवर नाची ऱ्हायंतात!जूना सुख-दुःखन्हा धागा गुंढयी मांगली दारे टाकी दिन्हातं!नवान्ह मव्हरे व्हाढेलं दखी ख़ुशीनां दिन उगी ऱ्हायंता!रातनां १२ फायीन जागरनं करी नवा दिनन्ह स्वागत व्हयन!

१ जानेवारी २०२४ नां हेटला यांय वर यी ऱ्हायंता!रातभर नाचणारा,रंग चढेल भूतडा आडाधट पडेल व्हतात!ज्या रातले जल्दी जपेल व्हतात!त्या मातर रोजना मायेक उठी,आंग तोंडं धोयी उगता सूर्यदेवनं दर्शन ली
ऱ्हायंतात!त्यास्ले फरक पडेल नई व्हता!काम करणारा टाइमें-टाइम उठी काम धंदालें लागी जातंस!नव काय नी जुनं काय!जागर हटी चालू ऱ्हास!
मांगलं मांगे ठी!चांगलं ली!मव्हरे धिवसा ली चालत ऱ्हावो!चांगलं काम करी जगत ऱ्हावो!रोजनं नव साल म्हणी जगत ऱ्हावो!

नानाभाऊ माळी
(मु पो ता शिंदखेडा जि धुळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ जानेवारी २०२४