जागतिक अहिरानी दिन
आस्सा मनाडा
जागतिक अहिरानी दिन
——©MK भामरेबापु
दखा मंडई,
महाराजा सयाजीराव गायकवाड जयंती निमित्त आपीन आहीरानी दिन मनाडतस.
म्हनीन मी न्याराज पध्दतीथीन मनाडा.
आहिरानी भाषा दिन म्हंजे बठ्ठी आहिरानी संस्कृती.
मी खेडामा गवु.
तठला गरीब दोस्तारनी झोपडीमा गवू.
खाटलावर गोधडी टाकी.
दोस्तारले म्हंतं आज बठ्ठी आहिरानी संस्कृतीमा जगनं से.
चुलावर कयन्यानी भाकर सेकी.
त्या हारमा मिच्च्या भुंज्यात,पान्यापापड भुंजात.
खलबत्तामा मिच्या,लोसन,कोथमेर कांडीसन खुडा करा.
भात्यामा बांधात.
वट्टावर बठनुत.भाकरी सोड्यात.घल्लामानं पाणी संपुटमाहीन गल्लासमा वतं.
हातना बुक्कीवर कांदा फोडा.
“रावना रावना राज्य गंभीर केले..”
आसा स्लोक म्हना.
ल्या देवनं नाव मंडई,
अमृत जेवा,
या जेवाले.
बठाा मंडई आसं एराएरले बोलनुत.
बै दोस्तार हासे.
आज याले कुाय व्हई गे?आसं बी त्याले वाटनं.
बै म्हंत दख गड्या आज आहिरानी दिन से.
आपले आपली भाषा वाढावनी से.संस्कृती,रुढी परंपरा वाढवना सेतस.
बोला हारी ईठ्ठल.
म्हनीसनी जेवनुत भो.
बै खेडामा दुपारले सामसुम र्हास.फोटुक काढाले कोनी भेटना नै,
मंग खावा नंतर खाटलावर तन्नाँई दिधी.
तवय एक पोर्याले बलावं फौटुक काढा.
दूपारलुंग पिव्वर आहीरानीमा बोलनुत.
जय आहिरानी
जय खांदेश