जलचिंतनातुन जलसिंचनाकडेआणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल

जलचिंतनातुन जलसिंचनाकडे, आणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल

undefined

नार पार हा प्रकल्प अॅड काकासाहेब भोसले यांनी खान्देश वाशियांना समजुन सांगितला. ह्या माणसाने ३० वर्ष लढा दिलाय, ह्या प्रकल्पाविषयी चर्चा करतांना त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी आम्ही पाहिले. ह्या माणसाने साखळी उपोषण, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती पर्यंत लढा दिला, पण आपल्या लोकांनी त्यांना अजिबात सहकार्य तर केले नाहीच, पण हा प्रकल्प समजून सुध्दा घेतला नाही. आम्ही त्यांच्याच प्रेरणेतून आणि त्यांच्या माहितीनुसार लढा देत आलोत. पण म्हणतात ना, राजाश्रय खुप महत्वाचा असतो, तो आम्हाला मिळवता आला नाही, किंबहुना आमचे राजाश्रय सक्षम नाही.

n

आज सुध्दा बीड मराठवाड्यात नारपार घेवुन जायचा संकल्प चालु आहे, आणि आम्ही साधे जलचिंतन पण करु शकत नाहीत. उपमुख्यमंत्री यांनी बीडला पाणी घेवुन जाणार म्हणून जाहिर केले, परंतु आमचा एकही नेता ह्या विषयावर बोलत नाहीत. का हि माणसिकता आहे?आमचे विधानसभा आणि विधानपरिषद मिळून ४० च्यावर आमदार आहेत, डझनभर खासदार आहेत, पण आमचे दुर्दैव एकही नेता ह्या विषयावर बोलत नाही. जनता सुध्दा वाचुन घेते, पण समजून घेत नाही.

n

गुजरात आमच्या पाण्यावर डोलार सिटी उभारतय, मुंबई ५० वर्षे पुढील तहान भागविण्यासाठी पाणी नेतय, गंमत म्हणजे अप्पर वैतरणा मध्ये ४०० शे टीएमसी जलसंपत्ती शिल्लक असतांना, नारपार मधून मुंबईला पाणी जातय, ह्या प्रकल्पातून फक्त २० टक्के पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आहे. विचार करा मुंबई घेवुन जाणार १५ टक्के… ५ टक्क्यात आम्हाला काय मिळणार? हि वस्तुस्थिती गुजरात प्रकल्पा बाबत आहे.

n

याच्यातून गोदावरी खोय्रात ५४ टीएमसी जाणार… म्हणजे सांगायचे काय तर, घरदार आमचे पण परस्पर वाटण्या चालु आहेत, पण आपण काही बोलतच नाहीत. भविष्यातील पाण्याचे संकट खुप मोठे आहे, आणि हे स्त्रोत आपले शेवटचे आहे, म्हणुन आपण सर्वांनी खरच एकत्र यायची खूप गरज आहे. आज १० दिवस झाले,कसमादे मधील वाजुंळ प्रकल्पा साठी लढा देणाऱ्या जाग्रुत बांधवांनी निषेध नोंदवला, पण एकाही सामाजिक किंवा राजकीय महाशयांनी साधे स्थानिक जागेवर निषेध नोंदवून तहसिलदारांना निवेदन दिले नाही. आमचे रक्त का पेटत नाही, जर नार पार प्रकल्पातून आमचा हिस्सा आम्हाला हवा असेल तर आपण प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सभा घेवुन निषेध नोंदवून सरकार पर्यंत पोहचवायला हवे होते, तालुका पातळी, जिल्हा पातळीवर एकाच दिवशी एकाच वेळी निवेदन देवुन निषेध नोंदवायला हवा कारण जेव्हा आम्ही जलचिंतनाचा ध्यास घेतला तरच जलसिंचनाकडे जावुन जलमंथानाकडे जाऊ… अजुन हि वेळ गेलेली नाही, मांजरपाडा १ गेलय, गुजरातचा ५२ हजार कोटीचा निधी आणि डिपी आर तयार आहे. गोदावरी खोय्रात नारपार वळविण्यात येणार आहे, त्यांचा डीपी आर तयार आहे, त्यांचे काही सामाजिक कार्यकर्ते आणि नेते दिल्ली ते गल्लीत प्रेझेंटेशन करीत फिरत आहेत. मग आम्ही गप्प का? आमचे नेते गप्प का.?हा विषय खान्देशातील प्रसारमाध्यम, मेडिया यांनी सुध्दा उचलून धरायला हवे, सामाजिक कार्यकर्ते, जलदुत यांनी आक्रमक झाले पाहिजे, आता आपणच आपली लढाई लढण्यास तयार झाले पाहिजे… दादा, भाऊ, नाना, जिभु काहिच करणार नाहीत… त्यांना रस्यावर आणायची हिच ती वेळ आहे…. कारण आता जर आम्ही जलचिंतनातुन, जलसिंचनाकडे जावुन जलमंथानाकडे नाही गेलो, भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही हे त्रिवार सत्य आहे…

nn

प्रवक्ता

n

खान्देश हित संग्राम

n

9004932626

1 thought on “जलचिंतनातुन जलसिंचनाकडेआणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल”

Comments are closed.