गावनी गाव बये नी हानुमान बेंबी चोये
गाव नी गाव बये नी,
हानुमान बेंबी चोये!
महाराष्ट्रमां मन मन तसा मुख्यमंत्री व्हवाव सेत. कोन म्हणस अजिदादा मुख्यमंत्री व्हवावं से, कोन म्हणस सुप्रिया ताई सुळे, कोन म्हणस जयंत पाटील, कोनी म्हणस पंकजाताई मुंडे तें खुद भाजप म्हणस देवेंद्र फडणीस, पण देवेंद्र फडणीस पयले म्हणे एकनाथ शिंदेज मुख्यमंत्री ऱ्हावाव से, आते आंखो तें मत बदलाई लिद नी म्हने अजितदादा पवारलें आम्ही 5 वरीस मुख्यमंत्री करसूत.
च्यारी मेर हाई आस दांगोड चाली ऱ्हायनं! यामा एक बी सतिना लाल म्हणत नही खान्देशी मुख्यमंत्री व्हई आस. बरं पुढारी सोडा त्या घाबरतस म्हणीसन त्यासना कार्यकर्ता आपला नेतानं नावं लेवाले घाबरतस. घाबरतस यांना करता कीं, आपुन बोलनुत कीं आमना नेता मुख्यमंत्री व्हई. हाई श्रेष्ठीलें नही आवडनं तें हातमा से बी चालनं जाई. पार्टीनं तिकीट बी कापाई जाई. त्यामा आशी फुकट उपादी कराथूनं थाटीमा से तितलज लाई लाई खावो. त्यामा जो तों खान्देशी पुढारी हातमां जे से त्यामाज कोंड्या खुशाल.
बरं नेता सोडा कार्य करता सोडा पन मंग खान्देशी भूमिपुत्र तरी बोलालें जोयजे का नको. तों बी पठ्या गोधडी पंगरी जपेल से. याले म्हणतंस,
गावनी गाव बये नी हानुमान बेंबी चोये!
से का नही अचंबा? महाराष्ट्रामा 21 मुख्यमंत्री व्हई ग्यात. त्यामा एक बी खान्देशी नही. यांनी कोनलेज खत्या नही, तिख नही, लाज नही, सरम नही. मुख्यमंत्री पद वरथुन जे दांगोड उठेल से त्यानं आपलें सोयरे बी नही नी सुतक बी नही. खान्देशी लोक असा इचार करतस महाराष्ट्र त्यासना से. मालक त्या सेत. आपुन सांगेल कामना नी भांदेल भाकरना. त्या दिथीन तितलज खावो नी देथीन तें पद लिसनी गपचूप लाई लाई खावो.
महाराष्ट्रमा 21 मुख्यमंत्री व्हयनात पनं त्यामा, खान्देशी, महिला नी आदिवाशी यांसना एक बी मुख्यमंत्री नही. यांना अर्थ महाराष्ट्रमा खान्देशी माणूस, महिला नी आदिवाशी या तिन्ही घटक कमजोर सेत. यां तिन्हीसनी दाय कोनी शिजू देत नही.
पन आते आपलें आपली दाय शिजाडनीज पडी. खान्देशना मुख्यमंत्री करनाज पडी. जुना पुढारीस्मा माले काही दम वाटस नही. आपलें आते नवी पिढी घडनी पडी. सरकारनी 18 वरीसना पोरेसले आते मतदानना अधिकार देयल से. हाई नई पिढी उठाडनी पडी. त्यासले आगे मवाय करन पडी. चला उठा युद्ध करा.
आधीयोको जिद है जहाँ बिजलिया गिरानेकी.
मुझे भी जिद है वही पर आशिया बनानेकीं.
हिम्मत और होसले बुलंद है,
खडा हूं अभी गिरा नही हूं.
अभी तों जंग बाकी है और मैं हारा भी नही हूं.
घरेघर संदेश, सोनाना खान्देश
बापू हटकर