गावं नी याद

गावं नी याद

अहिराणी कविता

तशी ते मन्ह सुद्धा एक

भलतं भारी गाव शे!

अजून पण ते माले…

जशी ना तशी ठावं शे !

बिनकामना शयर मा ई बसनु

अशी बी वाटी उठस!

गाव नी याद उनी का कंठ बी

मना दाटी उठस!

सादा ताप जरी उना तरी

पुरी गल्ली गोया हाये!

नवा पासून थेट चष्मा लगू ना

जुना बी डोया हाये!

आज कवाड लायेला घरे स्मा

कोणाचं पत्ता लागत नई!

खेडा माईन इयेला पण…

आठे खेडा नी वागत नई!

या शयर मा हाईनी जरी

सारं काही आठे भेटस!

इतला गर्दीमा हाईनी बी

आठे एखलं एखलं वाटस !

तो पार आणि त्या जीवले जीव

देणारा तठे यार शेतस!

गाव नी यादमा जुडेल आज

बी हर मनना तार शेतस!

Ahirani Poem

मिलिंद धोदरे नंदुरबार

9423521847