खान्देशी भाषा खीर म्हा मुया नी गोट म्हा इधोया नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प

खान्देशी भाषा खीर म्हा मुया नी गोट म्हा इधोया नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प

खीर म्हा मुया, नी गोट म्हा इधोया
मयतरस्वन नारपार ना लढाना आते आग्याडोंब होणार शे. नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प बचाव समितीले हायी गिरणा मायन्या गारगोटीस्नी चिणगी लायीसन चेटाळेल शे. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आख्खा पदरमजार पडा शिवाय हाऊ आग्याडोंब थंडा व्हवाव नही.

पयली गोट आम्ही नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प बचाव समिता मजार काम करान.?मंग उन्मेष दादाच का मेढ्या जोयजे? मा उन्मेष दादास्ले हाऊ इषय अवगत शे, तेस्ना आभ्यास शे, कोणताबी राजकीय अजेंडा तेस्ना ह्या आंदोलन म्हा ह्राहणार नही. आते दखा ह्या सत्ताधारीस्ना मंत्री, आमदार, चेला काय मिठ्ठु सारखा मिठु मिठु करी ह्रायन्हात. सरकार ख़र म्हणजे खान्देश ना लोकस्ना डोयामा माटी लोटी ह्रायन्ह.

मा दादा भुसेस्नी पत्रकार परिषद लिसन नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प कसा शे? कथाईन कस पाणी जाईन? कोणले कितला फायदा? कितल पाणी नारपार ख़ोराम्हायीन यीन? हायी सोंग दाखाडी ह्रायन्तांत. सरकार ना जी आर वाचा… कसा खुटा मारेल शे माहित पडीन. येस्ले निवडणूक जिकणी शे. बाकी ना आमदारस्न्या दातखिया बशी जायेल शेत. जव्हय आम्ही नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प ना बारा बोलुत तव्हय ह्या महाशय म्हणेत, नारपार गयरा खर्चिक शे. तो परवडणार नही. आते जलसंपदामंत्री नी जाहिर करताच, मिठ्ठु बठ्ठा पिंजरा म्हायीन बाहेर पडनात.

खान्देशी भाषा
खान्देशी भाषा

तरी बी आजुन सुध्दा खान्देशना तरना जुवान नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प डोकामा लिह्रायन्हात नही. तेन्ह कारण म्हणजे ह्या राजकीय वन्ह. तेस्ना डोकामा शेत. मी भाऊ ना माणुस, मी दादाना माणुस, मी आमुक ना माणुस, मी टमुक ना माणुस हायी डोकामजारल किड जदलगुन मरत नही, तदलगुन तरना जुवानस्ले नारपार, खान्देश ना इकास समजाव नही. नेतास्नी येस्नावर भानामती ना खे करेल शे. पण मंग मव्हरे तुम्हन काय?

खान्देश न काय? मव्हरली पिढी न काय? म्हणीसन आते जागल्या बनन पडीन, नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आणि खान्देश नी इकास नी गोट मजार इधोया करणारस्नी खीर मजार आते मुया घालानी ये येल शे….नारपार गिरना नदीजोड प्रकल्पा करता रंगत सांडानी तयारी ठेवनी पडीन*…. कोल्ल वल्ल खासुत, पण नार लयसुत


प्रवक्ता
खान्देश हित संग्राम
9004933626