खान्देशना पुढारीसले इकास कांय ते माहीत ऱ्हास का
खान्देशना पुढारीसले
इकास कांय ते माहीत ऱ्हास का?
खान्देशमां ज्या पुढारी तुम्ही निवाडी देतंस त्यास्ले इकास कांय ऱ्हास ते म्हाईत से कां? खान्देशनां दुखना कांय सेत ते म्हाईत से का? खान्देश करता कांय मांगो यान ग्यानं सेका?
महाराष्ट्र राज्यमा सर्वात कमी दरडोई उत्पन्न खान्देशमा से. सर्वात कुपोषित बालके खांदेशा सेत, पेवान खेतीन पानीनी सर्वात मोठी बोंब खान्देशमा से. सर्वात मोठं स्थलांतर खान्देश से. ब्रिटिश काळ नंतर एक फूट बी नवा रेलवाईनां पट्टा खान्देश टाकायल नही. पुढारीसनी यां गोटना नीट अभ्यास जर करा ते सभागृहमां कांय बोलाले जोयजे हाई त्याले आपेआप ध्यानमा ई जाई!
पन इतला अभ्यास करी कोन? जाऊ द्या तिबाक मरु द्या.
खान्देश से नी खान्देशनी जनता से. सोडी लिथीनं त्यासना प्रश्न त्याज. आपुन आपलं मानधन, पेन्शन नी आपल्या पुढल्या 17 पिढीसन कल्यानं करी लेवूत.
एक ते सभागृहमा आपला नेता कोणी बोलत नही. बोलना ते नीट अभ्यास करी बोलत नही. मंग बोलान ते कांय बी आडुम धुडुम बोली पडो. त्याले कांय बी सांदा बांदा नही ते बोलो. बठा मौनी बाबा!
या बठा मौनी बाबाम्हाइन एक बाबा बोलना
अध्यक्ष महोदय, राज्यात खान्देश हां एक खूप लहान प्रदेश आहे त्यामुळे आमच्या भागातील विकास कामावर सरकार लक्ष देत नाही. निधी पुरवत नाही. म्हणून विदर्भ मराठवाड्यालां जे दिलं जात ते खान्देशला द्या. अशी माझी मागणी आहे.
आते हासो कां रडो? मी कोनावर टीका करत नही. जो बोलना त्यांना कौतिक. कारण तों काही तरी बोली ग्या सभागृहमा खान्देशनी हाजरी तरी लाई ग्या. पन ज्या हाजरज ऱ्हातस नही हाजर ऱ्हाईसनी काहीज बोलतत नही. त्या जास्ती धोके दायक सेत.
जो साहेब बोलना तों बरोबर बोलना कां ते दखुत!
खान्देश हाऊ सगळ्यात लहान प्रदेश आहे.
खान्देशमा नगर जिल्हा सोडीसनी 5 लोकसभा मतदार संघ नी 30 विधानसभा सेत. हाऊ कांय इतला धाकला प्रदेश नही. गोवा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल, मेघालय, लढाख, उत्तराखंड, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांपेक्षा मोठा से खान्देश. देड कोटीनां आंगेपांगे लोकसंख्या से. हाऊ प्रदेश दुर्लक्ष करा सारखा से का? बरं कमी प्रदेश से म्हनिसनी तेना इकासज करो नही असा कायदा से का? आस दुन्यामां कोठेज चालत नही. युनोमां जावा तठे, 17 लाख लोकसंख्यांना भुतान देशनं मत नी 135 कोटीना भारत या दोनीसना मत यांनी किंमत एकज से. इस्रायल केवढा देश से? 90 लाख लोकसंख्या से. मंग त्यांनी किंमत काहीज नही का?
खान्देशना आपला 30 इधनसभामां आपुनज सेत. खान्देशना भायर गुजरातमा गनज मोठी लोकसंख्या से ती सोडी द्या. महाराष्ट्रना ठाणे जिल्हा 24 विधान सभा, रायगड जिल्हा 7 विधानसभा सभा, पुणे जिल्हा 21, छ संभाजीनगर 5 विधानसभा. असा एकंदर 57 विधानसभा मतदार संघमा स्थलांतरीत खान्देशी लोक सावटा परमानमां सेत. यां 57 जागावर आपुन बहूमतमा नाहित पन निर्नायक नक्की सेत. जथा खान्देशी मतदार तथा इजय हाई नक्की. 30 मूळ नी 57 निर्नायक असा 87 जागावर अहिराणी भाषिक मतदारना प्रभाव से. म्हणजे 87 मतदार संघमा आपली बार्गेनींग पावर से. पन त्यांना करता या 87 मतदार संघमा फिराले जोयजे. बठा खान्देशी संघटित कराले जोयजेत. तसा नेता जर खान्देशमा तयार झाया ते मुख्यमंत्री पद बी जास्ती दूर नही मंग.
दुसरी गोट म्हणजे आपली मागणी आपुन करा नां? तुमले कसानी गरज से ते तुम्ही मांगा नां. विदर्भ मराठवाडाले देतंस ते खान्देशले देत जावा आस मोघूम बोली कसं चाली. त्यासना प्रश्न न्यारा आपला प्रश्न न्यारा. त्यासले tb व्हई ते सरकार त्यासले tb नं औसद दी. आपलें कॅन्सर व्हई ते त्यास्ले देयल tb नं औसाद आपलें कसं चाली बरं?त्यासना पोरेसले ज्या कपडा दिशात त्या आमना पोरेसले द्या. आस कसं चाली. त्यासले बठ्या पोरी सेत, नी आपलें बठा पोरे सेत. त्यास्ले लंगा पोलकां, कट, लुगडा दिथीन त्या आपला पोरेसले चालथिनं का? आपला पोरे लंगा पोलका घाली फिरथीनं का?
समस्या आपल्या सेत उपाय आपुन सांगो. भारतमा बुलेट ट्रेन, वंदे भारत, अमृत ट्रेन, लोकल, मेट्रो ट्रेन, मोनो ट्रेन दाया फुटानासना गत वाटी ऱ्हायनातं आपलें जुनाट पॅसेंजर नही देतंस. मराठवाडामा स्वातंत्र्य पूर्व काळमा रेल्वे लाईनज नही व्हती. काचिकुडा स्मॉलगेज ती एकज बैलगाडी सारखी डुगु डुगु गाडी व्हती. तठे आते बठा मराठवाडाभर रेल्वेनं जाय व्हई गे, हारएक जिल्हाना गावले एक्सप्रेस गाडी जास. हाई त्यास्नी गोट आपलें भेटनी ते चाली. पन ती भेटतज नही.
रावनाई से पुढारीसले आपला भागनां प्रश्न कांय सेत त्यांना अभ्यास करा त्या सभागृहमा मांडा. पाठ पुरावा करत त्यांनी पूर्तता करी ल्या. आपला प्रश्न दखा.
1 आपला हिस्सान बठ पानी आडावा गुंता धरणे भांदा. बांधेल धरणेस्मा गय साठेल से तों काढी ल्या. जठे जठे धरंणे, बॅरेज सेत ते पानी वापरमा ल्या. गावेगाव नी सयर सयर पेवान पानी रोज द्या. जास्तीतजास्ती जिमीन वर सिंचन कार्यरत करा. स्वतंत्र खान्देश वैधानीक इकास महामंडळ मांगा.
2 ब्रिटिश कांयमा जितला रेलवाईना पट्टा हातरेल सेत तितलाज सेत. त्यामा एक फूट बी वाढ नही. खाले देयल परमाने नवीन पट्टा टाकी ल्या.
अ) मनमाड-इंदूर
ब )नंदुरबार-साक्री-पिंपळनेर- नामपूर-सटाणा-मालेगाव-मनमाड
क) नांदगाव-पाटनादेवी- चाळीसगाव-अजिंठा-जामनेर- जळगाव-नांदगावं अशी रिंगरुट पर्यटन गाडी सुरु करा.
ड) दोंडाईचा-शहादा-मंदाने -तोरणमाळ अशी एक माथेरान सारखी छोटी गाडी सुरु करा.
2 खान्देशातील देवस्थान विकास गुंता अनुदान मांगा.
3 धुळे कृषी विद्यापीठनी मांगनी करा.
4 धुळे जिल्ह्यामा नवीन तालुका रचना करा. नी एकंदर 10 तालुका तयार करा.
धुळे, देवपूर, सोनगीर, कुसुम्बा, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर, सांगवी, साक्री, पिंपळनेर. या तालुकां मांगा.
5 मालेगाव जिल्हा आणि नवा चाळीसगाव जिल्हानी मागणी करा. त्यामा मराठवाडानां अहिराणी प्रदेश सामील करा.
6) उत्तर महाराष्ट्र करता मालेगाव आठे मुंबई उच्चं न्यालयानं खंडपीठ मांगा.
7 धुळानं राजवाडे इतिहास संशोधन केंद्र, चाळीसगावनं केकी मुस यांसन वस्तू संग्राहलय यांसले वार्शीकं अनुदान मांगा.
8 जिल्हाना ठिकाने नवा उद्योग व्यवसाय उभाराले लाई तठे भूमीपुत्रसले रोजगार मिळाई द्या म्हणजे स्थलांतर रोखता यी.
आपला भागमा न्यारा न्यारा अनुदान मांगात, रोजगार इकास कामे करात ते दरडोई उत्पन्न वाढस.
सद्या इतला ईशयसना अभ्यास करा लोक जागृती करा. खान्देशी मनोस एक करा. सरकार घाबरी. आपल्या मागण्या पुऱ्या व्हतीन.
आपलें जे लागस तेज मांगा. दुसराले दिन ते आमले द्या आस म्हणू नका.
नेता पुढारी थून आपली जनता जास्ती जबाबदार से. तुम्ही नेताकडे मांगा म्हणजे नेता सभागृहमा मांगी.
पयले म्हन व्हती यथा राजा तथा प्रजा! हाई राजेशाहिनी गोट से. आते लोकशाही त्यामा हाई म्हन उलट बनी गई. यथा प्रजा तथा राजा काकी आते राज्यनां मालक प्रजा से नी राजा म्हणजे नेता जनताना गुमस्ता से.
शब-ए-तारीख से अन्वरे शहर पैदा कर!
जर्रे जर्रे मे नये शमसो कमर पैदा कर!
कब से छाया हैं फिजाओमे फलाकतकां गुब्बार!
खान्देश कीं खाक से लालो गुहार पैदा कर!