खानदेस रतन उलगुलानवाली प्रतिभाताई शिंदे
बिरसा मुंडानी आदिवासीस्ना हक्क मियाडासाठे इंग्रजेस्ना इरोधम्हा बंड कय व्हत त्याले ‘ उलगुलान ‘ आसं म्हनतस. आदिवासीस्ना हाक्क मियाडासाठे इधायक बंड प्रतिभाताई संघटीत करी राह्यनी. म्हनिसन सातपुडाना आदिवासी ताईले “उलगुलानवाली प्रतिभाताई” आसं आदरभावम्हा म्हनतस. आज आपुन हायी लढाऊ बानानी करतबगार प्रतिभाताईनी वयख करी ल्हीऊत.
ताईना जनम २९ संप्टेबंर १९७२ म्हा साकरी प्रतापूरना मुयना शेतकरी कुटुमम्हा व्हयना. ताईना बाप शेतकी खाताम्हा नवकरीले व्हतात. ताई हायी त्यासन चौथ आपत्य त्याबाबत ताईना बाप रावसाहेब शिंदे सांगतस, ” पोरनी माया येडी रहास बापना जीव पोरगा पक्सा पोरम्हाज जादा गुतेल रहास. मन्ह लगन व्हवावर आपले पह्यली पोरगीज व्हवो आसं माले वाटे. मातर यकेक करत माले पह्यले तिन आंडोरज झायात. त्यामुये मी थोडा नाराज व्हयनू,बायकोले भी वाटे यक मया लावनारी गोड पोरगी आपले व्हवो, दंगामस्ती कराले भाऊजसंगे खोटा खोटा झगडा कराले. तव्हय संतोसी माता सिनेमा जोरम्हा चालू व्हता. त्यान्हाम्हाना गाना आनि दखाडेल चमत्कारेजमुये तो लोकेस्ले भलता आवडना. आडेल नडेल बायामानसे संतोसी माताले नवस कराले लागनात. तसज कोन्हीतरी मन्ही बायकोले सांग, आंडेर पाह्यजे तं कर संतोसी माताले नवस. झाय बायकोनी कया नवस आनि करमधरम संयोगखाल चवथी पोरगी झायी तीच हायी प्रतिभा. तिन्ह सिक्सन साकरीना न्यू इंग्लिश स्कूलम्हा व्हयन. प्रतिभा धाकलपन पासीनज धाडसी व्हती. मनले जे पटनं त्यासाठे काहीभी करानी तिन्ही तयारी राहे.मंग त्यान्हा परीनाम काय व्हतीन यान्ही तिले यवढीसी भी भीती वाटे नही. ती दहावीले व्हती तव्हयनी गोट तव्हय बाबा आमटेस्नी ” भारत जोडो अभियान यात्रा ” सुरु व्हती. ती यातरा आमना गावले म्हंजे साकरीले येयेल व्हती. ती बाबा आमटेनं काम दखी भासन आयकी परभावीत झायी. तिन्ही आपल्या तिनचार मैतरनीस्ले संगे ल्हीध आनि गयी यातरासंगे. इकडे गावम्हा सोधासोध सुरु झायी पोरी कथ्या गयात म्हनिसन? तव्हय मी यातराना माग काढत काढत गऊ तं त्या नवापूरले यातरासोबत पहूची गयथ्यात. ”
ताईना आजवरना परवास आसाज बेधडक- बिनधास्त व्हयेल से. दहावी व्हवावर ताईनी ११ वी सायन्सले परवेस ल्हीधा. बारावी चांगला मार्क मियाडी पास झायी. बीएस.सी. भी पास व्हवानी ताईले पूरेपूर खातरी व्हती झाये मातर इपरीत गुनपतरीका हातम्हा पडनी तं ती चक्क नापास व्हयेलनी. मातर तिले पास व्हवानी संभरटक्का खातरी व्हती. ती हातपाय गायी बसनारी पोर नव्हती ती थेट जायी भिडनी बोर्डम्हा पुनाले. तठे तिन्ही पेपर फेरतपासनीना आर्ज दी तिन्हा पेपर/ गुनपतरीका फिरीसन तपासाले लायात. त्याम्हा ती फर्स्टक्लासम्हा पास व्हयेल आढयनी. मंग ताईनी पुनालेज ‘एम एस डब्ल्यू’ ले परवेस ल्हीधा. चांगला त-हाम्हा तिन्ही ती पदवी भी मियाडी. ह्या कायम्हा तिन्हा सामाजिक चयवयीज संगे संबंध येतज व्हता. मेधा पाटकरताईनं नरमदा आंदोलन तव्हय जोरम्हा व्हत. महाराष्ट्रम्हानी प्रकल्पग्रस्थनी पह्यली झोपडी पाडायनी तव्हय प्रतिभा ताईनी इरोध कया. त्यामुये पोलीसेसनी तिले आटक कयी आनि औरंगाबादनी जेलम्हा ठेव. तव्हय ताईले २१ दिनना तुरुंगवास झाया व्हता.
प्रतिभाताई शिंदे म्हन का माले आठस १२ फेब्रुवारी १९९८ ना दिन तेरोज आंमयनेर तालुकाम्हाना मांडय गावले पह्यल आहिरानी साहित्य संमेलन भरन व्हत. तेरोज तठे मी दैनिक गावकरीना वतीखाल संमेलनना/ मेयाना लेखाजोखा ल्हेवाले जायले व्हतु. संमेलनना तठला आयोजकेस्नी पाव्हनास्न स्वागत कय. तसज प्रा. शंकुतला चव्हाण ताईनी मेयावानं प्रास्ताविक कय.मातर समधा कारभार मराठीम्हाज चालू व्हता. परमुख पाव्हनाभी मराठीम्हाज बोलनात. मेयाले येयेल आहिरानी प्रेमी कुचकुच कराले लागनात. तवढाम्हा प्रतिभा ताईनं नाव पुकारायन. ताईले सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार डॉ. संभाजीराव देसाई यास्ना हस्ते देवायना.तव्हय ताईले जोगेथाईन दख आयक. पोरगी गुनी लाखम्हा यक. मध्यम उंचीनी सावयी मूरती, करारी चेहरा, पानिदार डोया धारदार वानी. ती बोलाले लागनी आनि खरा आरथाखाल आहिरानी मेया सुरु झाया. ताई आहिरानीम्हा चुरूचुरू बोले म्हजार म्हजारम्हा आदिवासी बोली पावरीभी बोले. तीन्हा बोलाम्हा जसा आदिवासीस्ना कयवया व्हता तसज मायबोली आहिरानीवरल पिरेम व्हत. ती तयोदाकडे आदिवासी लोकेजम्हा -हास त्यासनी सेवा करस.
ताई आकरावीम्हा व्हत्यात तव्हय त्या छात्रभारती म्हा सामिल झायात. खानदेसम्हा प्रा. मु.ब. शहा छात्रभारतीना मारगदरसक व्हतात. ताईनी साकरीले शाखा सुरु कयी. ताईनी उत्तर महाराष्ट्रम्हा छात्रभारतीना परभाव वाढाया. मोरचा,धरने, आंदोलनेस्ना धडाका लाया. ताई पदवीधर झायी त्याच कायम्हा महाराष्ट्रले हादरा देना-या घटना घडन्यात. रिंकू पाटील जयीतकांड, जयगावं सेक्स स्क्यँडल. जयगावम्हा पीडित बायीजसाठे काम करताना वासंती दिघे,मीरा बोरवनकर यास्नासंगे ताईले काम कराले मियनं. पीडित बायकाज संगे बोली तिसनी यथा जानी ल्हेवानी संधी भेटनी.त्यामुये ताई जादा सजग झायी. ” आधी माणूस मग बाई ” हायी घोसना ताईनी तव्हय आयकी. बायास्ना सोसनना न्यारा न्यारा आंगे /कंगोरा समोर उनात. बाईले जातयेवस्था,धरम, पुरुससत्ता कसा हातम्हा हात घाली लुटतस हायी ताईनी दख. सोसनना इरोधम्हा ताईना मनम्हा चिड निरमान झायी. धाकलपनेज ताईनी यदुनाथ थत्ते, एस.एम.जोशी ह्यास्ना भासने आयकेल व्हतात. त्यास्ना समताना इचार हायी चितर् दखावर ताईना ध्यानम्हा उनात.
पदवीधर व्हतांना ताईले संजय महाजन हाऊ मितर् भेटना. तो जयगावं जिल्हाम्हाना चायीसगावंना. तो पुनाले फर्ग्युसन कालेजम्हा सिके. त्यास्ना इचार जुयनात मैतरी पिरेमम्हा बदलनी. लगन कराना निरनय ल्हीधा ताईना बाप रावसाहेब शिंदे यास्नीभी परवानगी दिधी. दोन्हीस्नी पूर्न ये कार्यकर्ता बनान ठराव. पिरेमम्हा पडनं, लगन करनं, सामाजिक कार्यकर्ता बननं हायी समधज त्यास्ना दोन्हीजसाठे रोमँटिक व्हत. त्या बाबा आमटेस्ले जायी भेटनात. त्यास्नी अभय बंग, अरुणा राय यास्न काम दख. याच कायम्हा नरमदा आंदोलन जोरम्हा व्हत. ताई मेधाताई पाटकर सोबत खोराम्हा गयी. नरमदानी पह्यली झोपडी पडनी तव्हय आंदोलनम्हा मव्हरे व्हती. ताईले २१ दिननी सजा झायी. जेलम्हाईन सुटावर ताईनी नरमदा खोराम्हा सालभर काम कय. मंग तयोदाम्हा काम सुरु कय. ‘ लोक समन्वयसंस्था’ स्थापन कयी. लढाऊ कामेजसाठे ‘ लोकसंघर्ष मोर्चा ‘ सुरु कया. आते ताई आघाडीनी लढाऊ पोक्त नेता म्हनिसन वयखावस. खादीना पंजाबी डरेस / साडी, पायम्हा साधी चप्पल, गयाम्हा मंगयसुतर् दागदागीना नहीत, हातम्हा साध घड्याय.
नरमदा आंदोलन पुनर्वसनन काम करे नही. आदिवासी भागन्या इकासन्या भी ब-याज समस्या व्हत्यात. ताईनी त्यावर काम सुरु कय. १९८० नंतर आदिवासी भागम्हा कुपोसनन परमान वाढन. तसज जंगल आनि आदिवासी हायी नातं तोडान काम सरकारनी सुरु कय. ” पाण्यावाचून मासा राहू शकत नाही. तसं जंगलावाचून आदिवासी कसा जगेल? ” त्यामये वनहक्क मियाडासाठे लढा सुरु झाया. आक्कलकुवा, तयोदा, नंदुरबार ह्या भागम्हा प्रतिभा ताईनी पुनर्वसन, इस्थापेस्ना प्रस्न, वनहक्कना लढा टोकदार कया.आनेकदाव ताई जेलम्हान गयी. धुये,जयगावं, दक्सिन गुजरात (भरुच,तापी,सुरत ) आनि नंदुरबार यवढा मोठा भागम्हा आते लोकसंघर्ष मोरचानं काम सुरु से. ह्या लढाम्हा ताईना मेधा पाटकर यासना सोबत मतभेद झायात. नरमदा इरुध्द पुनर्वसन मांगनारा लोके आसा झगडा उभा कराना काही लोकेस्नी प्रयत्न कया. मातर ताईनी समंजस पनाखाल सोतानी येगयी वाट धरी.
आज ताई आदिसीजम्हा काम करत करत त्यास्नाम्हानीज व्हयी जायेल से. ताई पावरी भास्या बोलस,आहिरानी, मराठी,हिंदी गुजराथी बोलस. ताईनं चांगल काम काहीस्ले दखावन नही. गुजराथना सत्ताधारी इस्थापीतेस्न आंदोलन फोडाम्हा भलता हूस्यार. त्यास्नी भील – पावरा ह्या लढाम्हा भीलेसनी बाजू ल्हीधी. फितवाफितवी कयी, गरिबेसनी यकी तोडी. पावरा भील लढाई व्हयनी त्याम्हा यक भील मानुस मारायी गया. सत्ताधारीस्ले आयती संधी भेटनी. ताईवर खूनना गुन्हा दाखल झाया. ताईले कलम ३०२ खाल आटकाव. खरं तं लढाई झायी तव्हत प्रतिभा ताई परांत कचेरीम्हा मिटींगले जायेल व्हती ती त्या ठिकानवर नव्हतीज. आखेरले ताई तव्हय निरदोस सुटनी.
सध्या ताई वनहक्क कायदानी आंमलबजावनी आनि तापी धरनं इस्थापितेस्ना प्रस्नवर मोठा लढा उभारी राह्यनी. स्यांतताना मार्गखाल हायी आंदोलन सुरु से. ताई धुये नंदुरबार आनि जयगावंम्हाना आदिवासीस्ना हाक्कसाठे लढस. नंदुरबार थाईन ‘उलगुलान’ यातरा भी काढी व्हती. २००६ म्हा व्हयेल वनहक्क कायदा राबाडा, आदिवासीस्ले जमिनना सातबारा द्दा, गावेस्ले मालकी हाक्क द्दा यासाठे ताईना लोकसंघर्ष मोरचा सरकारसंगे भांडत रहास. आंदोलननं फय भेटनं आदिवासीस्ले आते सातबारा मियाले लागनात. प्रतिभा शिंदे म्हंजे आदिवासीस्ना भलासाठे जनमेल मोठी इभूती से. केंदरना सरकारनी करेल नवा क्रुसी कायदा रदबातल व्हवासाठे दिल्लीना सिमावरला आंदोलनम्हा ताई आदिवासी सेतकरीज समेत सामिल व्हयनी व्हती. नवा क्रुसी कायदा रद्द झाया नहीत तं सेती आनि सेतकरी नेस्तनाबूत व्हथीन आसं इधान ७आगस्ट २०२१ ले लखनौ ले व्हयेल परचंड सभाम्हा ताईनी कय. हाऊ कायदा सेतकरीस्ले बुडायी बेपारीस्न भल करनारा से. सेतकरी आंदोलन चिरडी टाकाना सरकारना बेत से त्यासाठे समधास्नी यकजूट करानं आव्हान ताईनी कय. दिल्लीले ताईनी किसान मोरचाना राकेसजी टीकेत, रज्जेवालजी यास्ना संगे भी ताईनी चरचा कयी. मुंबई ले शरदरावजी पवार यास्ले भेटी ह्या प्रस्नवर चरचा कयी.ताई आते लढाऊ राष्ट्रीय नेता म्हनिसन वयखावस. ताई बयीराजाले पाठबय मियाडी देवासाठे कोसिस करी राह्यनी. कोरोना कायम्हा ताईनी जयगावंले कोरोना सेंटर सुरु कय. आवलोंग तठेंग ९२० ते हजार कोरोना व्हयेल पेसंट बरा व्हयी घर गयात.
आसं प्रतिभा ताईन काम आफाट आफाट से. ताई आदिवासी, सेतकरी आनि गोरगरिबेस्ना साठे पायले भिंगरी बांधी यकसारखी फिरत रहास. ऊन,वारा, पाऊस कसाकसानीज फिकीर करत नही. ताईनी आपल समध जिवनज आदिवासीस्ले आरपन करी देयेल से.
” दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती “
नवरातरम्हा प्रतिभा ताईना ह्या आफाट कामले नमन ! नमन ! नमन !
रमेश बोरसे
संपादक
” खानदेसनी वानगी “
आहिरानी त्रैमासिक.
1 thought on “खानदेस रतन उलगुलानवाली प्रतिभाताई शिंदे”
Comments are closed.