दारूबंदी साठे गावोगाव गावोगावन्या कथा खानदेशी भाषा
दारूबंदी साठे गावोगाव गावोगावन्या कथा) कालदिन ता. 17/7/2018 मंगळवार मी सोनेवाडी (शिंदखेडा) जायेल व्हतु पुरणपोळी खावाले. तठे 15आॅगस्टले दारूबंदी करी व्हती मी.. एक वरीस पुर व्हवाले एकाद महीनाज बाकी शे. तठेना बायासनी माले कालदिन आमरस पुर्या खावाले बलायेल व्हत.
किरोजन्या बिचार्या सोनेवाडी न्या मन्या माऊल्या माले पाहुणचारले बलाई राहीन्याव्हत्यात . पण जमे नई पण परोनदिन मनी सगुणा माय ना फोनवर फोन सगुणा माय कडे फोन नई पण याना त्याना कडून रावण्या करीसन माले घाटा खावाले याच मॅडम म्हनीसन तिना जीवनी कायपात दखीसन मी मावशी माले येवाले उशीर व्हई पण नक्की इसू अस तिले सांगीसन प्रमिला मावशी धृपता मावशी सखूबाई बठ्ठासले सांगी द्या अस मी सांगताच सगुणा मावशी भलतीच खुश व्हयी गई.
मंग मंगळवारले निघनू घरतून धुये शिंदखेडा गाडीवर बसनू. सहज मरी माताना उत्सव नी मामाना गावले असताना धाकलपणनी याद डोळासमोर उभी राही गई नी याद मंगळवार ना आशाढ महीना ना सोनेवाडी ले मरीमाय देवीना गोड घाटा(नैवेद्य) व्हता.
मरीमाय म्हणजे हाई गाव देवी र्हास. वरीस मा एकच महिना आषाढ महिना या महीनामा गावोगाव तिना उत्सव साजरा करतस.. गावदेवी गावनी इडा, पिडा, आपत्ती, इपदा, रोगराई पासून पोरेसोरेस्न गावना लोकेसन रक्षण करस अस मानतस. म्हणून गावम्हातल्या बाया आषाढ महीनामा मंगळवार शुक्रवार ले गोडधोड नही ते दही भात न बोन्ह(नैवेद्य) देतस नारळ फोडीसन मरीमातानी रक्षा घर लईसन पोरेसोरले लावतस आणि शेवटला दिन गावना लोके वर्गणी जमाकरीसन बोकड्याना घाटा(निवद्य) दखाडतस. या उत्सवमुळे गावामा आनंद न वातावरण र्हास. व मरीमाताना गोड तिखट निवद, दक्षिणा मायाना मंदीर नी सेवा करनारा गोरगरीबसले बी भेटी जास. बठ्ठा गावेगाव ना आपला खान्देश ना लोके हाऊ मरीमाताना उत्सव या आखाडना महीनामा साजरा करतस.
इचार करता करता शिंदखेडा यी लागन पाऊस बी पिरीपिरी पडी राह्यना व्हता बारीक बारीक शितडा चालू व्हतात. तव्हसामा सोनेवाडी बस उनी बसमा बसनू. सकाळ नी शाळा सुटेल व्हईन म्हनीसन शाळाना धाकल्ला पोरे बसमा बसेल व्हतात. मी बसमा बसताच मनाकडे दखाले लागणात. मॅडम तुम्ही दारूबंदी वाल्या मॅडम शेत ना मनीसन गप्पा मारले लागणात. तवसामा सोनेवाडी ऊन. सगुणा माय न्या गावन्या बसस्टण्डवर चार चकरा माराय गयथ्यात. मी उतरताच सगुणा माय न तोंड आंनदमा फुली गय.
गावाना स्टण्डवरला म्हातारा लोके सनी माले वयखीलिध व माले आम्हना गावले तुम्हना मेहनत मुळे 100%दारूबंदी व्हयनी म्हणून अस म्हनीसन मन तोंडभरी कौतुक करी राह्यना व्हतात. मी हाथ जोडीसन सांग हाई 100%दारूबंदी यशस्वी व्हवान कारण म्हणजे गावन्या मायमाऊलीसनी व तरूण पोरेसनी माले भक्कम साथ दिधी आणि जवय बलाव तव्हय पोलीस प्रशासन नी कारवाई करी त्यामुळे हाई दारूबंदी शक्य व्हयनी.

अस बोलीसन सगुणा मावशी ना सोबत प्रमिला मावशी ना घर गवू तठे आजूबाजून्या बाया उन्यात. त्यासना बरोबर बोलतांना मन भरी ऊन. पुरणपोळी रस रशी भात कुरडाया भज्या अमृत न गोडीन प्रेमथून बनायेल जेवण मन गार गय. येत राव्हा मॅडम त्यासना निरोप लिसन सगुणा मायना घर निघनू. सगुणा मायन घर म्हणजे सुंदर झोपडी नातनी आंगण सारी ठेयेल व्हत. मी घरमा जाताच नातरे आंडोर मना पाया पडणात आंडोर सांगाले लागणा दख बहीण तु मनी बहीण शे तु आम्हना गावना करता इतला तरास सहन करत येस मी सुद्धा तुना त्याग दखीसन दारू सोडी दिधी.
मना दोन भाऊ मना बाप दारू पिईसन मरीगया. पण त्यासना लेकरेसले मी समायसू. मन भरी उन सगुणा माय ना डोळामा पाणी उन. सगुणा मायना कडथून पोट भरेल व्हत तरी वाटीभर आंबाना रस मांगीलिधा घर बी एक पुरणपोळी बांधी लिधी. सगुणा माय ले खुप आनंद व्हयना. परत गावना येशीपर्यत गाडीमां बसाडे पर्यंत सगुणा माय उभी व्हती.
मन जड व्हयन गावमाईन निघंतांना गाडीमां बसातांना गहिरी खुशी वाटनी. मी गावमाईन चालनू माणूसकी न व प्रेम आपुलकी न मोठ गाठोड लईसन . असा विचार उना मनमा मी जगमातली प्रेम आपुलकी माणूसकी न धन जोडे असणारी श्रीमंत बाई शे म्हणून मन फुलायी गय.
लिखणार_सौ. गिताजंली कोळी सामाजिक कार्यकर्ती. धुळे