कथा तुझं घर माझ्या काळजात सख्या बैलपोळा

कथा

n

तुझं घर माझ्या काळजात सख्या

n

( बैलपोळा )

n

——————————————

file

तिन्ही सांजा झाल्या तरी गंगाराम अंगणालगतच्या गोठ्याजवळ शून्यात नजर लावून बसलेला . आजूबाजूच्या परिस्थितीचं त्याला भानच नव्हतं .आपल्यावरच तो चिडला होता .आपल्या आर्थिक परिस्थितीने हतबल झाला होता .गोठ्यातला धोंड्याही त्याच्याकडे करूण नजरेने पाहात होता .

nn

तीन वर्षाचा सततचा दुष्काळ .जवळची होती नव्हती पूंजी तर संपलीच होती पण कर्जाचा डोंगरही वाढला होता .यावर्षी दुबार पेरणीही वाया गेली होती . विहिरी तळीही आटली होती . जनावरांना चारा मिळेनासा झाला होता . ऐन पावसाळ्यातही गावाला टँकरने पाणी पुरवठा होत होता .टँकरवर पाण्यासाठी ही झुंबड व्हायची . आपसात भांडणे व्हायची . रणांगणातील लढाईतील विजयी मुद्रेप्रमाणे टँकरवरून दोन/चार हंडे पाणी मिळण्यात धन्यता वाटायची .

nn

सायंकाळ झाली तशी रखमाने मडकी गाडगी पालथी घातली , जेमतेम तीन भाकरीएवढे पीठ निघाले . तिने भाकरी वळल्या , सासू सासरे व नवर्‍याला वाढलं .आणि तू नाही जेवत ग रखमा . ” न्हाई , माझं पोटात गुबारा धरलाय .पोट डमारल्यासारखं झालंय . मला न्हाई जेवायचं .” ” रखमा पोट गुबारा धरेल एवढं पोटभर अन्न तरी असतं काय घरात , मला समजत न्हाई व्हय . चल ही घे अर्धी भाकर . बैस जेवाया .”

n

गंगारामनं आपल्या पुढ्यातील भाकरी तिच्या ताटात घातली .

n

डोळ्यात अश्रूंची दाटी आणि मनाला गहिवर रखमाचा घासही कंठातून खाली उतरत नव्हता .गंगारामच्या आश्वासक हातानं तिला आणखीनच भडभडून आलं.

nn

सावकारानं कर्जाचा तगादा लावलेला .गंगारामच्या गोठ्यातील धोंड्या व कोंड्याच्या खिल्लारी जोडीवर त्याची नजर पूर्वीपासूनच होती .कर्जाची परतफेड वेळेवर करू न शकल्यानं सावकारानं कर्जाचा हप्ता म्हणून गोठ्यातून कोंड्याला सोडवून घेऊन गेला होता .नेणार तर तो धोंड्यालाही होता , पण गंगारामने केलेल्या विनवणीनं त्यानं केवळ एक बैल नेला .

nn

धोंड्याच्या मदतीला दुसरा बैल भाड्याने घेवून तर कधी स्वतः जुंपून गंगाराम शेती करत राहिला . पण दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने गांजले जाऊ लागला 

nn

 गंगारामला दोन मुलं ,सुरेश आणि नरेश . सुरेश घरातील परिस्थिती जाणून होता .”बाबा मी शिक्षण थांबवतो व शहरात जाऊन काही कामधंदा शोधतो .” आरं पोरा , पण तुझ्या शिक्सनाचं काय ? शिक्सन सोडू नकोस लेकरा . शिकशिन तर पुढं जाशीन “नाही बाबा आता मी काम करणार , घरात एवढी अडचण असतांना मी शिक्षण करत बसू . तुमचे हाल आता मी नाही पाहू शकत . आपण नरेशला मात्र शिकवू . नरेश मोठा होईल , खूप शिकेल व आपले दिवस बदलतील .मी जातो शहरात सुशीला मावशीकडे . शोधतो काम .

nn

सुरेश शहरात निघून गेला . छोटा नरेश वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता .

nn

सावकाराचं कर्ज फेडू न शकल्यानं तो गंगारामचा दुसरा बैल धोंड्यालाही घेऊन जाणार होता . पुढच्या आठवड्यातच बैलपोळा होता .आणि गंगारामच्या डोळ्यापुढे पोळ्याचं जणू चलचित्र सुरू झालं .

nn

दरवर्षी पोळ्याच्या दिवशी बैलांना हाळावर ( हाळ —=जनावरांना पाणी पिण्यासाठी केलेला पाण्याचा मोठा आयताकृती हौद ) नेऊन स्वच्छ आंघोळ घालायचा. .त्यांच्या गळ्यात कवड्यांची व घुंगरांची माळ, शिंगाची रंगरंगोटी , शिंगदोर/मोरकी , शिंगांना लावले जाणार्‍या गोंड्यांच्या पितळी शेंब्या , गुडघ्यांना बांधायला गंडे , नाकात वेसण , पाठीवर झूल व कपाळावर बाशिंग ,

n

वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या आपल्या सहकार्‍यांचं ऋण गंगाराम यादिवशी त्यांची सेवा करुन जणू फेडायचा , रखमाही त्यांची यथासांग पूजा करुन आरतीने ओवाळायची .पुरणपोळ्या खायला घालायची . सायंकाळी गावाच्या वेशीवर सगळे बैल जमवून पोळा फुटायचा . वाजत गाजत बैलांची मिरवणूक निघायची . सुरेश आणि नरेश सणासाठी घरी आलेले असायचे .बैलांना घेऊन गावभर हिंडायचे , आनंद लुटायचे .

nn

पण यावर्षी हा आनंद त्यांना आनंद मिळणार नव्हता .एक बैल तर पूर्वीच सावकार घेऊन गेलेला . यावर्षी दुसराही तो नेणार होता . पोळ्याच्या दिवशी गोठा सुनासुना राहणार होता .त्यांचं सर्वस्वचं जणू लुटले जाणार होतं .गंगारामला खूप भडभडून आलं . तो उठला व गोठ्यात जावून धोंड्याच्या पाठीवरून हात फिरवू लागला , धाय मोकलून रडू लागला . ” तू खूप सेवा केलीस रे आमची , पण मीच काही करू नाही शकलो तुझ्यासाठी , तुलाही सावकाराच्या दावणीला देऊन बसलो . माफ कर रे माझ्या मित्रा , पण तुझं घर , तुझं स्थान माझ्या काळजात आहे एवढंच सांगू शकतो . माफ कर रे मला , करशील ना माफ , करशील ना ” धोंड्याही मान हलवू लागला , करूण नजरेनं पाहू लागला .अंगणातून हे सगळं पाहणार्‍या रखमाचाही उर दाटून आला . पदराचा बोळा तोंडात कोंबत ती ही रडू लागली .

nn

” रखमा , ” ” जी धनी ” दोन दिवसांनी धोंड्या जाईल ,आपण उद्याच पोळा साजरा करायचा काय ? ” ” विचार चांगला हाय जी . पन घरात पैसा बी न्हाई कि खाया काही दाणे बी न्हाई ” ” करू काहीतरी जुगाड , पण करू साजरा , बडेजाव नाही छोटेखानी का व्हयना ,करू आपण पोळा “

nn

सावकार धोंड्याला घेवून गेला तशी गंगारामनं अन्नपाणीच सोडलं . रखमा धास्तावली , ” आसं काय करताजी , म्हातारे आई बाबा हायती घरात , त्येंचा तर इचार करा जरा “

nn

आज बैलपोळा ,पण गंगाराम मात्र उदास बसलेला . परिस्थितीने गांजलेला ,क्षीण झालेला .आणि धोंड्या कोंड्याच्या हंबरण्यचा आवाज त्याच्या कानी पडला . अचानक वीज चमकावी व डोळे दिपावे तसे गंगारामचे झाले . डोळ्यातील अश्रूंच्या जागी आनंदाची चमक दिसू लागली .माझे धोंड्या कोंड्या म्हणत तो जागेवरून उठला व बैलांजवळ जाऊन त्यांना कुरवाळू लागला . हे सगळे पाहतांना सुरेशचा चेहरा आनंदाने फुलला .

nn

” केव्हा आलास रे लेकरा ” ” हा काय ,आताच येतोय बाबा , धोंड्या कोंड्याला घेवून , ” ” आरं पन , सावकाराच्या दावणीची बैलं का सोडून आणलीस तू . बैल चोरीचा आळ घेईल तो आपल्यावर ” ” नाही घेणार बाबा . मी बैलं सोडवून आणलीत . सावकाराचं कर्ज फेडलंय मी ” ” कर्ज फेडलं ? पण ही जादू तू केलीस कशी ? ” ” सांगतो बाबा , सगळं सांगतो “

nn

सुरेश शहरात तर आला पण अर्धवट शिक्षण व कामातील कौशल्य नसल्याने त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती , छोटी मोठी कामं करून गुजराण करू लागला . गावाकडे फार मोठी रक्कम काय पाठवणार , थोडे बहुत पाठवत राहिला . शिक्षणाचं महत्व समजल्याने रात्रशाळेत जाऊ लागला . ग्रंथालयात जाऊन पुस्तकांशी दोस्ती वाढवू लागला , कामात कुशलता येण्याचेही प्रशिक्षण घेऊ लागला .सकाळी पेपरची लाईन टाकू लागला , एक वर्तमान पत्र स्वतःही घेऊन चालू घडामोडी जाणून घेऊ लागला आणि त्याच्या या passion मुळेच ” कोण होईल करोडपती ” साठी प्रयत्न करू लागला . मेसेज पाठवणे , त्याची निवड होणे , त्यातून ग्राऊंड टेस्टसाठी सिलेक्शन व शेवटी Fastest Finger First साठी निवड होणे . या सगळ्या परीश्रमातून आज तो Hot sit वर होता .व आपली मेहनत , परीश्रम व बुद्धीमत्तेच्या जोरावर  तो पंचवीस लाख रुपये जिंकला होता .

nn

आणि आज त्याने सावकाराचे कर्ज फेडले होते . शेतीसाठीही तो नवनवीन प्रयोग करणार होता . कमी पाण्यात अधिक उत्पादन ,व नवनवीन संशोधित बियाणांचा वापर करणार होता .

nn

घर आनंदानं

n

न्हाऊन निघालं होतं . ” रखमा , आजचा बैलपोळा दणक्यात झाला पाहिजे बरं का ? “व्हयजी , आता तुमी बी लागा की कामाला ,” ” हा काय आताच लागतो बघ “. 

nn

धोंड्या कोंड्याच्या अंगावर थोपटत तो म्हणाला , ” तुमचं घर माझ्या काळजात आहे सखयांनो , तुम्ही घरी आलात , भरून पावलो मी ” .

nn

—————————————————————

n

डाॅ. शैलजा करोडे ©®

n

नेरूळ नवी मुंबई

n

मो.9764808391