आसं मन्हं नाव वाढे खान्देशी अहिराणी बोली कवीता
मन्हा ई कविता संग्रह ‘मन्ही खान्देशी बोलनी’म्हा से हायी कविता.
आसं मन्हं नाव वाढे
मन्ही लाडनी झाडनी
लाडे लाडे घर झाडे
हिले देखी मनम्हा वं
मन्हा अपरुप वाढे॥धृ॥
हायी भरभर झाडे
घर आंगननी वाडे
जीव मन्हा थकी जास
हायी पुढे पयं काढे॥१॥
काना कोपराना पुंजा
हायी जायी जोयी काढे
घरभर फिरिसनी
बठे दारनना आडे॥२॥
हायी कोनता झाडनी
बेटी मन्हं घर झाडे
घर लखलख करे
आणि मन्हा मान वाढे॥३॥
नाव इन्हं से लक्समी
तरी दारनम्हा पडे
दिवायीले खरंखुरं
हिनं दरसनं घडे॥४॥
इनी आंघोय -पांघोय
जसं नशिब उघडे
बोटं हायदं -कुकूनं
इना कपायले भिडे॥५॥
इन्हा मझार बठ्ठास्ले
मन्हं दरसन घडे
उना कोठेन ह्या दिन
हायी मन्हाम्हाच दडे॥६॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
————————————————————-
शब्दार्थ :- मन्ही =माझी, लाडनी=लाडाची, झाडनी=केरसुणी, झाडे=झाडते(झाडू मारणे), हिले=हिला, देखी=पाहून, मनम्हा व=मनात ग, मन्हा =माझ्या, अपरुप =अप्रुप, हायी=ही, थकी जास=थकून जातो, पयं काढे=पळ काढे, पुंजा=केर-कचरा, जायी जोयी=शोधून, फिरिसनी=फिरुन,बठे=बसे, दारनना=दाराच्या, आडे=बाजूला, लक्समी=लक्ष्मी, से =आहे, दारनम्हा =दारात, दिवायीले=दिवाळीला, इनं=हिचं, दरसन=दर्शन, आंघोय=आंघोळ, हायद कुकू=हळद कुंकू, कपाय=कपाळ, मझार =मधे, बठ्ठास्ले=सर्वांना, मन्हं =माझं,