आयतं पोयतं सख्यानं प्रवीण माळी सर

आयतं पोयतं सख्यानं प्रवीण माळी सर

आयतं पोयतं सख्यानं
प्रवीण माळी सर

नानाभाऊ माळी

भाषा लोक संस्कृतीनीं वाहक ऱ्हास!भाषा लोकमुखे पिढीजात जित्ती ऱ्हास!तिन्हावर जर परकी भाषा जोरम्हा आद्दयनी तें मातर आपला वसं बुडा सारखा व्हयी जास!भाषा घरनां दारंतून घरमा घुसस!चालता बोलता वसरी आनी जान्सी घरनी व्हयी जास!भाषा हिरदम्हा गुसी जास!भाषा आंडेरं,बहीन,मायनांगत जीव लावत ऱ्हास!भाषा सोतान्हा रंगतनीं वाटालें लागी जास!हिरदम्हा बसाडेलं भाषा चौम्हेर गल्लीनीं व्हयी जास!गावनीं व्हयी जास!बठ्ठा इलाखांनी व्हयी जास!आंडेर-बेटी सारखी व्हयी जास!मव्हरे “माय” व्हयी जास!आनी मायलें कोनी सोडत नई!माय जीव लावतं ऱ्हास!माय वाडे लावतं ऱ्हास!पोरें जीव लावत ऱ्हातस!जठे सुटत-तुटत नई त्याले आपलं म्हंतंस!आपलं बठ्ठ रही घायी घुसयी-घुसयी एक व्हयी जास!एक सुवास व्हयी जास!भाषा माहेरनां गोतन्हा मायेक ऱ्हास!सासरना काटान्हा मायेक ऱ्हास!भाषा जीव भावनी ऱ्हास!आम्हनी अहिराणी भाषा आशीच से!जीव भावनी से!

img 20240110 wa00133586392624919053137
प्रWin

गुजरातनां सुरतफाईन तें हेटला जळगाव जिल्हाम्हा तावडी पट्टा पाऊत अहिराणी भाषानां लहेजा लयी फिरणारा अहिराणी मायन्हा धुरकरी, एक पात्री हास्य नाटिका करनारा अभिनेता श्री “प्रवीण माळी सर” यांसनं योगदान आभायथिन मोठ से!प्रवीण म्हणजे बठ्ठ जिकी लेनारा!प्रवीण म्हनजे खास!प्रवीण म्हणजे विशेष!प्रwin म्हणजे खान्देश
माटीनां हिरा सेतस!एक आदर्श शिक्षक सेतस!प्रयोगशील गुरुजी सेतस!दिल्लीम्हा नाट्यकला शिकेल अभिनेता सेतस!बालभारती आनी डेक्कन कॉलेज सारख्या सरकारी संस्थास्मा प्रयोगशील संशोधक म्हणीसनी नाव कमावणार व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण माळी सर सेतस!

अहिराणी भाषा बोलनारस्नी संख्या दोन कोटीनां आसं पास से!अस्सल अहिराणीनां खयखयता झिरा प्रवीण माळी सर यास्नी “आयतं पोयतं
सख्यानं” या एकपात्री इनोदी कथानीं अहिराणीम्हा दिलखेच कॉमेडी करीस्नी अहिराणी भाषिक भाऊ-बहिणीसले न्यारं अस्सल अहिराणीं मायनं जेवन व्हाडेल से!भू भारी खजिना देयेंल से!अहिराणी भाषाना गोडवा हासत हासत पोटभरी लेवाना!आनंद लेवानं,’सख्या’ नावनं पात्र लगीन करा गुंता हुभ ऱ्हास!तठेंग गमती जमती सुरु व्हतीस!परसंगम्हा न्यामिनी कॉमिडी वतेंल से!प्रवीण माळी सर यासना जित्ता अभिनय!जीव वती भूमिकाम्हा एकजीव व्हयी जावानी कला से म्हणीसनी प्रवीण माळी सर उत्तम अभिनेता सेतस हायी दिखी जास!नेम्मन सबद फेक!उच्चार शुद्धी संगे चेहरा,डोया आनी हात पायस्नी नेम्मन हालचाल खिदी खिदी हासालें भाग पाडस!

आज मालें याद उनी लक्ष्मणराव देशपांडे यास्न “वऱ्हाड निघालं लंडनला”या एक पात्री नाटकनीं!मन आनी गाल फुगऱ्या व्हयी व्हयी हासूत!आशीचं आल्लग टाईपनी कलाकृती अहिराणीमा प्रवीण सर यास्नी करी आनी अहिराणी भाषांले हास्य कॉमेडी भेटनी!भाषिक कुस्मरांनी भूक “आयतं पोयतं सख्यानं” भू भारी
भागी ऱ्हायनी!हसता हासाडता अहिराणी भाषांनी गोडी खान्देशी भाऊ-बहिणीसलें लागनीं!

“आयतं पोयतं सख्यानं”.. मनन्ही नेम्मन भूक भागाडसं!पुरस्कार कलाकारलें हुभारी देत ऱ्हातसं!नवीन रस्ता दखाडतं ऱ्हातंस!अहिराणी मायनां जागलकरी प्रवीणजी माळी सरसलें गंजजं पुरस्कार भेटेलं सेतस!मी त्यासलें डोया फाडी फाडी दखी ऱ्हायंतू!तोंडम्हा बोट घाली,डोया फाडी,”अब ब ब!” म्हनीं ऱ्हायंतू!पुरस्कारस्नी शिरीमंती दखी प्रवीण माळी आभायतून मोठा दिखी
ऱ्हायंतात!दोन कोटी अहिराणी भाषिक जनसंख्यानां गयाना ताईत व्हयेलं हिरानीं हायी कमाई दखी मी हारकी जायेल व्हतू!

कला मानोस्ना बुद्धीनी भूक भागाडतं ऱ्हास! “आयतं पोयतं सख्यानं” खान्देशन्हा माटीनं आस्सल सोनं से!सोनालें गंज लागत नई!शिरपूरन्ही माटीनं आस्सल सोनं महाराष्ट्राम्हा चमकी ऱ्हायनं!दुसरासलें चमकाडी ऱ्हायनं!अहिराणी मायना पदर धरी मव्हरे जायी ऱ्हायनं! अहिराणी भाषानां गोडवा चखाडी ऱ्हायनं!रंजी, गांजी,खुशी बठ्ठा खान्देशलें
पुरणपोयीना ताट व्हाडी ऱ्हायनं!अहिराणी भाऊभन्ना गयानां ताईत मा. प्रवीण माळी सरस्नी हास्य कलाकृती “आयतं पोयतं सख्यानं!”व्हयी ऱ्हायनं!रंग भूमिनी,तोंडले रंग लायेलं अस्सल कलाकृती महाराष्ट्र-गुजरातन्हा हिरदम्हा जायी बठो,अहिराणीं माय माटीना संस्कार जागे जाग झिरपत ऱ्हावो!या कलाकृतीन्हा “अभिजात” गौरव व्हवो याचं शुभेच्छा!

नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१० जानेवारी २०२४

3 thoughts on “<mark class="has-inline-color has-vivid-red-color" style="color: #cf2e2e;"><em>आयतं पोयतं सख्यानं</em></mark> <mark class="has-inline-color has-vivid-red-color" style="color: #cf2e2e;"><em>प्रवीण माळी सर</em></mark>”

  1. नानाभाऊ वाहव्वा! तुमीन प्रवीणदादा माळी यासना सटीनं पोयतंखि या कार्यकरमविषई वज्जी भारी लेख लिखेल शे!

Comments are closed.