आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन
n
आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, “नानाभु! ओ नानाभु!!,” काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,”……?” आरे नानाभु हायी काही इचारन झाय का बर? कालदीन भडगाव ले हलवाई दुकान मा जिलंबी कुमाचडी ह्रांयनंतु, बय नानाभु, लोक बी साल गयरा वातरेल शेत, तो माणूस माल्हे तो आप्ला मामलेदार नही का? अम्मयनेरना….! मी बोलणु” आरे हा, त्या सुदाम महाजन का रे?” “हा बरोबर तसाच दिशेत” बबल्या बोलणा, तो माणूस बोलणा म्हणे हायी चाकुयी लेरे भो, आप्ला बापु ले आंडेर व्हयनी,… हां… बय आते आप्ला तीन बापु शेत, पुणाना, मुंबई ना, नी शिरपूर ना…जिलंबी लिदी नानाभु! पण ह्या तीन बापुस्मा कोणता कलाकार बापु व्हयीन भो?” मन्ह काही डोकस चालन नही, पण हारीक मा, ती चाकुयी खायीसन, आजुन छटागबर जिलंबी लिन्ही खात बसनु. दख ते मी ठगायी जायेल व्हतु, त्या हाटेल ना कारागीर न नाव बापु व्हत. तो आप्ला मामलेदार बी नही व्हता, जिलंबी तयनारा निंघना तो जुवान. मायन्यान भो पयलसावा 30 रुप्यानी ठोकायनी, पण साल माल्हे जिलंबी ना कागदवर मोठ आक्षरम्हा दिसन, “दुसर राज्य स्तरीय अहिरानी साहित्य संमेलन” आप्ला रमेश भु ना फोटुक, त्या व्हाल्हा सरस्ना फोटुक दिसस्ना… आरे बापरे गिरड ले… ते भी रमेश भु… तसा मास्तरस्ना कार्यक्रमले जाव्हान माल्हे वज्जी जिव्वर येस, पण हाऊ मास्तर म्हणजे माय अहिरानी ना धुरकरी शे… म्हणीसन भडगाव ले आम्हना मामानी सासुरवाडी शे, तेस्ना बी सालाना एक आंडोर मास्तरस्ना मेढ्या शे, तठेज मुक्काम ठोका, रामपायटा मजार निंघनु लवलव तयारी करामा त्या मास्तरना कपडा आंगवर चढाई येल शे, पण जाऊदे कसा दिसतस कपडा? “
n
” बबल्या तु इतला कसा गयबाना शेरे?” मी बोलनु, बबल्या ले गयबाना बोलेल नी चढी गयी,. नानाभु तुम्ही मुंबई पूनावाला सोसाते गयरा देढशाना समजतस भो, मायना टन्ना मारु हायी खान्देश न राजकारण बबल्याना चस्मा शिवाय दिसत नही, तु गयबान्या म्हणस?” ओ बबलु दादा जाऊ दे ना भो, चुकायन भो… बर सांग मंग कसा उन्हा तु गिरड ले?” मी बोलनु,. आते मातर बबल्या सटकी जायेल व्हता… मनावर खेकायीसन बोलणा, “मंग मन्हा पाय खंडायी जायेल शेत ना? माल्हे कोठे चालता येस, आरे झुंगी धरतास डांगेडांग गिरड ले भिडणु. कारे नानाभु तुम्हणा कडे गाड्या घोड्या शेत म्हणीसन भावखातस का रे? आरे पण इतला बात्तल शेत तुम्ही गाडीस्वाला, तुम्हण्या गाडीस्मा कुत्ला ह्रातस, पण माणुस्ले जागा ह्रात नही, नी मंग काय आशा धरो तुम्हणी? “
n
. बबल्यानी माखनी चगी जायेल व्हती. आते तेल्हे जास्त बोलण म्हणजे, *येव म्हैस नी, घाल गांडमा शिंग*, आशी व्हती. मी बोलणु, आरे जाऊदेरे भो, गण टिलकचना पोटना शे तु माहित शे माल्हे, खाजीसन तु रंगत काढस, काही बोलण की, त्या जाडा भिंग ना चस्मायीन भिंगोटा सारखा करस, बात्तल शे बबल्या तु…. आते मातर बबल्यान तोंड पडी गे. मंग माल्हे बोलणा, “नानाभु जावु दे रे भो चूक व्हयनी भो, बय वैंजी नी का तुल्हे रातले वल्ल तिख खावाडेल शे रे नानाभु ?”.
n
नानाभु मी बरोबर ९ वाजता गिरड ले भिडणु, बराज साहित्यिक येल व्हतात, संमेलना मेढ्या, मा परसांत दादा, हटकर बाप्पा, नाशिक नी खउट आक्का, मालेगाव ना भिला दादा, आम्हना गयब्या फेम एस के बापु, आमेरीका ना सोहम भु, पाव्हणा मंडई, गुल्लुरकार सुनिल भु… आसा गंजक टिलकचन व्हतात.. यक इना बापु व्हता, सरपंच शे म्हणे गावना, पण नानाभु तु दखावना नही रे भो, आते दखावना फुकटनी फौजदारी करतांना…. बबल्या तु आज मास्तरना कपडा घालेल शे ते, सोता ले मास्तर समजस का.? वाघ न चामड आंगवर टाक म्हणजे, फुरगदड वाघ व्हत नही, मी आस बोलणुनी, बबल्याना पारा चढणा… माल्हे डायरेक नानाभु वरथाईन नान्यावर आपटायना, तेन्ही सटकी जायेल व्हती,
n
तेवढाम्हा वट्टावरथाईन आवाज उन्हा, कल्याण ना सुरेश नाना वट्टावर यी बसा…. बबल्या ना निरोप लीसन वट्टाकडे व्हयनु… तसा बबल्या बोलणा, “नान्या हाऊ रमेश भु ना दांगडो आपटना की दखस तुल्हे….!
nn
त्रिवेणीकुमार
n
कालदीन दखा आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन संमेलन ना गाजावाजा….
nnn
आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन गिरडन अहिराणी साहित्य संमेलन दांगडो २
n
बबल्या मन्हावर डेडोर सारखा फुगेल व्हता. मारक्या बैल सारखा मन्हा कडे डोया वटारीसन दखी ह्रायंन्ता… इकडे बठ्ठा मानपान ना पाव्हणा कवतीक वट्टावर बशेल व्हतात. आते पाव्हणा पुयीस्ले पुकारान काम गोफनेसर, इना बागूल ह्या पह्रेडकर करी ह्रायतांत. बबल्या मस्त खुर्चीवर टेकीसन बशेल व्हता. वट्टावर बशेल पाव्हणास्ना कडे बारीक नजर करीसन बबल्यानी पारख चालु व्हती. शायना मालक मा परताप नानाभु, मराठी सब्दसाटाना भाट मा परसांत दादा, संमेलन ना मेढ्या सातपुडाना पहाडी आवाज मा परसांत दादा मोरे, अहिरानी ना जाणता जागता इतिहास मा हटकर बाप्पा, मा विकास भु, आते अम्मयनेर ना साहित्य संमेलन ना निवतकार मा जोशी सर…. आम्हनी आक्का, डाकटर सदा भु… आसा बठ्ठा आफलातुरस्ना वट्टा गच्च भरेल व्हता. फुलेस्ना डस्का दिसन बठ्ठास्न कवतीक चालु व्हत… पण बबल्यानी इतला राग येलवर बी मन्हा कवतीकना येले जोरबन टाया टीप्यात…
n
तसा हाऊ कवतीक ना बठ्ठा कार्यक्रम कुयीक लागा सारखा व्हता… म्हणीसन बबल्या ले मी खाजीसन रंगत काढ… “बबल्या बय कुयीक लागा सारखा कार्यक्रम शे… काया करदोडा कोणले बांधाले जोयजे बर?” मन्ह कडे दखीसन बबल्या कसा म्हणस, “तुन्ह मन्ह जमेना, नी तुन्हा बिगर करमेना, आशी गोट शे नानाभु तुन्ही!” उन्हा मन्हा नजीक… करदोडा कोणले बांधसी इचारस..? .. आरे भो दख तठे शिरपूर ना बापू, नही ते रमेश भु ना कंबरले व्हयीन ना करदोडा, नही ते मंग रमेश भु ना मास्तरीन नी तेस्ना डोयान काजय लायेल व्हयीन रमेश भु ना तयपायले… तुले काबर जोयजेत चमार चौकश्या….?”ओ नेम्मन बोल रे… मी सबागत मा इचार तुले, मी बोलणु…. जाय तु दख त्या रमेश भु ना पाय ले काजय शे का? बात्तल पणा काही सोडत नही भो तु नानाभु… बबल्या बोलणा.
n
नानाभु संमेलन ना आगाजा रमेश भु नी मस्त करेल व्हता… बबल्या चस्मा काढस आणि काच पुसत पुसत बोलणा, नानाभु संमेलन मजार खरा न्याव ते संमेलन ना मेढ्या मा परसांत मोरे येस्ले रमेश भु येस्नी देल व्हता. कवतीक सोळा गयरा मस्त झाया… पह्रेडकर गोफने मास्तर, आणि इना सरपंच येस्नी मस्त कये. बाकीन नियोजन बी नामी व्हत… नानाभु तुल्हे सांगु का, मी बठ्ठास्मा जास्ती टाया कव्हय टीप्या व्हतीन बर? मा परसांत मोरे येस्ले अहिर पुरस्कार, आणि मास्तर आणि मास्तरीण येस्ना तु आणि आक्कानी करेल सत्कार ना येले… नानाभु ती नाशिक नी आक्का बोलस तव्हय खडूस वाटस भो… पण ती आक्काना पोटमा गयरी मया शे. भासन आवडनात माल्हे, मा हटकर बाप्पा, मा जोशी, त्या परसांत देवरेस्न…
n
निवत देल कवीस्न संमेलन ना अध्यक्ष डाकटर सदा भु बठ्ठा संमेलन मजार भाव खायी ग्यात… प्रमाण भाषा ना निकस, बठ्ठा कवीस्न कवतीक तेस्नी मन भरीसन कय. करोडपती शरद दादा नी चांगला पोय्रा खोया नी हासाडी सोड, ते इना बागुल नी माय सांगे तुन्हा बाप तिरंगा मा उंन्ता नी रडाइ सोड, शाहिर गोशी ने बोकडायेल दारुड्या नी कविता आयकायीसन समाज प्रबोधन कय. प्रविण भु न महाभारत नी हस्थीनापुरमा हासरा लोंढा वाहाळी दिना…. बाकी जाऊ दे भो…. बय रमेश भु नी माय बाप नी कविता आयकाडीसन रडायी सोड… ज्ञानेश्वर माऊली नी माय बापनी कविता बी ह्रिदयले पाझर फोडी गयी… आते बबल्याना मुड खराब करीसन फायदा नही व्हता…
n
नानाभु संमेलन ना मेढ्या मा परसांत दादा नी माय बाप नी कहाणी, भाषा ना प्रमाण, महाराष्ट्र मजार भाषा प्रांत न्यारा जरी ह्रायन्हात तरी बी पिरेम व्यक्त करान्या भावना एकच ह्रास. मी मजारमाज बबल्या ले बोलणु “बय बबल्या तु काय ग्यान न्या गोष्टी करी ह्रायन्हा भो”. नानाभु मन्हा चस्मा जरी उलटा शे ना भो, तरी तो चांगल्या गोष्टी सुलट्या दखस… बबल्या बोलणा… नानाभु गफुडा बी नामी ना झायात बर, सुनिल भु ना तोडगा जीवन जगाना तोडगा सांगी ग्या, मा शिरपूर ना बापु न जीवन न अंत्यम सत्य नी जीवन नी डहांह चेटायी गयी, त्या पी पी ते भन्नाट आवली दिसनात भो, संपत बाप्पाना रुप मा घरमा संडास बांधाना संदेश दि ग्यात…. मी मजार बोलणु, “काय रे बबल्या तु बी ते सरकार ना १२ हजार खायी ग्या रे संडास ना”. तसा बबल्या मन्हावर खेकस्ना, “ओ नानाभु मी संडास बांधाना पैसा खादाद, पण खान्देश ना पुढारी गावोगाव बठ्ठा संडास खायी ग्यात त्या दिस्ना नहीत का तुले?.”बय नानाभु तु ना *, खीर मा मुय्या नी गोट मा इदोया*.. घालस.
n
नानाभु बय गुयी ना शिरामुये गयरी पाणी नी तीस लागी ह्रायनी भो… चराचर पाणी तानी ह्रायन्हु मी… बबल्या कटबन कुमाचड व्हयीन तु?” मी बोलणु. हा मंग तु मन्ह मुसड कडे दखत बशेल व्हता?… मन्हावर तिरपी नजर करीसन बबल्या बोलणा. बय पण नानाभु वरण, बाफेल बट्टया, गंगाफयनी भाजी, मिर्चीस्नी भाजी….गुयी ना शिरा… वा मन निवायी गये… पण नानाभु गंजच गोश्टी बी खटकन्यात माल्हे. बय आप्ला लोक फुकटन्या फौजदाय्रा ठोकीसन पयी जातस. बाकी लोकस्ना बी कार्यक्रम दखाले जोयजे… पण कोण बोलीन भो, मोठ्ठला लोकस्ले, आप्ल धाकल तोंडे, मोठा बलका कसा लेवो भो. काय शे नानाभु, मोठास्नी गु खादा ते आवसद खाद, नी धाकल्ला लोकस्नी आवसद खाद तरी लोक म्हणतस गु खादा… म्हणीसन नही बोलेल बर ह्रास. ह्या संमेलन मजार एक सदर व्हत, चावय! शिखर संघटनानी गरज शे का? पण गल्ली गुल्लीस्मा अहिरानी आणि खान्देश नाव वर चुला चेटाळनारा एक बी संघटनाना मेढ्या थांबना नही, परतेकले आप्ला टिंगर ठोकीसन मन्हीज संघटना कशी चांगली शे आस वाटस…. फक्त इलेक्शन मजार ह्या एकमजार येवाना चोट्टा पणा करतस… काम झाय की, मंग गरज सरो नी वैद मरो आशी गत करतस… रमेश भु नी कायपात ले मी आरस्तोल करस…. नानाभु घरन खायीसन उखल्लावर भाकरी सोडन सोप नही ह्रास भो… पण रमेश भु, तेस्नी कारभारीन न कवतीक करो तीतल कमीज व्हयीन… बय त्या माऊली ना पायले भिंगरी व्हती. हाऊ इरभान बाबाना बाप उत्सव मातर माय ले, आणि आंडोरस्ले रडायी गया.
n
बर डाकटर एस के बापुस्ना गयब्या आयकना व्हता. पण येय जास्ती व्हयेल व्हती… बर बबल्या तु बाकी न शेवटला भाग माल्हे मांगथाईन सांगजो… जोडमेता जोड मी बी जास आते. मी बोलणु. बबल्या लगेज बोलणा, “नानाभु जाय भो, माल्हे बी निंगन पडीन पाणी पावसाया ना दिन शेत…” बबल्या नी चस्मा काढा… कुडचीले पुसी काढा… मन्हावरी ह्रावयन्ह नही, ओ बबल्या, काय आयजी ना जीव वर बायजी उदार करस.. दुसरना कपडा शेत ना, ले काच पुसी, ले शेंबूड पुसी… “नानाभु इज्जत ना कचरा करू नको बर…. चस्मा डोयामा घालत घालतच बोलणा, तू आते काय बापू नी गाडीवर जायी ह्रायन्हा ते भाड दिशी का? सोतान ठेवो झाकी, नी दुसरा न दखो वाकी, आशी गोट शे तुन्ही….. चस्मा नेम्मन लाव… सुय्रा बुडान पयले निंघ बबल्या, एक ते तु रात आंधया शे, मी बोलणु…. तसा बबल्या बोलणा, बय नानाभु, धामणगाव ना इजु भो, जयराम भु, बाकीना कवीस्न्या कविता आयकन्या व्हत्यात… पण माल्हे रात हुयी जायीन नानाभु… बबल्या, *गहू दयस बाजरी दयस, दयता दयता याद माहेरनी येस…*.. आस म्हणत म्हणत निंघना…. आते मी भी निंघनु मा रमेश धनगर सर… सौ वैंजी येस्ना आभार मानीसन….. पण आते माय अहिरानी ना गया भरी येल व्हता…. तिन्हा डोया मा पाणी येल व्हत…. ती माय अहिरानी मा रमेश धनगर सर येस्नी माय ना रुपमा सभामंडप मजार तिन्हा लेकरस्नी करेल आगाजा नी जत्रा मा मखडायीसन बशेल व्हती……
n
त्रिवेणीकुमार