आपला भारतना विकास

आपला भारतना विकास

आपला भारतना विकास

भावड्यासहोन हाऊ शे आपला भारतना खराखुरा विकास. मी ह्या जिवाननं नावबी विकासच ठेयेल शे.हावू जी जागावर बठेल शे ना तो आम्हना च्याईसगावना पलाट फारम नंबर दोन शे!


आते ह्या विकासदादाना हातम्हा जे अन्न तुम्हले दिखी र्रायनं ते काही त्येनी आपला घरथीन आनेल बिनेल नई शे बरका! आन तो रेल्वेवरी प्रवास करन्हारा प्रवासी व्हई आसं जर तुम्हले वाटस व्हई ते तसंबी काई नई शे. तो आठेच ह्या पलाटफारामवरथीन त्या फलाटफारमवर आथाईन तथा आन तथाई आथा फिरतच र्हास. एखांदी प्रवासी गाडी पलाटफारमवर वुनीरे वुनी का हावू गडी प्रवासीसनी फेकेल वस्तुकासना पॉलिथीनथैल्यासवर नेम्मन नजर ठेवस आन ती गाडी तठीन हालताच त्या ज्या पन्न्या पडेल र्हातीसना, तिसम्हा खावालाइक काही जिन्नस सापडस का काय हाई दखाले त्या पन्न्या हुगाडीसनी खावालाईक पोई, भात मीत काही फये मिये बिस्किटे मिस्किटे जे सापडी ते जोई जाईसनी दुसरी पन्नीम्हा वतीसनी पलाटफारमवर ईसनी निचितवार बठस आनी त्या पन्नीसम्हाईन जे काही खावालाईक व्हई ते ते काढीसनी मज्याम्हा एखादा रावबहादूरसारखा मिटक्या मारात खात बठस. हाई वाचताना तुम्हले भलेच कियस बियस येत व्हई पन ह्या जिवानले त्याम्हा जरासीसुदुक कियसबियस नै येस.

दखा तो कसा मस्तपैकी बोटे चाटीचुटी खाई र्हायना. आपीन आपला घर अपला मव्हरेना ताटम्हातला आवडता पदार्थ जसा लाई लुई आन जिभल्या चाटीचुटी खातसना बिलकुल तसा ऐटबन आन आरामशीर फलकत मारीसनी त्या अन्नावर तुटी पडेलसारखा खास तो दखा! दखा नेम्मन! त्यान्हा आंगेपांगे दोन तीन कुतल्लाबी हुबा र्हाईसनी एखांदा घासतुकडा आपलेबी भेटी ह्या लोभम्हा ह्या विकासदादाकडे टक लाई लाई दखत र्हातस. पन सोतानं पोट भरा शिवाय हावू विकासदादा त्येसनाकडे ध्यानज देत नै. ह्या विकासदादानं पोट भरनं का जे उरेल सुरेल अन्न र्हास ते तो त्या कुतल्लासकडे फेकस.

त्येन्ही ते जिन्नस जथा फेकेल र्हास तठे तठे त्या कुतल्ला जाईसनी तेन्हावर ताव मारतंस. त्यासनी हाई केमिस्ट्रीबी भू दखालाईकच शे हो. त्या कुतल्ला विकासदादाले जराखाबी घाबरतंस नै कारन विकासदादाले येय वखतले आशा चीसवस्तुकासन्या थैल्या जोई काढी देवानं काम ह्या कुतल्ला वज्जी मज्यानं करतंस. मंग त्या छैल्या बंद र्हावोत का हुगड्या र्हावोत, तिसनाम्हा नेमकं काय शे हाई पह्यले विकासदादाच त्या थैलीसन्या गाठी सोडी सुडी आन हुगाडीसन दखंस. हाई समदं दखीसनी माले आपला मोठा मोठा साधू संत महात्मासनी आठोन येवाबिचूक नै र्हायनी, मायन्यान भो. त्येसना आवतेभवतेबी आसाच खंडेरायासना जत्थान जत्था हुबा नैते बठेल दखायतस त्यासना फटुकेसम्हा.


हावू विकासदादा येडाबिडा व्हई आसा मन्हा आंदाज मातर दुसरा एक प्रवासीनी निरानाम खोटा पाडी टाका. त्या गडीले ह्या विकासदादानासंगे मस्त गप्पा हानीसनी टाईमपास करताना दखीसनी आपला भारतना खरा विकास कोनले म्हनो हावू माले आखो नईन प्रश्न पडी ग्या, पन त्येन्हं उत्तर मातर माले आझून काई सापडी नै र्हायनं. तुम्हले सापडी ते माले जरुर सांगज्यात.
हाऊ फोटो मी चोरीदपी काढेल शे हाई मी कबूल करंस, पन आते माले भू पसतावा व्हई र्हायना, बैजू नई तरी काढतू हावू फोटो मी.
याच पलाटफारमना एक आंगे आपला देसना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबना मस्तपैकी कटआउट आन त्यान्हा जोडेज बेटी बचाव बेटी पढाव आसं एक माय लेकीसना फोटो दखायना आन त्येन्हाजवयच एकआंगे खाले जे लिखेल व्हतं ते वाचीसनी माले भू आनन व्हयना. त्या बोर्डवर जे लिखेल व्हतं त्यान्हा आर्थ आसा का भारतना शंभर टक्का खेडास्म्हा ईलेक्ट्रीफिकेशन व्हुई जायेल शे!


बापरे बाप! कव्हढा झपाटाबन विकास व्हयना आपला देसना नै का? दखाना त्या पलाटफारमवरबी आवढी रातलेबी कितलं उजायं पडेल दखाई र्हायनं? यालेच ते खरा विकास म्हनतंस. त्या चार पदरी काई सव पदरी समृद्धी महामार्गे, रेल्वेनाबी दोन ट्रॕकना जागे कोठे तीन ते कोठे चार चार ट्रॕक्स म्हनजे रेल्वे लाईनी! आसा एकथीन एक शेरले सवाशेर आसा वज्जी भारी विकासकामे जथा तथा दखा-आयकाले भेटतस. हाल्ली ते आख्खा भारतना रस्ता एकते खंदीखुंदी तरी काढेल शेतंस नै ते भांदी भुंदी तरी काढेल शेतस. लोके म्हन्तस का त्यान्हामुये अॕक्सिडन व्हई र्हायनात म्हने. माले ते आसा बोलन्हारा त्या लोके येडाबिडाच दखावातस. ती एक जगपरसिद्ध फेमस म्हन नै शे का, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है!

आसा आपला हावू विकास शे भावड्यासहोन. आते ह्या थंडीना दिवस शेतस म्हनीसन आपला विकासदादानी कंबरले जी गुंडायेल शे ती लुंगी व्हई ह्या भरम बिरमम्हा नका र्हायज्यात बरका! आहो ती लुंगी नई शे. जरा ध्यानखाल दखा! ते ब्लँकेट शे ब्लँके!. आन त्येनी जे शर्ट घालेल शे, ते बिगरधवानच शे. ते कितला दिनफाईन धोयेल नई यान्हा आंदाज आते तुमीनच लावा. तो सुशिक्षित बेरोजगार शे का काय शे यान्हाबी सोधतपास लावज्यात बरका.

बरीच रात व्हई गई पन हावू विकासदादा काई मन्हा मनम्हाईन आन डोकाम्हाईन निंघानं नाव काई ल्हेत नई. हाई गाडी नागपूरले जाई र्हायनी. तठे जातलगून आखो कोनता विकास माले दर्सन देस कोन जाने? आन समजा झायेच आसं एखांदा विकासनं दर्सन ते तुम्हनी त्येन्हासंगे भेट घडाई दिसू मी!
चला ते मंगन आते ठेवस. पन मन्हा हावू भारतना विकास तुम्हले कसा काय वाटना ते सांगाले ईसरज्यात बिसरज्यात नका हौ!

तुम्हनाच

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव.

2 thoughts on “आपला भारतना विकास”

  1. ह्या डेली हंटना कितला आभार मानवो आन कितला नई हाई काई माले समजीच नै र्हायनं.
    आजना जमानाम्हानी पत्रकारिका बठ्ठी ईकाऊ व्हई जायेल आशीसनी डेली हंटनी जी रिस्क लेयेल शे तिले आजिबात तोडच नही शे! मी निःशब्द र्हायेलच बरा!

Comments are closed.