आज बैल पोया सें पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

n

आज बैल पोया सें

n

पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

nn

(पिकंनां आत्मा बोली ऱ्हायनु)

n

️️️

n

***********************

n

… नानाभाऊ माळी

file

…..आज सरावन पोया सें!आथा तथा दवडी-दावडी पहेरनी पुरी करी व्हती! गंजज ठिकाने दखो तें बैलगाड मुडी जायेल सें!परवडत नई!मंग यान्या-त्यान्या रावन्या करी भाडाथुन पहेरनीं व्हस!वावर शेतकरी गंम दखतं बठस!पीक आभायगंम दखत बठस!आम्हीं येरायरना गंम दखतं बठतसं!चांगलां पानी पडना का मंग आखो तन मातावर कोयपनीगुंता रावन्या करी लेतसं!घरना घर निंदी टुपी लेतसं!मजुरी परवडत नई!त्याम्हा आते मांगला पंधरा तीन हाटफाईन दिनभर उन चटकाडी ऱ्हायंत!आम्हीं उनम्हा वाफसायी जायेल व्हतुत!आज बैल पोया सें

nn

पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

nn

खाले कोल्लीखटक जिमीन!भेगा पडेल सुकायेंल ढेकाया!ढेकायास्मा आम्हन्या मुया घुसेल!ना वलावा व्हता,ना त्याम्हा पानी व्हतं!आम्हनी काकूयीदी दखालें एक एक जड पाय उखली,मेर वलांडी आम्हना जोगे यी शेतकरी कवलोंग धूर उभा ऱ्हाये!आमन्ह वाफसायेलं रूप दखी वर अभरायगंम दखत बठे!आम्हना आंगेस्वरतूनं त्यान्हा हात फिरतं ऱ्हायेत!आम्हलें आमायें-कोमायेतं ऱ्हाये!धिवसा देत ऱ्हाये!आम्हनां पोटले पानी नही व्हतं म्हणीसनी सोता भी पोटले चांगलं जबून खायें पिये नयी!जीव निस्ता टांगनिले लागेल व्हता!आनी आज पोया सें!घरमा गोडधोड करेल सें!कुंभार दादा फाईन माटीना बैल करी घरमा ठेयेलं सेतस!आज सरावन बैल पोया सें!

nn

राबनारा, मांगे कितलाक दिन फाईन हुभा ऱ्हायी आभायंगमं दखत बठे!त्यांना सुकायेलं डोया वल्ला व्हयेत!टचकनं पानी नितरेतं ऱ्हाये!दोन तीन थेंब त्यान्हा गाले नितरेतं!आम्हीं मरांना पंथालें लागेल व्हतुतं!त्यान्हा आंसू आम्हले जगानी हुभारी देत ऱ्हायेतं!यांय बुडावर धिवसा भेटे!रातना अंधाराम्हा जंगलम्हानी थंडी व्हडी व्हडी पंघरी लेवूत!तिले

n

मु्यांस्पावूतं भिडायी दिन मव्हरे निंघी जायें!आम्हना पाने पाने हुभारी धरेत!देठे उभारी धरेत!आम्हन्या मुया थंडीनां संग्रोह करी जिमीनलें धाडी देयेत!आम्हनं वाफसायेलंपन निंघी जाये!…आज पोया सें!️

nn

दिन नींघावर सूर्यदेव आम्हले भुंजी काढे!आम्हना मरनन्हा पंथा जोगे यी जायेल व्हता!धीरे धीरे आम्हना आंगवरनं निय्येपन उडी ऱ्हायंत!उन रस्पट व्हडी ऱ्हायंत!तरी भी मुयास्नी टेका लायी धरेल व्हता!कितल भी कर तें जिमीनम्हा रस ऱ्हायी तें आम्हन्या मुया व्हढतीन नां?वर देव घाऱ्या वाऱ्या करतांना दिखे नई!पानी नयी व्हता!जिमीनन्ह्या भेगा पानी मांगी ऱ्हायंत्यांत!तकलादूपन पंघरी हुभा व्हतुत!..आज बैल पोया सें!

nn

काकूयीदी करी जित्त ऱ्हायीसनी मरनन्हा पंथे परवास सुरु व्हयी जायेल व्हता!कव्हयं आम्हनी खाल्ली मुई कोल्ली व्हयी पानी सोडी दी यांना भरोसा नई व्हता!आम्हनं एक एक पांट पिव्वे व्हयी ऱ्हायंत!मरन जोगे जोगे यी ऱ्हायंत!जिमीनम्हा घुसेल मुया आम्हले जित्त ठेवागुंता कोशिश करी ऱ्हायत्यांत!बस्स,शेतकरी किद्रीसनी आंगवर ढोरे सोडनार व्हता!त्यान्ही किंव दखी आम्हले लळू ये!आम्हीं येरायेरलें पांटा घसी दुःख जिरायी लेवूतं पन ज्या शेतकरीनी आम्हले जिमीनम्हा पहिरं!आम्हना हुभा कोंब दखात!तो हारकी गयेता!आम्हीं पानींना सपाटाम्हा टर टर वाढनूतं!शेतकरी उज्जी खुश व्हता!आनी मधमाचं पानी पाट दखाडी उपडी गयेता!… आज सरावन बैल पोया सें!️

nn

शेतकरी आते पंधरा तीन हाटफाईनं आम्हले तोंडं दाखडालें वावरम्हा भी यी नई ऱ्हायंता!आम्हनं मरन चालू व्हतं!एक एक मुई कोल्ली व्हयी ऱ्हायंती!पिव्वे धमक पांट जसी कावीळ व्हयेलं मायेक पिकं

n

वावरम्हा हुभ व्हतं!आखो निस्ता सव सात दिनम्हा जर पानी येता नई तें मंग वावरे ना वावरेस्मा सुखायेंलं कडबा हुभा दिखता!काय कोन जाने आनी आनी आम्हले दखी वरना अभ्रायलें लळू उन व्हतं!०५ तारीखले,पाच सप्टेंबरनां दिन घाऱ्या वाऱ्या करी देव गर्दी करी उना!आनी काय दखो!दड दड करी आम्हना आंगवर येतं ऱ्हायेना!पडत ऱ्हायना!पानी भेगास्मा घुसत ऱ्हायनं!…. आज बैल पोया सें! ️

nn

०५ तारीखफाईन तें ०९ तारीख पावूतं पानी हालका-भारी व्हतं ऱ्हायना!आम्हना आंगम्हा सलाईन टाकी आम्हले मरता मरता वाचाडी ग्या!आम्हना पिव्या पाने हारकी ग्यात!आम्हना आंगम्हा आखो तेजी येल सें!पानी उना भी आनी पयी भी ग्या!ग्या,दुरलोंग आडा हुभा ग्या!मुल्लान-मुल्लान वलांडी ग्या!पन आते आम्हन्या मुयास्मझार जीव येल सें!शेतकरी आम्हले दखी वावरेस्मा चकरा मारालें यी ऱ्हायना!आते त्यान्हा डो्यांना आंसुस्मा सप्पन सें!…आज सरावन पोया सें!️

nn

वावरेस्मा आवूत व्हडी-व्हडी,राबी राबी थकेलं बैलसले आराम सें!आज आंग धोयी चोयी,शिंगे रंगाडी,झूल चढायी दिनमावतलें गावमा मिरवणूक निंघी!दारना मव्हरे ववाई-वुवाई

n

पुरीन्हा बल्का तोंडंम्हा ऱ्हायी!आज सरावन पोया सें!शेतकरी बठ्ठ काम सोडी आज पोया सन साजरा करी ऱ्हायना!कालदिन फाईन आखो

n

मानवर औतनीं दुसेरं ऱ्हायी!औत-गाडं पयेत ऱ्हायी!आम्हीं वावराम्हा हुभा सेतस!आते

n

जिमीनम्हानं पानी आम्हन्या मुयास्मझार व्हडी ऱ्हायनुतं!आखो एखादं-दुसरं शेंर उन तें आम्हीं आंग धोयी लिसूत!पोगा भरायी शेतकरीले उपसी-उपसी चंप-आदलं-पायलं मूक्ल दिसूत!आम्हीं निय्यागार दिखी ऱ्हायनुतं!आज आमावस सें!कालदिनफाईन भादा लागी जायी!आम्हीं भरायी भुरायी ऱ्हायनूत!शेतकरीलें देवागुंता हासी ऱ्हायनुतं!शेतकरी राजा खुश ऱ्हायी!आम्हीं पोतं भरी घर इसूत!आज बैल पोया सें!आम्हना निय्यापननां खुशीना सन बैल पोया सें!️

n

n

*******************

n

… नानाभाऊ माळी

n

(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)

n

ह.मु.हडपसर, पुणे-४११०२८

n

मो.नं-९९२३०७६५००

n

दिनांक-१४सप्टेंबर २०२३

n

(बैलपोया)

nn

स्वरचित कविता :-

nn

बैलपोळा :

nn

आधूनिक वाऱ्यांमुळे

n

एक एक सण जमा

n

होत आहे इतिहासात

nn

गोड सणांचे स्मरण

n

देते मनाला स्फुरण

nn

खेड्या – पाड्यात आजही

n

हर्ष देतो बैल पोळा

n

बळी राजाचा फुलवी

n

धन धान्याचा ही मळा

nn

बैलांची होते अंघोळ

n

शिंगांना देतात रंग

n

पाठीवर असे झूल

n

ऐटीने मिरवीतात

n

सर्जा राज्याला गावात

n

माथ्याची करून पूजा

n

गोड खाऊ घालतात

nn

श्रमाला आहे कींमत

n

शिकविला जातो धडा

n

बैलांची जो राखी निगा

n

प्रसन्न शंकर भोळा

nn

सुनिल भाईदास बोरसे

n

मोहाडी उपनगर धुळे