अहिरानी ले संजीवनी बुटी दिसन सतेगते चालनात कै अशोक चौधरी सर

अहिरानी ले संजीवनी बुटी दिसन सतेगते चालनात कै अशोक चौधरी सर


येड लागस दादास्वन काही गोष्टीस्ना करता, नी जगदुन्या ना इतिहास फक्त येडा लोक लिखतस.तसाच इतिहास येड कै अशोक चौधरी येस्ले आणि तेस्ना सहकारीस्ले लागेल व्हत. कै नाना माळी येस्ना जोडुदार व्हतात. काय अभिनय व्हत ह्या कलाकारस्न.

कै चौधरी सरस्नी अहिरानी च्यारी मेर पेरी काढी, आडमुंलावन बी बाकी ठेव नही. साहित्यिक, कविता, पुस्तक लिखात, अहिरानी गाणा लिखात, अहिरानी गाणास्नी कॅसेट, अहिरानी सिनेमा.कै चौधरी सरस्न अभिनयले बी तोड नही व्हती.

नाट्यानी सगाई काय धमाल सिनेमा व्हता.तुफान चालना.. पण पायरसीमुये ह्या कलाकारस्न वाटोय व्हयन. गाव, प्रांत, सरकार येस्नी बी कानाडोया करात. ह्या कलाकारस्नी अहिरानी भाषिक रसिकस्नी हयाती वाढाई, पण सोतास्नी हयाती कमी कयी.

आज आम्ही संमेलन भरावतस, महोत्सव भरावतस, पण ह्या कलाकार आम्हना डोकामा येतस नही. कै चौधरी सरस्नी नी मन्ही भेट दोन सावा झायी… काय हसमुख चेहरा, दिलखुलास माणुस.माय अहिरानी आते कोठे नववारी म्हायीन, सावारीमा येल व्हती, पण जीन नी चड्डी लगुन दखा करता सर तुम्ही हयात पाहिजे व्हतात.

तुम्हण अहिरानी न योगदान अहिरानी भाषिक इसरन शक्य नही.तुम्ही अहिरानी ना करता खपाडेल हयाती वाया जावाव नही, तुम्हण साहित्य, कला, संस्कृती हायी डबोल शाबूत डेवानी आम्हनी बठ्ठा अहिरानी भाषिकस्नी जिम्मेदारी शे.


सर तुम्ही अहिरानी करता सोनान पांन्ट लिखी ग्यात, आम्ही त्या पांन्टान पुस्तक कस व्हयीन येन्हा करता जरी प्रयत्न कयात तरी तुम्ले ती खरी श्रद्धांजली ह्राहीन. कै अशोक चौधरी सरस्ले भावपूर्ण श्रद्धांजली… देवबा तेस्ना आत्माले शांती देवो… त्या निश्चिंत सतेगते जावोत हायीच प्रार्थना.

प्रवक्ता
खान्देश हित संग्राम
९००४९३२६२६

img 20240201 wa00323098451864394694069
कै अशोक चौधरी सर