अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

आम्हना बबल्या ना उलटा चस्मा म्हायीन, अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

सुरेश पाटील

धन्य आज दिन संत दर्शनाचा /

अनंत जन्माचा क्षीण गेला//१//

मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे

कदा न सोडावे चरण त्यांचे //२//

विविध तापाची झाली बोळवण/

देखिता चरण वैष्णवींचे//३//

एका जनार्दनी घडो त्यांचा संघ /

न व्हावा वियोग माझ्या जिवा //४//

बबल्या हाऊ आभंग मस्त मान डोलत खुर्चीवर बशीसन मराठा दरबार हाल मा म्हणी ह्रायंता. खर म्हणजे आज अहिरानी मायना बुचडाले आजुन एक सोनान पिस लागेल व्हत. आज सोहळा म्हणजे आम्हना गयब्या आणि हजारो खान्देश अहिरानी वैभव ना कार्यक्रम करणारा जेठा बंधु डाॅ एस के बापु येस्न अहिरानी निरुपण संत तुकाराम पुस्तक न प्रकाशन. आते आसा कार्यक्रम ले आम्हना बबल्या पयलेज धडकेल ह्रास, बर येस ते येस गुन्नामुन्ना बी ह्राहत नाही. मायना तेन्हा चस्मा म्हणजे साला आर ना घुद्दा ह्रास…. पण आज बबल्या प्रत्यक्ष…. आभंग… आणि तो बी… धन्य आज दिन संत दर्शनाचा… माल्हे ते आचंबा व्हयना…

मी बबल्याना नजीक बसणु…. मुद्दाम

इषय करा…. बबलु महाराज की जय! जय हरी हभप बबलु महाराज! आस म्हणतास, बबलु नी म्हन्हकडे दख आणि डोयीम्हायीन चस्मा काढा, कुडची वरी पुसी काढा, मंग बोलणा, “नानाभु तु येणार नही व्हता म्हणे, पण माल्हे हामीकारी व्हती तु नक्की यीशी… म्हणीसन मी बी उन्हु…”. मी आजुन खाजीसन रंगत काढ ,”बय तु इतला दुर कस काय उन्हा भो?, नही म्हणत कवीसंमेलन नही, पंगत बी नही, मंग उन्हा कसा? आते मातर बबल्या कयबन सटकना व्हता. नानाभु तु माल्हे काय हालकट समजस का? का मी इतला निपित्तर शे? हाऊ जो उलटा चस्मा शे ना, तेन्हा उपकार शे मन्हावर, मन्ह वनफोर तिकीट शे, तु मन्हा संगे उन्हा ते तुल्हे बी हाफ तिकीट लागीन. बय मी तुन्ही इज्जत करस ते तु माल्हे कुचमाल समजस.” मी आरे वैंजीले फिरावत जाय ना मंग” मी बोलणु. नानाभु तु न पिचडेल फिस्कावर मीठ चोया न काम करस. तुल्हे माहित नही का? ह्या अहिरानी ना पायरे नी साहित्य संमेलन ना पायरे ती एकच घरमा मन्हा फायीन वाली ह्रास. काय शे नानाभु आपीन गरीब लोक अहिरानी ले खांदावर लीसन नाचतस, पण साला आसाबी काही शिदोड शेत त्या माय अहिरानी ना खांदावर बशीसन नाचतस “. बबल्या जाऊ दे भो तु वाराले लाथा नको मारु.

” तु येणार नही व्हता नानाभु?, माल्हे मा हाटकर बाप्पा, मा डाॅ फुला मास्तर, तंगामंगाकार मोहन भु दिसनात पण तु काही दिखना नही. बठ्ठा आफलातुर व्हतात, पण तु आणि आक्का काही दिसे नही भो… मंग मन्ह मन खाये गयर, पण बर झाय तु उन्हा.” बबल्या माल्हे उशीर झाया, पण कार्यक्रम सापडणा, नी तु भेटना, मी बोलणु,” बर मंग कार्यक्रम कसा झाया मी बोलणु.आरे नानाभु कार्यक्रमनी सुरुवात मस्त व्हयनी. नेम्मन नामीना लोक, नामीन प्रकाशन झाय. नही ते काही कार्यक्रम ह्रातस नानाभु, नुस्ता नाव ले दाद्या! आप्ली आक्कान भाषा मजार मन्ह ते” नकटी ना भंडारा नी, गावभर दिंडोरा”. पण बापुस्ना कार्यक्रम नामीना… पाव्हणा पुयीबी मोजका व्हतात. नानाभु इतल सोप नही भो, जगद्गुरू तुकाराम लिखन! ते बी माय अहिरानी मजार! बठ्ठी मेहनत बापुस्ना आंडेर आणि आंडोर नी व्हती आस दिसे नानाभु… खरच नानाभु *कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारीक वाटे देवा*… म्हणीसन संतती नामी ह्रायन्ही, ते संपत्ती पाणी भरस… डाॅ फुला मास्तर येस्नी ह्या पुस्तकले निरक करान काम कये, डाॅ बापुस्न भाषण झाय, मा सौ लांडे ताईस्नी लिखानी कल्पना फाईन ते छापा लगुन ना परवास सांगा, मा पगारे सरस्नी बी मस्त भासन कये… आणि आप्ला मा आदरणीय हाटकर बाप्पानी जीभवर ते सरसोती माय राज करस नानाभु, काय भासन करतस ह्या बाप्पा, बय तेस्ना जोये जे मौखिक साहित्य न डबोल शे ना ते जर लिखी काढ ते, शंभर ना वर पुस्तक लिखावतीन, पण बाप्पास्न माल्हे आस वाटस की, दुसरान आनंद मजार तेस्ना आनंद त्या झामलतस, म्हणतस ना, *दुसरान लगीन मा ढुमढुम वाजे, नी कुकू ना करता खाजे*…. पण तेस्नी डाॅ एस के स्ना तुकाराम मा हाटकर बाबाप्पास्नी हासतखेत डोळ्यासमोर आणात. डाॅ बापुस्ना सोमरस वर बी टुमना मारा म्हणे बाप्पास्नी… पण तो आदर ना सल्ला व्हता… संत तुकाराम वाचन, लिखन, समजन म्हणजे बठ्ठ जीवनले वाही लेन ह्रास, जे डाॅ एस केस्नी करेल शे. पण नानाभु तु मा पठारे सरस्न भासन चालु व्हत तव्हय येल व्हता ना? “मी बोलणु हा भो! तितलामा बबल्या ना मोबाईल वाजना… कोण कहता है भगवान आता नही, आता है मगर तुम बुलाता नही, आशी रिंग टोन ना आवाज बबल्या ना मोबाईल नी काढा नी बबल्या फोनवर बोला करता बाहेर निंघना….

क्रमशः….

बबल्या वापीस उन्हा की, वाचुत तेन्हा उलटा चस्मा….

त्रिवेणीकुमार…