आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन

आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन

आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन

!! दाटे आभायले पान्हा !!
भावड्यासहोन नमस्कार !

आपली आहिरानी मायबोलीना नारा नारा खटलास्वरन्हा पाटलासवर गनज नवाजेल साहित्तिक येगळा येगळा माध्यमना गमथीन आपपला  ईच्यार मांडत र्हातंस. प्रकाशदादा पाटील पिंगयवाडेकर त्यासम्हातलाज एक सेतंस. आपला खान्देसी परंपराम्हा ज्या काही सन, उच्छाव आन समारंभं सेतंस त्यासम्हा लोकवाङमयले वज्जी मोल से! पारंपारिक लोकगीते, कथा, भवाडा, भारुड, घट्यावर्हना गाना, अंगाई गीते, आखाजीना गाना, कानबाई, गवराई, लग्नेस्म्हा नाची कुदीसन म्हनाना गाना-उखाना ह्या सम्दा इतर भाश्यासथीन थोडा आल्लगच उमटी पडतंस, नईका?

ज्यासनी ह्या लोकगीते, लोकनृत्ये खेडापाडासम्हा धाकलापनपाईन दखेल आयकेल सेतंस, त्या गानासना तालवर त्या नाचेल कुदेल सेतंस त्यासना लिखाकराम्हा आन इतर वरकरनी लिखन्हारेसना गानासम्हा जिमीन आसमाननं आंतर दखावस माले! मायन्यान भो कधी!
मी जधय जधय प्रकाशदादा पाटीलनं साहित्यनं वाचन करंस तधय तधय माले हावू फरक नेमका आल्लगज उमटीसन दखावस.
आजनी हाई *दाटे आभायले पान्हा* आष्टाक्षरी रचना बिलकुल तसीच शे. दखा!

अहिराणी कथा
अहिराणी कथा

दाटे आभायले पान्हा!
गये आम्रितनी धार!!
दाये मिरीग कमाल!
कसं व्हवाडे शिवार!!

टाके आभायना दूत!
मोती पवयाना सडा!!
दाये धरनीले मया!
बुंजे शिवारना तडा!!

कसा डबकाना काठे!
म्हने डेडोर तो गानं!!
उना वासुदेव वना!
म्हने पावलं रे दानं!!

आठ चरनेस्म्हातला आठना आठ चरने एकथीन एक सवाई शेतंस पन मी त्यासम्हातला तीनच ल्हिनात.

पह्यला चरनम्हा…..
आभायले काय दाटना?…….आभायले पान्हा दाटना!

मिरीग काय दाये?….. मिरीग कमाल दाये!

कमाल कसी दाये?…..शिवार व्हवाडीसनी कमाल दाये!

आभायना दूत कसाना सडा टाके?….आभायना दूत मोती पवयाना सडा टाके!

धरनीले मया दाईसनी काय करे?…..धरनीले मया दाईसन शिवारना तडा बुंजे!

डबकाना काठे कोन गानं म्हनंस?…..डबकाना काठे डेडोर गानं म्हनंस!

त्या डेडोरना रुपम्हा कोन ऊनं?….. त्या डेडोरना रुपम्हा वासुदेव वना!

वासुदेव काय पावलं म्हणाला?……वासुदेव दान पावलं म्हणाला!

आते आपन ह्या आठी चरनेस्म्हातला अंत्य यमक तपासी दखूत

धार- शिवार
बोकडाये- व्हट खाये
टपकाये- झाये
सडा- तडा
ढग- रग
कापोया- डोया
गानं- दानं

वर्हना समदा यमक सहजपने, त्या त्या चरनेसले अर्थवाही करागुन्ता नैसर्गिक वाटाले जोयजेल आसा हेतु मव्हरे ठी सनी वापरेल सेतंस. ईनाकारनीक वापरेलच नई शेतंस!
कवी जसा अहिरानीना चांगला जानकार शेतंस तसाच त्या मराठीनाभी गह्यरा आभ्सासक शेतंस, म्हनीसनी त्येसनी मराठीना मोठा खुबीखाल वापर करीसन *म्हने पावलं रे दानं!*
आसं लिखेल शे त्याले कारन आसं शे का जो वासुदेव घरे घर फिरीसनी फेरी मांघस, दान मांगस (भीक नई म्हन्तस त्येले) ते मराठीम्हानच मांघस शे ना?

ते भावड्यासहोन!
साहित्यनी सेवा वरकरनी व्हतंच नई! त्येन्हासाठे जीव लाईसनी सापेक्ष वाचन, चिंतन, मनन आन त्येन्हाउप्पर लिखान कर्न पडंस! निस्तं उठसुट काहीनामाही लिखावरी दर्जेदार साहित्यनिर्मिती व्हवाच नई! व्हई का? सांगा बरं!
*प्रकाशदादा पाटीलसारखा जानकार साहित्यिकसनं साहित्य आपला बठ्ठा खटलासवर संग्रोह करीसन ठेवा! कारन हावू अहिरानीना आस्सल गावरान मेवा शे!*
चला ते मंगन ठेवस मी आते!
भेटूत आसंच कधय मधय!

तुम्हनाच!

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव,