अहिराणी लेख मी मन्हा चेहरालें वयखी ऱ्हायनू

अहिराणी लेख मी मन्हा चेहरालें वयखी ऱ्हायनू

मी मन्हा चेहरालें वयखी ऱ्हायनू


नानाभाऊ माळी

…..मानोसना चेहरा कसा दिखस?समोरथून दखा तें आल्लग दिखास!जेवनी काने देखा तें आल्लग दिखास!डावी कानेथीन चाफली- चुफली दख तें त्यान्ह रुपडं आखो आल्लगचं दिखस!मानोसनं दिखनं नजरनां खेय तें नई? दिखनं-दखाडनं एक आजब चमत्कार से!हावू आपला डोयांना खेय तें नई मंग? तोंडंनां मव्हरेथीन दख तें हँडसम,ब्युटीफुल वाटस!त्याचं व्यक्तीलें तिरपा-तारपा अँगलथून दखा तें आखो भलताचं दिखालें लागी जास!

आपनं मानोसलें झामली दखी ऱ्हायनुतं!तोंडंलें दखी वयखी ऱ्हायनुतं!मानोसनां चेहरांना पत्ता धुंडी ऱ्हायनुतं!पन वयख काय लाग्नी नई!जव्हयं दखो तव्हयं पावडर लायी हुभा मानोस वयख देतं नई!हावू बठ्ठा नजरनां खेय चाली ऱ्हायना!नेम्मन थांग पत्ता काय लागत नई!जितला दाव दखो तितला बदलेलं दिखस!

मी सोता गंजज सावा सोतालें वयखागुंता मन्ह तोंडं झामली दखस!मन्हा खोल डोया दखी लेस!डोकांना धव्या बालेस्नी खून चाफली देखस!डोयांस्वर लायेलं नंबरन्हा चष्मा फिरीफीरी लायी दखस!फेफरं,नकट नाक बोटेस्वरी व्हडी दखस!हावू खेय आरसाम्हा दखी चालतं ऱ्हास!!आरसांमव्हरे तिरपं हुभ ऱ्हावो!तिरकी नजर करी दखतं बठो!खोल खड्ड व्हयेलं डोयानी भिरभीर नजरथून सोतालें देखत बठो!जव्हयं दखो तव्हयं मी आल्लगचं दिखतं ऱ्हास!मंग “मी”जो से तो रंग बदलू सल्ल्या तें नई?चेहरा रंग बदलू ऱ्हास का मंग ??मानोस आसाचं ऱ्हास का ?आज काय नी कालदिन काय बदल घडत ऱ्हास!

मी फोटूके काढी दखस!चेहरा मयडी दखस!हेंगडा वाकडा व्हयी दखस!मी तोच से!मंग मी इतला रूपेस्मझार कसा काय से? मन्ह्या डोयान्या पाप्न्या थक्तीस नई!तिस्न काम चालूचं ऱ्हास!खाले-वर व्हतं ऱ्हातीसं!कितला दाव खाले वर व्हतीस तें मोजता येत नई ?… मी मंग मालेचं इचारस,”आरे नानाभो!.. कोन से तू? निस्त “नानाभो” नाव लिसनी भवडी ऱ्हायना!तुन्ही तुलेचं वयख पटनी का? तू दिखासं कश्या? वागाथून कश्या से?सोतानं नावगुंता हुभा से का? तुले नानाभो नाव पडी गे!लोके तुले नानाभो म्हंतंस!नाना चेहरा लिसनी फिरणारा तू एक बहुरूप्या से!एक दिन हावू बठ्ठा खेय सोडी चालना जाशी रें!!”

मी भेमकायी उठस !”मी”.. मीचं से! मीचं माले वयखी ऱ्हायनु!मानोसन कातडं पंघरी मी भवडी ऱ्हायनु!कातडं काये-गोरं से!माले बोलता येस!मन्ही जीभ लांभी पडी पडी बोलस!व्हट हालतस!डोकावरना काया बाले आते धव्या व्हयीसन मन्ही वयख बदली ऱ्हायनी!नखें वाढी ऱ्हायनातं!वय वाढी ऱ्हायन तसा आरसाम्हा दखाना येडाचाया वाढी जायेलं से!पहिले नजर आनी इचार नरबदा नदीनां व्हडाम्हा व्हायी जायेत!आत तापी नदीना खोल
पानीम्हा उतरेल से!बठ्ठ कसं
निश्चितवारं चालू से!खोल खोल
पानीम्हा व्हात जावो तसं!तसं धयेडपनभी आंगे आंगे सरकी ऱ्हायन!धाकल्पन्हा कव्या जरत पोऱ्या नानाभो तोच आते धयेडपनम्हा आरसा चाफली तोंडं दखी ऱ्हायना!बठ्ठ बदलेलं दिखस!चढता सूर्य तिसरापहारलें थकी जास!दिम्हूइले एखादी बल्लीनां मांगे चालना जास!

पहिले मी पयेत ऱ्हावू !आते चाली चाली पाय मोजी ऱ्हायनु!पहिले मी भलता उग्रठ व्हतू!उर्मट व्हतू!रगेल व्हतू!मन्हा चेहरा सांगे तसा!आते
धयेडपन नं कावड तोंडंलें लायी लेयेल से!कव्हयं कुस्टायें ऱ्हास तें कव्हयं आगय ऱ्हास!पहिले घोडा व्हयी उधयेत ऱ्हावू आते यांन्हा
त्यान्हा आधारे सासुले-सासुले चालनं पडी ऱ्हायनं!मी तोच से!नानाभाऊ से!टुकारन्हा गंनतीम्हा व्हतू!आते बेकार नी गंनतीम्हा से!रात पाह्यटे उठी आरसाम्हा देखत ऱ्हावो!मीचं माले वयख देतं ऱ्हास!तितलाम्हा खटलं उठस!मन्हा हात धरी खाटलांजोगे लयी जास!रातना झिरो बलभम्हा खाटलावरं हात धरी जपाडस!आंग वरथून जाडी झटक झाव्हर टाकी देस!ती तिन्हा कामले लागी जास!मी खाटलावरं पडी पडी डोयांमव्हरे मन्हा इतिहास देखत बठस!

सोतालें वयखानां हावू खेय चालूचं से!सोतांना चेहरा हुघडी,झाकी कितला दिनलोंग दखतबठसू आक्सी बदलनारा चेहरालें कव्हलोंगं निरखी दखसू?अस्सल चेहरा हिरदम्हा ऱ्हास!त्याले चाफली दख तें आपले खरा चेहरानी वयख व्हयी जास!सुंदर, हासरा हिरदना मुखडा आनंद दि जास!सोनाथून चंमक्या!उजाये देणारा चेहरालें खोल जायीस्नी दखनं पडी!त्यानंगुंता माले मन्हा पावडर लायेलं नकली चेहरालें,मखडेलं चेहरालें काढी ठेवनं पडी!हावू नकली चेहरा फसाडू से!चालता बोलता बठ्ठासले गुंगारा देतं ऱ्हास!नजर आनी नकली हसातून जगलें फसाडतं ऱ्हास!मी मन्ह पावडर लायेल नकली तोंडंलें दूर फेकी आस्सल तोंडंलें दखागुंता कायपात करी ऱ्हायनु!नकली चेहरावरंनां पावडरन्हा मूक्ला चर चढेल से,काढी ऱ्हायनु!मन्हा मुसडालें चंदन पानीम्हा बुडायी ऱ्हायनु!मन्हा तोंडंलें दखी,वयखी ऱ्हायनु!

…. नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१८जून २०२३