बायजा काकूनं गऱ्हानं अहिराणी रचना

बायजा काकूनं गऱ्हानं अहिराणी रचना

बायजा काकूनं गऱ्हानं

अहिराणी रचना

बोलनं नही , पण बोलनं वनं    ॥ धृ ॥

मारं व्हई,  झोडं व्हई,
कंबर मनं, मोडं व्हई । गावगाडामा, व्हतं माहेर ,
कधी निरोप , धाडा नही  ।
सक्की भाशी, वऊ कई , पोऱ्यानं मन्ह, ऐक नही।
उभी नहाडीमा, वऊ मनी ,  डंका मना , पिटत राही   ॥

बोलनं नही , पण बोलनं वनं    ॥ धृ ॥

कडा पाटल्या, हातभर चुडा ,
नवरा कसाई , सोडा नही । नाकले भोकर, कानले डोचर, काटा बाभूळना मोडा नही ।
सात नवसनी भाशी वऊ, पायमा इना, तोडा नही ।
सांगाले जावा, टांगाले उठस , बायजा काकूनं , दुःखनं हाई ।

बोलनं नही, पण बोलनं वनं  ॥ धृ ॥

बजारमानी आयती पोत, काळा मनी, दोन वाट्या, मंगळसुत्र तोड नही ।
नव्हती ऐपत, सोनं घडाणी,
गळाले फास ,  लाया नही   I
व्हता मना,  मनी फूटका , कुकू ले, डोचर पाडं नही ।
सात नवसनी , भाऊनी पोरं,
वऊना कपाळले कुकू नही ॥

बोलनं नही, पण बोलनं वनं ॥ धृ ॥

घरना उंबरा, डोकाना पदर, कधी मना ढळना नही ।
जलम जिंदगी , ढेकळं फोडामा , नवरानी मनी हयात गई ।
सक्की भाशी वऊ कई , बांधवर कधी दखायनी नही ।
व्हता करममा सासरवास , माहेरली कधी सांगा नही ॥

बोलनं नही पनं बोलनं वनं ॥ धृ ॥

घालं डोकं ऊखळमा ,
एक बठो का दोन बठोत,
ढोरणं  गत मार खाऊ , सकाळमा उठी, कामले जाऊ, फाटेल संसारले ,
ठीगळं जोडामा , मायनी मना हयात गई,
नित पडे त्याले कोन रडे,  कोनी भवजाई कोना भाऊ ॥

बोलनं नही पनं बोलनं वनं ॥ धृ ॥

तुकातात्याना संसारमा , कोरड बैडामा हायात गयी, पायले धसकटं , हातले काटा , जलमभर मोडत राही,
कोणा सगा कोणा सोयरा, जलमले कोणी पुरनं नही । ज्यानं करता कई वण वण, तोच आते वळखत नही ॥

बोलनं नही पनं बोलनं वनं ॥ धृ ॥

गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन

अहिराणी कविता
अहिराणी कविता