अहिराणी कवीता अरे पाऊस पाऊस

अहिराणी कवीता अरे पाऊस पाऊस

अरे पाऊस पाऊस

अरे पाऊस पाऊस
धरत्रीनी भूक तीस
नको उपाशी ठेवूस¡!

अरे पाऊस पाऊस
नको अवेये येवूस
म्हनुन तुले इनवस!!

अरे पाऊस पाऊस
तोंड मधला घास
नको काढीरे लेवूस!!

अरे पाऊस पाऊस
पिकू दे मोतीनं कनीस
नको घाईमा जाऊस!!

औत धरी मन्या राजा
तुन्हा आगमने मजा
अवकिरपा तुन्ही सजा!!
अरे पाऊस पाऊस
माले भिंजानी हावूस
नको असा रागावूस!!

अरे पाऊस पाऊस
धरत्रीनी भूक तीस
नको उपाशी ठेवूस!!
रमेश महाले.शहादा.