अहिराणी कथा बनी
. . . . . ” बनी ” … . . . . ( कथा ) . . . . . . . . . . . .
” वं ss मरी जायजो तू ss . . शिलग ना तथ्या ss ‘ काय तोंड्या s s ” बनी इतला जोरमा अल्लायनी त्या पहारेकरी वर ते ईचारता सोय नई . गोट तश्शीच व्हती ना हो ? काय करी ती पन ? निरानाम किदरी जायेल व्हती ती . आनी तोंड खुपसीसनी तठ्ठेच रडाले लागनी .
ती इतला जोरमा आल्लायनी व्हती झोयी म्हातलं पोरगं जोरमा दचकी उठनं आनी भेमकाईसन रडाले लागनं . त्या धाकलसा जीवले काय माहित त्यांनी माय जेलमा अंधारी कोठडीमा बंद शे . बनी ना मातर अवतार दखा सारखा व्हता बरं ! केस मोक्या ‘ चेहरा भेसूर ‘ आंगवरनी चोयी फाटेल ‘ लुगड् फाटेल . रडी रडी तिना तोंडवर ओघय व्हतात .
चेहरा काया ठिक्कर पडेल व्हता . आमावस्या नी रात ते नई व्हती . . मनध्यान ‘ पन मातर तिना करता ती भयान कायी भोर रात तश्शीच व्हती हो … तश्शीच व्हती ‘ .. मायन्यान कदी भो ss . किर् ss किर् ss . . . किर् ss रातकीडा त्या रातले भेसूर आवाज करी राहयंतात . दूरथीन ‘ पार बल्लाना हेटेथीन टीटवीना आवाज त्या भेसूर रातमा आखों भर घाली राह्यंता .
त्या अंधारी कोठडीमा जेल ना वट्टा वर पहारेकरी शिपाई हेर झारा घाली राह्यंता . तो मझार मझारथीन काठी ठोकी राह्यंता . आनी तो कोठडीना दरवाजा ना सलया धरीसन तिले दरडाई राहयंता . ती लेकरूले जपाडी राहयंती . पह्यलेच तिनावर मार पडेल व्हता .
पातय फाटेल व्हतं . त्यानावर रंगतना डाग पडेल व्हतात . रडी रडी ती अर्धी मर्धी मरेल सारखी व्हई जायेल व्हती . दिनभर पोटमा काईच जायेल नई व्हतं . जेलमाच लेकरूले झोका बांधीसन रडत जाये आनी “जपरे मना दादा तु . . जपरे ss अशी म्हनीसन हातमा झोकानी दोरी . . आनी रडत जाये . हुंदका दाटी ये तिले .
ती पन मंग ईचार करे ” जानु मना नशिबमा या काय भोग व्हतीन ? . ” तवसामा हाऊ पहारेकरी हवालदार तठे कलमडना … . मंग ती चिडाव नई ते राही का बरं ? नई तुमीनच सांगा बरं ! ”
बनी ले एक गुन्हाम्हा अटक व्हयेल व्हती . . बनी एक चांगला वतनदार घरनी पोरगी व्हती . गोरी पान सडसडीत बांधा . घारा डोया . लांबसडक बाल . तिना बाप मोठ्ठा जमीनदार व्हता . बागाईतदार व्हता . शिरीमंत बापनी लाडकोड मा वाढेल पोर व्हती ती . धाकलपने बापनी तिना लाड पुरायेल व्हतात .
असं म्हना तिना पायले माटीनी धूय बी लागेल नई व्हती . तिनं नाव ‘ बनेश्वरी ‘ व्हतं . पन तिले लाडमा बठ्ठा बनी च म्हनेत . आनी आज ती जेल कोठडी भोगी राहयंती . डोया रडी रडी सूजी गयथात .
आंगवर तिना मार पडेल व्हता . अजुनबी तिनं पातय रंगतनं भरेल व्हतं . कव्या गालवर रंगतना वरखडा व्हतात . पाठवर ‘ डोकावर जब्बर मार पडेल व्हता .
लाडकी बनी जेलना कोठडीमा शे हाई जवय तिना माहेरले बात गई हाई ऐकीसन त्यासले धक्काच बसना . बाप भाऊ ते सवरी ग्यात पन लाड कोडमा वाढेल नाजूक येल जेलमा सुकाई राह्यनी हाई ऐकीसन बनी नी माय ते बेसूदच पडी गई .
बनी जेलमा आंग सुजाईसन पडेल व्हती . दोन तीन दिनपाईन तिना पोटमा आन्नाना कन बी जायेल नई व्हता . भयान रडनी ती . आंगवरन्या जखमा भरी जातीन पन कप्पायना कुक्कु कथाईन भराई ? ती तरमई राहयंती . ईलाज नई व्हता . तिना सासु सासरा ‘ देर ‘ जेठ , भावजया ‘ मोठ्ठा गोतावया व्हता . हाई पन आसामी काय कमी नई व्हती .
त्यासनी हाई शिरमंती दखीसन तिना बापनी या सोयरिक संबंध जोडा व्हतात . आखरी तिना बापनी पैसाच दखा ना मंग .. ! अस्सच म्हनाई ना .. ? मानसे नई वयखात ‘ त्यासना पैसावर ‘ घर दार ‘ मोठ्ठा टोलेजंग वाडा दखीसन भूली ग्या . तठ्ठेच गोट चुकायनी व्हती . लोके घरदार पैसा दखीसन भूली जातस . त्या घरना संस्कार नई दखतस .
पन आते पसताईसन काय उप्योग ? बनीना सासरना लोकेसले पैसासना घमेंड व्हता . खारबाज व्हतात त्या . डंडार व्हतात गावमा त्या . त्यासना वाटे कोनताज गावकरी जाये नईत . रग्गेल सोभ्भावना व्हतात त्या . आमीन म्हंजी कोन ? असा पैकी व्हतात त्या लोके .
आनी या डंडार फॅमिली मा बनी फशी गयी जशी गरीब साळुंकी ‘ गरीब मैना पिंजरामा बंद व्हई गई . इंद्रभान मातर तिना उलट सोभावना व्हता . तो राकट व्हता . संतापी व्हता . आगना डोंब व्हता . त्यांना सोभ्भाव त्यांना ताबामा नई व्हता . आनी बनी ले पुरेपुर जानीव व्हती .
ती त्याले गंजच समजाडे . जीवान खानदानी जत्थ्यावरच पडेल व्हता ते ती पन काय करी बरं ! इंद्रभान टरकना टरक ऊसेसना त्या वावरेसना बांध वरथीन लई जाये . त्या वावरेसनं नुकसान व्हये . डोक लावा लावी पन व्हई जाये . पन त्या गरीब शेतकरी गुपचूप बसेत त्या . काय करथीन हो ? एक ये ते भिडा भिड व्हई गयथी .
आवरा आवर करी लिनी . पन इंद्रभान सडकेल डोक्साना व्हता ‘ खूनशी व्हता . बनीले सक्काय पाशीन कुन कुन लागेल व्हती .
तिना डावा डोया बी त्या दिन फडफडी राह्यंता . ती कदी भाहिर न जानारी पोरगी तिना पाय आदरी वावर कडे वयनात . तिनं चीत ठिकान वर नई व्हतं . तिना नवरा एकते पहिलेनच आगजाया व्हता . तरी त्याले ती समजाडत राहे बरं . . . पन तो इंद्रभान ऐकाना भाहिर व्हता .
त्या दिन इंद्रभान हटकीसन टॅक्टर वावरमा लई ग्या . तरी त्यासनी त्याले हटकाड् . पन इंद्रभान खाऱ्या व्हता . त्यांनी त्यासना संगे झगडा मोली लिना व्हता . त्यासनी त्याले पह्यले समजाडी सांग . पन भाऊ इंद्रभान ऐकी तवय खरं ना ..! त्यासनी दखं जीवान काई ऐकत नई .
आखरी त्यासनी त्याले घेरी लिनं . चारी बाजुथीन दनादन पुराना डोकामा ‘ पाठमा टाक्यात . पन तो काय जुमाननारा व्हता का ? कसाले इचारतस हो ? उसयी . . . उसयी ये जीवान . मंग एक नी ते दुश्शेरच काढी भो . आनी इंद्रभानना मांगीथीन त्यांना डोकामा टाकी .
टाकताच इंद्रभान लल्हायना ” ओ बापरे ss ” असं म्हंताच तो जिमीनवर आडा पडना . पुरा रंगतना भरी गयथा . तथाईन बनी पयतच उनी . ती त्या लोकेसन्या रावन्या कराले लागनी . ” नका हो ss ‘ नका मारू हो ss ‘ मन्हा नवराले . . हातापाया पडस तुम्हना . . . नका ना ss नका हो नका मारू हो ss मना नवराले . . नका मारू ss ” आनी इंद्रभानना आंगवर ती आडवी पडनी . त्यांना मार ती झेलाले लागनी .
मज कयबन पुराना तिना आंगवर पडनात . डोकावर पडनात . रंगत भयभय व्हावाले लागनं . त्यासनी तिले हात धरी दूर ढकली दिन्हं . त्या इंद्रभान ले आखो माराले लागी ग्यात . आखो एकनी दुशेर इंद्रभानना डोकामा अशी टाकी ना दखनारेसना आंगले काटा ऊना व्हतीन मन ध्यान . तो अस्सा लल्हायना . आनी रंगतना थारोयामा निपचत पडना . तो बेसुध पन त्या इतला खूने खून भराई गयथात वरथीन पुरानाना टकोरा टाकीज राहयंतात त्या . कसाले जीवत राही हो तो .. ?
आते मातर ते दखीसन ती चवताईसन उठनी बरं ! संतापनी ती . लाल बुंद झायी . ती पार रंगतनी भरेल व्हती . तसा अवसानम्हाच ती उठनी . जशी जखमी वाघीनच . तिना डोया मा रंगत उतरी उंथ . बाजुले काम वाल्या बाया हाई गंमत दखी राह्यंत्यात .
ती चवताईसन उठनी आनी त्या बायासन्या हातम्हाईन ईय्या हिसकावा आनी ज्यानी तिना नवरा ना डोकावर दुश्शेर टाकी व्हती . त्याले तिनी बरोब्बर धरं . आनी सपासप ईय्यांना वार कयात आनी त्याले तठ्ठेच आडवं पाड् . तो ते तठेच खल्लास व्हई ग्या . जखमी वाघीन काय करू शकस त्यानं हाई जीवत उदाहरन व्हतं . ती तव्हढावरच थांबनी नई . .
जोरमा जीतकी ताकद व्हई तितली ताकद लाईसन वरडनी . ” या ss रे ss भडवास होन .. या ss रे ss ! ” त्या ते कव्वयसना पसार व्हई गयथात . सैरा वैरा जीव लीसन आथा तथा पसार व्हई गयथात . तिना तो हातमा इय्या ‘ लाल संतापी चेहरा जसा दुर्गाना अवतार दखीसन बाया बी घाबरी ग्यात . बायासना पन थरकाप झाया व्हता . तिनं कुक्कुच संकटम्हान व्हतं ते ती पन काय करी हो ? तिना संताप दाटी उंथा त्या शिवाय तिना पा दुसरा ईलाजच नई व्हता तवय .
कोनी तरी फोन करा मुये पोलीस तठलोंग पहुंची गयथात . जखमीसले गाडी म्हान टाकं दवाखानामा भरती कये . आनी बठ्ठासले जाब जवाब ना करता पोलीस ठानामा लई ग्यात . खून कराना आरोपमा बनीले अटक झायी . तिना कुक्कु कायमना पुसाई ग्या . ती भलती रडनी हो . भलती रडनी . पन आते काय उप्योग व्हता ? आते ती अंधारी कोठडी म्हान पडेल व्हती . जखमी व्हती . आख्खं पातय रंगतनं भरेल व्हतं . दोन महिनाना लेकरूले तठेच तिनी झोका बांधी दिना … आंग नसे नस दुखी राह्यंत .
दोन तिन दिन झाया व्हतीन तिना पोटम्हान अन्नाना कन नई व्हता . आखों दुसरा पहारेकरी तिना जोड उना . तो गरीब व्हता . लेकुरवायी म्हनीसन तो तिले समजाडे . त्याले तिनी दया ये . म्हने ” पोरी s ‘ पोटे पोरगा येल शे . सोना सारखा पोरगा शे . तवयच तो पोरगा त्या हवालदार कडे दखीसन हसी राहयंता . दख मनं म्हननं या धाकला लेकरूले पन पटनं दख . बेटा उपाशी राहु नको . लेकरू ले दुध कशी पाजशी बरं ! ”
त्यानं म्हननं तिले पटनं व्हतं . पन ती रडत जाये आनी पोरगा ले जेलमा झोका देत जाये . मनमा इचार करे . ” काय ह्या दिन उनात मनावर ‘ देवबा काय कये रे तू .. ? ” मना सोना सारखा लेकरूले जलमताच जेलनी कोठडी ? ती मननी समजुत काढे . कृष्ण देव बी कोठडी म्हानच जलनमा व्हता . पन तिले हाई समजे . तिना सासरना लोकेसना गर्व त्यासनी घमेंड त्यासले आखरी म्हान धूय मा घाली लई गई .
काय उप्योग पडना तो पैसा ? प्रेममा राहतात ते माले मन्हा नवरा मना कुक्कुले कसाले गमाडना पडता ? ” आनी तिना हुंदक दाटी ऊना . ती रडाले लागनी . पोरगाना पोटम्हान भूक म्हाये नई . मझार मझारथीन तो रडी उठे . मंग ती जेलमा अंधार कोठडीम्हान झोका ना दोर व्हढे आनी म्हने ” गाई ss गाई ss मना दादा जपी . . . . . तेव्हढ बी तिनावर म्हनावनं नई . आनी ती परत रडाले लागनी . परत रडाले लागनी . अशी व्हती आमना बनी नी कहानी .. !
विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 . . . .