अहिराणी अभंग एकादशी
विषय = एकादशी
शीर्षक = हाक बयीनी
विठु दर्शननी आस
ओढ लागे पंढरीनी
चला जाऊ वारीले
भेट हुई विठ्ठलनी…!!
आषाढी एकादशी
संत वारकरी झायात गोया
पाये निंघस पंढरीले
नित्य नेम भक्त भोया…!!
टाय चिपळ्या मृदुंग
आकाशी गुंजे गजर
येस भक्तनी भेटले
पांडुरंग तो हजर…!!
वैष्णवसना हाऊ मेळ
दिंडी पंढरीला जास
चंद्रभागामा भक्तजन
तढे अंघोई ज करतस…!!
पंढरीना पांडुरंगा
ठेवी हात कमरवर
भक्त आदेशा करता
विठु उभा विटवर…!!
राहू दे मनमा पांडूरगा
मन्हा निष्पाप भक्तीनी
टयो संकट सर्व्यासन
हाक देवबा या बयीनी….!!
Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =१७-०७-२०२४