अहिराणी लेख देव उपकार

अहिराणी लेख देव उपकार

देव उपकार
        
नानाभाऊ माळी

‘ल्हवं ल्हवं उरक ना रें भो उखल्ल्या!हात उखली मव्हरे सरकत ऱ्हावों! भयं हातमा कनीस यी ऱ्हायन का नयी तुन्हा?चांगला पलपलात, चरचंरातं करवत्या इय्या से नां तून हातमा?नेम्मन डावा हातें कनीस धरी,जेवने हाते इय्याघायी चरंचरं चरचरं कापीस्नी खोय बोंब भरत ऱ्हावो!मव्हरे सरकत राहो!काम उरकत राहो!बाकींना बठ्ठा मव्हरे चालना ग्यात!तू मांगला मांगेचं से!मव्हरे जाणारा बाई सेतीस!तू मानोस भाई से ना!तू खुशाल मांगे मांगे व्हडायी ऱ्हायनां!पयला सारखं तूनंअंगम्हा काम नयी ऱ्हायंन बरका भो!सोता मुल्लानमोडी दुसरास्ले मव्हरे व्हडनारा उकक्खल्ल्या आते ग्या कोठे?’

जिभो नेम्मन कोर लायी बोलना व्हतातं उक्खल्ल्याले!त्याले उज्जी कायेजल्हे खड्ड पडी गयतं!जिभोनी नेम्मन द्यानतवरचं बोट ठेवं व्हतं!आभायांगंम दख,चांगलंचं उकयी ऱ्हायंत!कडक उन पडेल व्हतं!सूर्यदेव भादाना अवतार दखाडी ऱ्हायंता!मझारतून कायेज भडभडं व्हायी ऱ्हायंत!हातम्हाना इय्या कनसे खुडी ऱ्हायंता!हुभी बाजरीमा गदारा व्हयी ऱ्हायंता!घाम गयी ऱ्हायंता!उक्खल्याले उज्जी तीस लागेल व्हती!पन त्याले पानी पिवूशी वाटनं नयी!

निस्त तोंडले मुक्स भांदेलं व्हतं!करवत्या इय्या चरचंर चाली ऱ्हायंता!कनसे खंडी ऱ्हायंता!इचार इचारम्हा बाजरीनां कनसे कापी ऱ्हायंता!हात जोरंबन चाली ऱ्हायंतात!उक्खल्या मुल्लानंवर मुल्लानं फिरी ऱ्हायंता!हावू बांध तें तो बांध मव्हरे मव्हरे सरकी ऱ्हायंता!बाकींनं मजूर मांगे यी ऱ्हायतं!खोयावर खोया टोमांम्हा पडी ऱ्हायंत्यात!उक्खल्ल्यानं वागनं दखी जिभोभी तोंडम्हा बोटे घाली दखाले लाग्ना व्हता!

अहिराणी
अहिराणी

भादान्ह उन चटका दि ऱ्हायंत!हुभी जुवारी,बाजरी,मटल्हे सुकाडी ऱ्हायंत!हुभी बाजरीम्हा लानी सुरू व्हती!आंगले घाम यी ऱ्हायंता!आंग भी खाजी ऱ्हायंत!बाया लानी करी ऱ्हायंत्यात!जिभो भरेलं खोया टोमाम्हां टाकी ऱ्हायंता!गाडाम्हा भोत भरी गयती!लानीनं वावर सरी गयतं!डोकावर कनीस धरी नाचणारं बाजरीनं हुभं सरमट, तोटा दखी बीन सजन्ह दिखी ऱ्हायंत!मानोसनां डोकावर मोठ्ठला बाले ऱ्हायनात का खुली दिखास!बाजरीनं उभं सरमट निमाय व्हयी गयतं!डोकान्हा दागिना खुडायी गयता!घरमा कोनतरीं गमी जावावर लोके दुःखी दिखतंसं! बाजरीना उभा तोटा,सर्मट भुंडे दिखी ऱ्हायंत!

वावरम्हायीन यांय बुडानां येयलें कनसे भरेलं भोतन्ह बैलगाडं घरगंम नींघनं व्हतं!उक्खल्ल्यानीं बकरीगुंता वावरम्हानं गवत कापं!व्हझं बांधी डोकावर ठी घरगंम पयत सुटना!उक्खल्ल्यानी कंबरल्हे इय्या खोसेल व्हता!घर येता बरोबर दारमा बकरी कोकायी ऱ्हायंती!दारसे व्हझं ठेवं!बकरीले गवत टाकं!बकरी भुक्या पोटे बगर बगर गवत खायी ऱ्हायंती!डोया,कान फिरायी गवत खायी ऱ्हायंती!घरमां ढुकी दखं!…

उक्खल्ल्यानी बाई रखमा तीन दिनफायीन खाटलें पडेल व्हती!हुनां फनफनात तावम्हा आंग धरी कन्हीं ऱ्हायंती!त्यांनी तिन्हा कपायवर हात ठेवा!चांगलाचं चटका बठी ऱ्हायंता!रखमालें उठानी आव नयी व्हती!गोया बाटल्या चालू व्हत्यात!तरीभी ताव उतरी नई ऱ्हायंता!घरमा ऱ्हावाले दोन्हीचं नवरा बायको व्हतात!पोऱ्या बायकोनमांगे लागी सासरानां गावलें बांडी मोडी निंघी जायेल व्हता!बठ्ठ पोटवर व्हतं!मोलमजुरी करी दोन्ही जीव दिन ढकली ऱ्हायंतात!

घरमा घुस्ताबरोबर उक्खल्ल्यानी पहिलेंग बदलीम्हा पानी वतं!मोरीम्हा जायीस्नी खकारी खुकारी तोंड धोये!नाक तोंडम्हानी झीन धवायी गयी!धोतरले तोंड पूसी लिधं!रखमा खाटलावर निजेल व्हती!जागावरचं कन्हीं ऱ्हायंती!उक्खल्ल्या तीन्हा खटलांजोगे जायी बठनां!रखमान्हा डोकावर हात ठेवां ताव उतरेंल नही व्हता!हातले चटका बठी ऱ्हायंता!त्यान्हा जीव चरकायी गयता!रखमालें धीर देत बोलना,’तुले बरं वाटस का आते!’ रखमानी त्यान्हा हातवर हात ठेवा!बोलनी,’काय झाये माले?दुपारलें तुम्ही करेल शाक-भाकरी मोडी खादी!मनगुंता कितलं करी ऱ्हायानात तुम्हीन!सोता करी खावाळी ऱ्हायनात!… दिनमावत पावूत बरं वाटी ऱ्हायंत!आतेचं हुनं आंग व्हयनं व्हयी!’

उक्खल्ल्या रखमान्हा कपायवर मीठनां पानीम्हा बुडायेलं वल्ल फडकं ठी ऱ्हायंता!!फडकं आल्टी-पल्टी करी कपायवर ठी ऱ्हायंता!त्यान्ही इचार,’ तू दुपारलें गोया लिंथ्यातं का?’ तिन्ही हा करी मान हालायी!तीन्हावरी उठायी नयी ऱ्हायंत!पक्की लूज पडी जायेल व्हती!घरम्हा रुप्या पैसा नयी व्हतात!उसनवारे मांगानी लाज वाटी ऱ्हायंती!मोलमजुरी करी घर चाली ऱ्हायंत!उक्खल्या इचारम्हा पडी ग्या मनमा नं मनमा इचार चालू व्हतात,’काय करु आते?’ त्यांना एकदम डोकामां उन,’जीभो दि का पैसा?हाप्ता न हाप्ते मजुरीनां पैसा भेटतंस!आजचं जिभूना कामले गयतू!आते दिन मावतले पैसा मांगानं खरं से का?’
                  
रखमान्ही हालत दखी उक्खल्यानीं पायम्हा चपला सरकायात!उक्खल्या जिभोनां दारम्हा जायी भिडना!एकाएक उक्खल्यालें दारसे दखी जिभो बोलना,’काय रें भो!आतेच वावरम्हायीन घर उना नां?’ उक्खल्ल्या खाले मान घाली बोलना,’जिभो थोडीशी आडचिन व्हती!उसनवारं पैसा भेटतीनं तें बरं व्हयी!’

 जिभो बोलाले रोकडा व्हता!मोक्याचोक्या व्हता!कव्हयं मव्हयं खनपटपना करे तें कामगुंता करे!जिभो बोलना,’काबर भो, काय व्हयन?’ ‘कायनी,रखमालें फनफनात ताव भरायेल से!दवाखाम्हा लयी जानं से!’ जिभोनीं इचार करा,खोलीम्हा ग्या पत्रानी पेटीनं कुस्टाय हुघाडं!पाच हजार रुप्यानां बंडल उक्खल्यानां हातमा देत बोलना,’आखों लागतीन तें सांग रें भो माले!जल्दी जाये तू, रखमा बहीनलें डाक्टरगंम लयी जाय!’ उक्खल्ल्यानां डोयाले पानीन्या धारीं चाली ऱ्हायंत्यात!एकदम जिभोनां पायवर डोकं ठी आसूं गायेत बोलना,’जिभोsss’

जिभोनी त्यालें हात धरी उठाडं!आनी बोलना,’आरे येडा रडस काबरं?’ त्यानंखांद्यावर हात ठी त्याले घर वाट लाव!घर येताबरोबर रखमालें दवाखानाम्हा लयी ग्या!तंव्यतवय इलाज सुरू व्हयी ग्या!रखमा मरनन्हा दारम्हायीन उठी उभी ऱ्हायंनीं!काही लोके वरतीन कठीन नारय ऱ्हातसं पन मझारम्हा मायन्ह कायेज ऱ्हास!जिभोनीं उक्खल्ल्याले जिकी लिंथ!उक्खल्ल्या देवमानूस जिभोनां उपकारम्हा वाकी गयता!

नानाभाऊ माळी

मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२३ सप्टेंबर २०२४