सुई टोचायी सत कयी
नानाभाऊ माळी
माय पाह्येटे झापाटाम्हा उठीस्नी झान्नी धरी शेनन्ह सारेलं घरं झाडतं ऱ्हायें!झान्नी दारनन्हा मांगे नेम्मन जागावर ठी दे!घरंन्हा सपऱ्यावर खट्टा ठेयेल ऱ्हायें,तो हातम्हा धरी दारनन्हा मव्हरें आंगनं झाडत ऱ्हायें!
आंगनम्हा बकऱ्या बांधेलं ऱ्हायेतं!खट्टाधरी झाडाम्हा गोल गिटिंग लेंडया उधयेतं ऱ्हायेतं!दारसे ते गोया करेल भुगलं तगारीम्हा भरी ठेये!दिने दिन,झाडी -झाडी झान्नीनं धाकल्स बुडूक व्हयी जाये!खट्टान्या आगऱ्या धाकल्ल्या व्हयी जायेत!तवलुंग खट्टा आनी झान्नी काय हात म्हायीन सुटे नई!कधी मायन्ह कंबर दुखनं नयी!
आते आंगन सिमेंटन्ह,घरं सिमेंटन्ह झान्नी सोडी झाडू उना!लांब सडक झाडू कंबर वाकू देत नई!घरंम्हानीं थंडीगार फरशी नाग्ये पाय चालू देत नई!घरमा लब्बरन्या सिल्पर फिरी ऱ्हायन्यात!चुल्हा सोडी किचन वट्टानां खाले अर्धा -मर्धा कचरा सोडी झाडू फिरी ऱ्हायना!कंबरन्ह दुखनं वाढी ऱ्हायनं!
जेवाले मांडी घाली बसता येतं नई!डायनींगं टेबलवर जेवणे व्हयी
ऱ्हायनात!संडास इंडियन ऱ्हायेना नई!इंग्लिश भांडं उक्खुड बठू देत नई!घुडघा,कंबरन्ह दुखनं पोटम्हा उतरी ग्ये!पोट पोदल्या व्हयी ग्या!भल टरबूजनं पोट लयी धाप टाकी चालनं पडी ऱ्हायनं!हायी बठ्ठ दखी मन्ही १०० वरीसनीं माय नावे ठी ऱ्हायनी!
आपन सुख देखतसं!आंगन्हा घाम गयेत नई!बट्ठी कुडी रोग घरं व्हयी जास!बी पीनीं गोयी,डायबिटीसनीं संगे मांगे लयी फिरनी पडी ऱ्हायनी!शेनन्ह सारेलं घरं कथ गये?खत-मूतन्ह आंगनं कथ ग्ये!आपुन मव्हरे पयी
ऱ्हायनुतं!बे भरोसे पयी ऱ्हायनुतं!जाता जाता रस्तावरचं गाडं सोडी परलोक जत्रा जानं चांगलं नई!
पाह्येटे उठी मयानीं लांघीम्हा चुबुक डुबुक बारा धरानं सुटी ऱ्हायन!मानोस आयशी बनी दुखनं उधार ली ऱ्हायना!सुखन्हा धागा उसयी ऱ्हायनातं!घरें परका व्हयी ऱ्हायनातं!सुखन्हा धागालें सुई दखनी पडी!सुई टोचाई तव्हयं तव्हयं जगानं सत कयी!
नानाभाऊ माळी
(मु पो ता शिंदखेडा जि धुळे)
ह मु हडपसर, पूणे-४११०२८
(आज धुयालें)
मो नं-९९२३०७६५००
दिनांक-०७ जानेवारी २०२४
1 thought on “सुई टोचायी सत कयी”
Comments are closed.