शेतकरीना हुंडूक उसमरा Ahirani
शेतकरीना हुंडूक/ उसमरा…..!!
खरं से शानाभो तुन्हं, उख्खयम्हा डोकं घालायनं म्हंजे ते फुटो का राहो.
खेतीवालाले खचीसन चालत नै, पोटपुरतं का पिकेना वावर पयरनं पडस….
गाठना पैसा टाकीसन आभायन्या रावन्या करस त्यालेज शेतकरी म्हनतस,शानाभो…
गुंतामाय तू दखी रायनी ना आवन खेतीना काय हाल सेतस त्या,मांगना साले दादर पिकनी पन भाव भेटना नै, नी आवन कपासी सडी गयी पानीम्हा…..
खेतीवालानं मन ,कायजीना करता ,नी डोया बारोमास रडाकरताज देल सेतस का?
शाना, तो ठी तसं राव्हायी भो,
एक डोया लावत जाय नी एक उघडा ठेवत जाय.
कचका करीसन काय व्हवाव से का..?
गुंतामाय,मांगना साले मुंगनं आख्खं पिक सडी गयं…. एकदाना भी घरलगून उना नै, नेमकं मजूर सांगं मुंगन्या शेंगा तोडाले ,नी रातफाईन जो सयीनधार पानी सुरू झाया ते आठ दिन बन झायाज नै.मुंगन्या शेंगा सडी ग्यात.
पयराले नी मुंगनं वावर वखराले नी कचरं येचाले च्यार पाच हाजार रूप्या चालना गयात.
आवन बी मुंग जेमतेम उनात , भव बी जराखा बरा व्हता आवन.
गुंतामाय पयरनीना दिनम्हा खेतीवालाले काहीज सुधरत नै, कोन काय सांगस नी कोन काय सांगस म्हनीसन तो धांदरायेल ना मायेक -हास ,पयरनी ना दिनम्हा….
आवन मक्की टाकात ते त्यासम्हा बी आया पडी ग्यात मनमन तितल्या.
फवारा माराले माफान खडकू नै.
म्हनीसन पयरी उनू ते खेडाले वापज भेटनी नै,
दरसाल काहीना काही नुकसानी व्हयीज रास.
आसा जिऊ करस का च्यार डबडा भरो गोन्टाम्हा नी लेकरे पोरे लिसन सुरूत जावो.
निदान दोन टाईम तुकडा तरी भेटथीन पोट भरापुरता. नी तुनी हू भी काहीना काही काम करीज ना घरबठी.
टिकल्या चिटकावानं नै ते पातयसना दोरा कापानं काम ते करी.
शानाभो, गावनं कुत्र गाववरज येस.तठे बी जासी ते घरभाडं भरी भरी लंबा व्हसी.शयरम्हा बठ्ठ इकतनं लेनं पडस.
गुंतामाय आठे बी इकतनंज पडस ना बठ्ठ, पयराले खर्च,वखराले खर्च, तोडाले मजूरी, कापाले मजूरी, बठ्ठंज इकतज पडस आठे भी.
मंग खेती करापेकशा सयरमा काम करो नी रोजनं रोज *ताजा लाना ताजा खाना*
आरे भो *दूरथाई डोंगर सुलावना दिखस* जोडे जावो तवय समजस का आपले दिखनं तसं बिलकुल नै से आठे.
म्हनीसन *आपलं घर नी हागी भर*तू काय *उठाठेव नी डालकाम्हा देव* करू नको भो सयरम्हा जावागुंनता.
ज्यानं दूक त्यालेज माहीत रास.
दिनमांगे दिन काढत राहो.जाथीन निंघी वाईट दिन बी.
गुंतामाय, दरसाल कंबर व्हडी बांधो नी पयरो, दरसालं आसंज व्हस.
मनबरबरना लोकेसना घरे बांधाई गयात ,मी आजू बी पयरी नी वखरीज रायनू. वयशालीना लगनले च्याईस हाजार कर्ज काढं नी दोन पिकेसम्हा ,काही औतना भाडावर फेडात.
शानाभो, जर कर्ज काढेल फेडी टाकं ते हाई नुकसान बी सहीन करी ले, पावसायानं पिक गयं पन आते दादर पयरशी ते पिकी यिन ,आवन पानी चांगला पडेल से.
गन खरं से गूंतामाय, पयला पाऊल टाको ते रस्ता चांगला वाटस पन जसं जसं पुढे चालो तवय समजस का हाऊ भी रस्ता तसाज से.
शाना भो, मनी हायाती गयी हाई बठ्ठ दखत दखत नी सहीन करत करत.
दख भो, जास्ती इचार करो नै, एकेक दिन काढत राहो.
आमनी चावय सुरूज व्हती तितलाम्हा भवानीनं मंदिर उनं नी मंदिरना घंटा आयकू ऊना.
भवानी मायले हात जोडात नी सुखनं ठेव आसं मांगी लिधं…..
लिखनार—-ज्ञानेश्वर भामरे,वघाडी
