मतदार राजा अहिराणीबोली कविता
आयक मन्हा मतदार राजा
भ्रष्टाचारीस्ले मत ईकू नको
हाजार-पाश्शेमा ईकायना ते
पाच वरीस मंग भूकू नको..॥१॥
चटोरा बनीसन नेतास्नी ठेयेल
मटनना बोघनामा तू ढुकू नको
फेकेल बोट्यास्ना लाचार व्हशी ते
पाच वरीस मंग भूकू नको..॥२॥
इंगलिश पाजतीन तुले हरामी नेता
दारुना घोट पेवाले तू शिकू नको
ढोसलाना नांदमा बरबाद व्हशी ते
पाच वरीस मंग भूकू नको..॥३॥
दारशे यी गाडी मतदानना दिन
फुकट तिव्हर ढुंगण तू टेकू नको
मत निपळी हाकलं नेतास्नी ते
पाच वरीस मंग भूकू नको..॥४॥
शाना व्हय रे ! आते मतदार राजा
चोट्टा-भामटास्पुढे कधी वाकू नको
लाखमोलनं शे तुन्ह किमती मत
वाया घालीस्नी ते फुकू नको..॥५॥
भाऊ-बहिनीस्हो डोळा उघडा ठीसन मतदान करा..मी कयं..तुम्हीबी करा !
सुगंधानुज
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.