भामटा अहिराणी अभंग
उंद्रे गाडंभर खाई
बोख्या पंढोरीले जाये …
हाऊ भामटाना बोडा
भक्ती ईठोबाले दाये……….1
त्येना खांदावर्नी धज
न्हई गगनम्हा म्हाये…
त्येना धंगडास्ले देखी
देव दातव्हट खाये……….2
राज कलंकीनं देखी
झाया देवसुद्धा मुक्का…
डाग कपायना झाके
आते पोतंभर बुक्का……….3
माय तुयसीनी घाली
टाय गजरम्हा वाजे …
थाप मृदूंगले मारे
डोकं अभंगबी खाजे ………4
गाथा म्हणे कापी उना
गंगा सूरी धुईन का…
दिशाभूल करी–करी
पाप कमी हुईन का……….5
गांजे गरीबले रोज
तेले उख्खयम्हा कांडे …
आते रस्ते रस्ते पठ्ठया
हाऊ आनसत्रं मांडे……….6
दाये दगडेस्ले पाया
लाये चाटुले तू पीठ…
पाडे गरीबना भुस्सा
रचे हवालीनी ईट……….7
दिवा आंतरम्हा लाये
त्येले दिसें आठे देव…
भामटाना पले नुस्तं
डोकं मूर्तिपुढे ठेव……….8
कवी…प्रकाश जी पाटील. (पिंगळवाडेकर)