बा म्हतुंया पोरा म्हाये साठी
बा म्हतुंया पोरा म्हाये साठी
एक चप्पल जोड घेऊन यावं
पोरगा म्हंतुया वय झालं आता
तुम्हांसनी काय गरज हाय बरं
नको रे पोरा असं करू तू….
तुह्यासाठी म्या किती कष्ट केलेत
रात्रंदिवस मेहनत घेतली
राब राब राबून शाळा शिकिवली
तुमास्नी मोठा साहेब बनवलं म्या
आज हे दिवस पाहायला मिळतात
आज तुझी माय हयात असतीना
हे दिवस पाहायला भेटलेच नसतं
हे तुझे दोन शब्द आयकाला आलेच नसते
बरं नको आणू चप्पल तू…
पण म्हायं बनियन फाटलं ते तरी आणून दे
अहो बा तुमास्नी काय उनात जायचं हायं
बसा की आपलं गुपचूप ओट्यावर
नको रे पोरा लोकं बघत्यात
म्या लाज वाटते तशी…
लेक तुझा लई मोठा साहेब हायं
आणं तु असा कसा रहातोय
पण काय करणार मी
कसं कोणत्या तोंडानं सांगावं
आपलं आपलं गुमानं रहातोय
डोळ्यातील अश्रु गाळत पुसतोय…
नको रे देवा असा प्रसंग कुणा बापावर येवू नको देवूस
हेच म्या सांगनं हाय तुम्हांसनी…
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३