नवरात्रीना घट अहिराणी लेख
नवरात्रीना घट
घट स्थापने च्या शुभमुहूर्तावर घटा ची स्थापना अगदी पारंपारिक पध्दतीने कशा पद्धतीने स्थापना केली जाते ते मी माझ्या या अहिराणी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो जरूर वाचा.
” नवरात्रीना घट ”
भाऊ आनी बहिनीसहोन आपले आज घट बसाडाना शेतस बरं ! आज पासुन नवरात्री सुरु व्हई राह्यनीना .. ? मंग बरं . . असं काय करतस ? तर आज अश्विन महिनानी शुक्ल पक्षानी प्रतिपदा तिथी शे आज घट बसावू शेत . कालदिन सर्व पित्री ले बठ्ठा आपला वाडवडिल पीत्तर म्हनीसन जेवाले उथांत . हाशी खुशी जेवन करी ग्यात त्या पोटभर जी ग्यात आनी आशिर्वाद पन दी ग्यात बिचारा ..! पन बहिनीसहोन आज पासुन नवरात्रीना उत्सो . देवी माताना उत्सो ‘ दुर्गा माता ‘ अंबा माता आपला घर येनार शेत . त्यासना स्वागत करा करता आपुन ” घट ” मांडुत . तो कसा मांडाना त्यानी बिलकुल सोपी आनी साधी जी पारंपारिक पद्धत शे ती पद्धत आज आपुनले दखानी शे . पन भाउसहोन आनी बहिनीसहोन पह्यले काय करानं ते माहित शे का ? आपला घरनी स्वच्छता करी लेनं आवश्यक शे . माटीनं का घर व्हयेना ते सारी पोतारी लेवानं . भांडा कुंडा धोयी चोयी पाक करी टाकानात . जठे घट बसाडाना शेत म्हंजी जठे स्थापना करानी व्हई ती जागा शक्यतो आपला देवेसना देव्हारा जोडे लेल ते बरं राही . ती जागा गायना गोमूत्रा खाल पाक करी टाको . गोमूत्र शिपडी लेवो . या प्रतिपदाना दिन मातर झापाटामाच उठनं पडस बरं ! आनी दुसरी गोट जठे आपले घट बसाडाना शेत तठे आपलं तोंड सूर्या कडे येवाले जोयजे . म्हंजी आपलं तोंड पूर्व दिशाले जोयजे . दक्षिण दिशाले तोंड अजिबात नको बरं ! आखों एक गोट ध्यानमा ठेवानी ‘ त्या दिन आपला सोयताना कपडा धोयी चोयीसन स्वच्छ जोयजेत . घरनी देवपूजा करानी . कप्पायले गंध लावाना . पाटवर बसानं नई ते आसन लेवानं त्यानावर बसानं . तुयशी पत्र पानीमा भिजाडानं आनी ह्या तुयशी पत्रावरी पानी शितडानं . ती जागा पवित्र करानी . ” घट ” बसाडानी पन रीत भलती साधी आनी सोपी शे . पारंपारिक पद्धत खालच आपले घटनी स्थापना करानी शे . पन काय शे त्यामा आपली श्रद्धा जोयजे . भावना जोयजे . मन स्वच्छ जोयजे . मन पवित्र ठेवानं . नई का ? एक तबक लेवाना . आनी एक टोपली लेवानी . कोरी टोपली भेटस टोकर गल्लीमा ती कोरी टोपली त्या कोरी टोपलीमा वावर म्हातली माटी टाकानी . मंग कुम्हारना घरथीन एक धाकलसा माटीना घट बनाडी आनाना . तो ” माटीना ” घट ” त्या वावर म्हाईन आनेल माटीना मझार बिलकुल मधोमध ठेवाना . नई ते मांडाना . त्या घट ना तोंड ले लाल पीव्या धागा बांधाना . आनी आपला जोडे जो ताट ऱ्हास त्या ताटमा सात परकारनं धान्य लेवानं . मूठ मूठ भरी . त्यामा मका ‘ जुवारी ‘ बाजरी ‘ गहू ‘ मटकी ‘ जवस ‘ तांदुय ‘ त्या घटना अवती भवती माटीमा पेरी देवाना . मंग त्या माटीवर पानी शिपडानं . सात दिन लोंग पानी शिपडत ऱ्हावानं बरं ! थोड् थोड् पानी शिपडावर कायी माटी ना कोम उगी जातस . टोपलामा पिव्या पिव्या धम्मक तन ऊगी जातस . त्या माटीवर खत टाकं ते एक नमरी . अंकुर लवकरी फुटी जातस . आपन जो घट ठेल शे त्यानावर स्वस्तीक काढानं . घटमा थोडसं पानी टाकानं . झेंडुना फुले ‘ हयद ‘ कुकु त्या घट मा टाकाना . थोडी अक्षता ‘ दुर्वा ‘ त्या घटमा टाकाना . मंग पाच विडाना पाने घटमा नेंबन ठेवाना . आनी त्या पाच पाने ठेवावर त्या घट वर अलगद नारय ठेवानं . त्या घटना जोडे पाट मांडाना .पाटवर लाल मद्राना कापड ठेवानं . देवीले लाल वस्त्र भलतं आवडस . म्हनीसन लाल मद्रा ठेवाना . असा आपला घट मांडावस . मातर एक गोट ध्यानमा ठेवानी त्या ” घट ” ना मव्हरे गायना तूप ना दिवा अखंड नऊ दिवस तेवत ठेवना पडस . घटना जेवना हातले तो दिवा ठेवना पडस . म्हंजी हाई झाये आपलं ” दीप पूजन ! बाजूले पाट ठेवाना . पाटवर लाल मद्रानं कापड ठेवानं . त्यानावर तीन विडास ना पाने ठेवानात . देव्हारा म्हातला देव ‘ गनपती बाप्पा ‘ आनी आपली कुलदैवत व्हई त्या तिनही पानेसवर त्या तीन देव ठेवानात . मंग विडाना पानवर ठेल गनपती बाप्पानी ‘ आपला कुलदैवत देवीनी हयद ‘ कुकु ‘ अष्टगंध लावाना पूजा करानी आनी झेंडूना फुले व्हावाना . आपला देवीले झेंडूना फुलेसनी भलती आवड शे . गनपती बाप्पानी मनपासून पुजा करानी . अष्टगंध लावाना . हयद कुकु लावाना ‘ बाप्पानं रोज पंचामृत घालीसन स्नान करानं . नऊ दिवस या नवरात्रीना पूजाले भलतं महत्व शे . रोज देवीनी पूजा ‘ आनी आरती करानी . आरती येत ना व्हई ते पन मनोभावे देवीनी आराधना करानी . मंत्र श्लोक काई येत ना व्हई काही हरकत नई तुमनी श्रद्धा जोयजे . मन पासून देवीनी पूजा करी तरी ती लागू पडस . देवी काय म्हनत नई की ‘ मना करता तुमीन श्लोक म्हना ‘ संस्कृतना मंत्र म्हना पन मनोभावे एक चितमा तल्लीन व्हईसन पाक मनखाल देवीनी पूजा करानी म्हंजे तरी देवी हमखास प्रसन्न व्हस . नऊ रात्रमा नऊ दिवस रोज घटनी पूजा करानी . रोज चार पाच विडासना पानेसनी माळ करानी ती घट ले उभी बांधानी . रोज बदलल ठी तरी चालु शकस . देवी मायनी ओटी भरानी . गनपतीनी पहिले आरती करानी . देवी माताले ‘ दुर्गाले आपली जी कुलदेवता व्हई तिले मनमा भक्ती खाले सांगानं ” देवी माता आम्हना घरले सुखी ठेव वं माय … कोनतच दुःख देवू नको आम्हना वाटाले . सुखी ठेव माय . मंग शंख ‘ घंटा नाद ‘ धूप ‘ दीप आरती नैवेद्य असं नऊ दिवस मनो भावे न विसरता आराधना करानी . दसराना दिन नववा दिवस मातर देवीले त्या माटीमा पेरेल धान्याले तन उगेल राहतस त्या पीव्या पीव्या कोम दखाले लागतस . त्या तन तोडी लेवाना त्यासनी वेणी करीसन देवीले चढावानी . काई काई बाया सोयता बी ती वेणी आपला डोकामा घालतीस . झेंडु ना फुले देवी माताले मातर रोज व्हावाना . तर भाउसहोन आनी बहीनीसहोन अशी साधी सुधी पन पारंपारिक घट मांडानी प्रथा तुम्हना मव्हरे मी मांडी . काही काही शिकेल सवरेल बाया सप्तशतीना पाठ वाचतीस . नऊ दिवस नवरात्रीना उपवास तापास करतीस . कडक उपवास राहास त्यासना . देवीले रोज आरती म्हंतीस . ज्याले जसं जमी तशी पूजा देवीले मान्य शे . तिनी किरपा आपलावर शे . तिले मनोभावे नमन करानं . देवी माता आम्हले सुखी ठेव सर्वासले सुखी ठेव . सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमुस्तुते ॥
🙏🌷🙏🌷🙏🌷 विश्राम बिरारी ‘ धुळे 9552074343 …..
