अहिराणी लेख देवतं
दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
आजकाल प्रत्येक समाजमा प्रत्येक गावमा जुन्या रूढी परंपरा चालीरिती भाती या जून्या कायपायीन चालत ई रहायनात.जूना धल्ला,धल्ली या आज भी नही सोडतस.कोणतं भी शुभ कार्य उनं म्हणजे यासनं चालू व्हयी जास आपले असं करनं पडी तसं करनं पडी.
देवदेवता पूजना पडथीन.भाऊबंदकीले बलावनं पडी.चार सगाशाईले इचारनं पडी.आंडेर बेटी जवाईले बलावनं पडी.मंग यासनं चालू व्हसं पोर पोर्याना लगीनना विषय महीना दोन महीनाना वायेनी लगीननी तयारी.सर्वासले बलावनं चालू व्हई जास पावनापई येवानं सुरवात व्हयी जासं. घरना देव आणि भाऊबंदकीना देव या उजायाले सोनार दादा कडे टाकेल रहातस मंग पहीला प्रश्न पडस मांडो दांडो सईपाकी न्हाई बामन वाजा गाजा फुल तयारी व्हयी जास.मंग हायेदना पहिला दिन वरे जेवाडाना कार्यक्रम व्हस वरे जेवाडीसन काही काही गावसमा हायेदना दिन देव लयतस तर काही गावसमा हायेदना पहिला दिन देव लयतस हायी ज्याना त्यांना गावनी न्यारी न्यारी रीति रिवाज रहास.
वाजा वालाले बलाईसन देव- लेवाले चार चादर धरणार आणि मधला काठी धरणार असा जमतस मंग सोनार दादाकडे देवलेवाले वाजत गाजत जातस त्यासना मांगे दोन चार बाया या भी जातस. सोनारना घर जाईसन देवसनी पूजा-पाठ करीसन उजायेल देव या सुपडामा लाल कपडामा ठिसन मंग वाजत गाजत लयतस दारसे येवा नंतर पानीना तांब्या ववाईसन आजू-बाजू ले पानी फेकतस.
देवदेवारामा ठिसन पूजाकरतस मंग तठेंग पुढेना कार्यक्रम ले सुरवात व्हस.काही गावसमा न्यारी-न्यारी प्रथा रहास देवतं लयानी मारोतीना मंदिरमा जाईसन देवतं लयतस वाजत गाजत मंग पुढे चालू व्हस पुढला कार्यक्रम अजून भी खेडो पाडी शहरमा देवतं लयानी परंपरा चालू से ती कहीनच बंद पडाव नही.
अशी से हायी.